राष्ट्रजीवनच महत्त्वपूर्ण..!

Rahul Gandhi in Londonदेश संविधानानुसार

    दिनांक :24-May-2022
|
अग्रलेख
Rahul Gandhi in London जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख. पण, ही ओळख पुसली जाणार की काय, अशी भीती आता वाटायला लागली आहे. गेल्या काही वर्षांत देशात ज्या घडामोडी घडल्यात आणि आजही घडताहेत, त्या पाहता ही भीती निरर्थक नाही. लोकनिर्वाचित सरकारला काम करताना किती अडचणी येत आहेत, याचा अनुभव देशवासी घेत आहेत. लोकशाहीत विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षाइतकेच महत्त्व आहे. विरोधकांनी सरकारवर अंकुश ठेवायचा असतो.Rahul Gandhi in London  संविधानाला हेच अभिप्रेत आहे. पण, इथे तर सत्ताधारी पक्षाला कामच करू द्यायचे नाही, अशी विरोधी पक्षांची भूमिका आहे. भारत हा एक वैभवशाली देश आहे. विविधतेत एकता हे आपले वैशिष्ट्य आहे.
 

rg f
 
 
राजकारण भारताला नवे नाही. Rahul Gandhi in London राजकारण हा अगदी प्राचीन काळापासून भारताच्या समाजजीवनाचा आत्मा राहिला आहे. भारताच्या वैभवाचे अनुष्ठान म्हणजे राजकारण मानले जाते. या राजकारणात राष्ट्रजीवन महत्त्वपूर्ण मानले जाते. राष्ट्रजीवन हे पूर्वीपासून राजकारणाशी जुळलेले आपण पाहतो आहोत. राष्ट्रजीवनात जे आदर्श आहेत, ते राजकारण करताना पाळले गेलेत, तरच देश प्रगती करू शकणार आहे. अन्यथा, काय होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. लोकशाहीत आदर्शांचे पालन करणे सगळ्यांकडूनच अपेक्षित आहे. त्याशिवाय, लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजणारच नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. लंडनमध्ये जाऊन काँग्रेसचे युवराज राहुल गांधी Rahul Gandhi in London काय बोललेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. वरवर जरी आपल्याला त्यांचे वागणे-बोलणे हे बावळटपणाचे वाटत असले, तरी ते मुळात बावळट नाहीत; ते धूर्त आहेत आणि जाणीवपूर्वक अशी विधानं करीत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
 
संविधानाने केवळ संसद आणि विधिमंडळांचीच व्यवस्था प्रत्यक्षात आणलेली नाही. Rahul Gandhi in London संपूर्ण राज्यव्यवस्था त्यात सहभागी आहे. या राज्यव्यवस्थेत न्यायपालिका आहे आणि कार्यपालिकाही आहे. देश संविधानानुसारच चालतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक प्रजासत्ताक देश म्हणून जगाच्या नकाशावर आला. प्रजासत्ताकात जेवढ्या म्हणून संवैधानिक संस्था आहेत, त्या सगळ्यांचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. राजकीय पक्षांची तर जास्त जबाबदारी आहे. Rahul Gandhi in London लोकशाही असल्याने ती राजकीय पक्षांच्या माध्यमातून व्यक्त होत असते, होते. लोकशाहीत जेव्हा निवडणुका होतात आणि पाच वर्षांसाठी एखाद्या राजकीय पक्षाला वा पक्षांच्या आघाडीला जनतेकडून कौल मिळतो, तेव्हा पाच वर्षे सरकार चालविण्याचा घटनात्मक अधिकार मिळतो. त्या अधिकारावर विरोधी पक्षांनी अतिक्रमण करणे अपेक्षित नसते. सरकारवर टीका करण्याचा विरोधी पक्षांचा अधिकार आहे. Rahul Gandhi in London तो अमान्य करण्याचे कारण नाही. पण, सरकारला कामच करू द्यायचे नाही, ही विरोधकांची कृती लोकशाहीला मारक आहे. सरकारने बहुमताने पारित केलेले कायदेही अमान्य केले जात आहेत; ते रद्द करण्याची मागणी केली जात आहे. असेच होत राहिले तर लोकशाही फार काळ टिकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सरकारं आहेत.
 
पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा ही काही उदाहरणे देता येतील. Rahul Gandhi in London केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करायचेच नाही, अशी भूमिका अनेकदा या सरकारांकडून घेतली जाते. विशेषत: ममता बॅनर्जी यांच्याकडून तर कायम केंद्राला विरोधच असतो. बंगालमध्ये विरोधी पक्षात असणे जणू गुन्हा झाला आहे, एवढे अत्याचार भाजपाच्या कार्यकत्र्यांवर केले जातात. ममतांच्या धाकामुळे भाजपाचा एकेक खासदार तृणमूलमध्ये जात आहे. अनेक आमदारही गेले आहेत. ही बाब लोकशाहीला मारक आहे. Rahul Gandhi in London ममता बॅनर्जी अगदी क्रूरपणे वागत आहेत, हे आजवर घडलेल्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. भाजपाचे कार्यकर्ते मारले जात आहेत, स्वयंसेवकांना लक्ष्य केले जात आहे आणि तरीही केंद्र सरकार ठोस कृती करीत नाही, ही बाब सामान्यजनांना चिंताग्रस्त करीत आहे. केंद्रात काँग्रेसची सरकारं असताना ज्याप्रकारे भाजपाशासित राज्ये बरखास्त करण्यात आली होती, तशी कृती मोदी सरकारने करावी असे अजिबातच अपेक्षित नाही. पण, बंगाल आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सरकारी दडपशाही सुरू आहे, ती लक्षात घेता केंद्र सरकारने ३५६ व्या कलमाचा वापर करायला हवा, ही आता जनभावना झाली आहे. या भावनेचा सन्मान केंद्र सरकारने केला नाही तर भविष्यात होणा-या Rahul Gandhi in London निवडणुकांमध्ये कार्यकर्ते भाजपाचे काम करायला धजावतील काय, हा प्रश्नच आहे.
 
