यासिन मलिक आणि पाकिस्तान !

yasin malik उच्च न्यायालयात आव्हान देणार

    दिनांक :27-May-2022
|
अग्रलेख
जम्मू-काश्मिरातील दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत मिळवून देणारा फुटीरतावादी नेता यासिन मलिकला yasin malik एनआयएच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मलिकला yasin malik शेवटच्या श्वासापर्यंत आता तुरुंगात राहावे लागणार आहे. मात्र, या शिक्षेमुळे देशातील जनतेचे काही प्रमाणात समाधान झाले असले तरी पूर्ण समाधान झाले असे म्हणता येणार नाही. कारण यासीन मलिकला yasin malik फाशीचीच शिक्षा व्हावी, असे देशभरातील राष्ट्रवादी जनतेला वाटत होते. त्यामुळे त्यांचा काही प्रमाणात अपेक्षाभंग झाला आहे.
 
 
yasin
 
राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही (एनआयए) मलिकला yasin malik  फाशीच द्यावी, अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती मान्य न करता मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता मलिकला yasin malik फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्याची घोषणा एनआयएने केली आहे. ती मान्य होते का हे लवकरच दिसणार आहे. यासिनला yasin malik देशाविरुद्ध युद्ध छेडण्याच्या, गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान रचण्याच्या तसेच देशविरोधी बेकायदेशीर कारवायात सहभागी असल्याच्या आरोपाखाली दोषी धरण्यात आले होते.
 
 
 
यासिन मलिक yasin malik हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे काम करीत होता. खो-यातील तरुणांना दहशतवादी कारवायात सहभागी होण्यासाठी तो भडकवत होता. काश्मीर खो-यातून काश्मिरी पंडितांना हुसकावून लावण्याचा आरोपही त्याच्यावर आहे. ‘द काश्मीर फाईल्स' The Kashmir Files या चित्रपटातून काश्मिरी पंडितांवर खो-यात कशा प्रकारचे अत्याचार करण्यात आले, त्यांच्या कशा निर्घृण हत्या करण्यात आल्या, याचे विदारक दर्शन घडविण्यात आले आहे. हा चित्रपट पाहणारे काश्मिरी पंडितांवरचे अत्याचार पाहून हादरून जातात. एका डोळ्यात अश्रू तर दुस-या डोळ्यात अंगार अशी स्थिती प्रत्येकाचीच होते. त्याक्षणी कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या हातात बंदूक असती तर त्याने समोर येणा-या दहशतवाद्यावर yasin malik आपली बंदूक रिकामी केली असती, यात शंका नाही.
 
‘द काश्