देशाला आत्मनिर्भर बनवताना समृद्धीकडे वाटचाल करण्याचे पंतप्रधानांचे प्रयत्न सुरू असतानाच विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक त्यात खोडा घातला जात आहे, ही बाबही चिंताजनक आहे. Rahul Gandhi in London देशाचा विकास करताना सगळ्यांना सोबत घेण्याचा, सगळ्यांचा विकास करण्याचा, सगळ्यांचा विश्वास संपादन करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न असताना पंतप्रधानांनाच बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मोदींवर अगदी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली जाते. अशी टीका करताना पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा लक्षात घेतली जात नाही, ही वेदनादायी बाब आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शिव्यांची लाखोली वाहणा-यांच्या केसालाही या देशात धक्का लागत नाही. असे असतानाही देशात कायद्याचे राज्य नाही, असहिष्णुता वाढली आहे, असे नकारात्मक वातावरण तयार करून जगात भारताची बदनामी करण्यात आली. Rahul Gandhi in London बदनामी करणा-यांनी स्वत:हून हे थांबवले पाहिजे वा मग आता सामान्य जनतेनेच पुढाकार घेत अशा लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचे राजकारण केले जात आहे. कायदा-व्यवस्था कशी बिघडेल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. भारताची जगात प्रतिष्ठा वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याला धोका पोहोचेल असे घृणित कृत्य आपलेच लोक देशात आणि विदेशात जाऊनही करताहेत, हे जास्त दुर्दैवी.
 
भारताला राजकारण नवीन नाही. Rahul Gandhi in London ब्रिटनमध्ये संसदेचा जन्म होण्यापूर्वीच भारतातील राजकारण हे समृद्ध, संपन्न झालेले होते. ऋग्वेद आणि यजुर्वेदात समृद्ध राष्ट्रजीवनाची अभिलाषा स्पष्टपणे नमूद असल्याचे दिसते. याचाच अर्थ हा की, भारतात अगदी प्राचीन काळातच राजकारणाचा विकास झाला होता. राज्यव्यवस्थेचा क्रमाक्रमाने विकास झाल्याचे अथर्ववेदात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्र आणि राजकारणाला जन्म देणारे प्राचीन काळातील ऋषी-मुनी हे वास्तविकत: त्यावेळचे राजकीय कार्यकर्तेच मानले जात. आपल्याकडे राजधर्म वा नीतिशास्त्राचा विकास हा पाच-सहा हजार वर्षांपूर्वीच सुरू झाला होता, हेही लक्षात घेतले पाहिजे. Rahul Gandhi in London कौटिल्याचे जे अर्थशास्त्र आहे, ते इसवी सनापूर्वी ३४० वर्षे आधी निर्माण झाले आहे, ही बाब लक्षात घेतली तर प्राचीन भारतीय संस्कृती किती समृद्ध होती, हेही आपल्या लक्षात येईल. बृहस्पती, शुक्राचार्य, भारद्वाज, पाराशर यांसारख्या आपल्या आधीच्या राजकीय चिंतकांचा उल्लेख कौटिल्याने केला आहे. Rahul Gandhi in London असे सगळे असताना केवळ सत्ता मिळत नाही म्हणून जर काही करंटे आपल्याच देशाला बदनाम करणार असतील तर त्यांना त्यांची लायकी दाखवून देणेच जास्त योग्य ठरेल.
 
मला काय त्याचे, असा विचार करून जर आपण गप्प बसणार असू तर ईश्वरही आपल्याला वाचवणार नाही, हे कटाक्षाने लक्षात घेणे गरजेचे आहे. Rahul Gandhi in London जगातल्या अनेक प्रगत देशांना मागे टाकत भारताने कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले. मात्र, याचे श्रेय मोदी सरकारला मिळू नये या संकुचित हेतूने काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरत संशय निर्माण केला. आपल्याच देशातले लोक लसीकरणावर संशय व्यक्त करीत आहेत, देशाची बदनामी करीत आहेत, हे दुर्दैवी होय. Rahul Gandhi in London भारत सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतला होता आणि त्याचे चांगले परिणामही अनुभवास आले. देशात कोरोनाचा प्रसार फार झाला नाही. लोकसंख्येच्या बाबतीत दुस-या क्रमांकाचा देश असल्याने भारतात लाखो लोक मरतील, असा पाश्चात्त्यांचा होरा असताना प्रत्यक्षात त्यांच्याकडेच जास्त लोक मृत्युमुखी पडलेत. असे असतानाही आपल्याच देशाची बदनामी करण्यात आघाडीवर असलेल्या आणि काही काळ सत्तेबाहेर राहण्याचा संयम ज्यांच्यात नाही, Rahul Gandhi in London त्यांच्या हाती जनतेने पुन्हा देशाची धुरा सोपवू नये, हाच धडा या सगळ्या घडामोडींमधून घेतला पाहिजे. २०२४ साली पुन्हा केंद्रातली सत्ता नरेंद्र मोदींकडेच सोपवायची आहे, ही भावना आतापासून प्रबळ ठेवायला हवी. कारण, राष्ट्रजीवन समृद्ध करणे ही नागरिक म्हणून आपलीच जबाबदारी आहे.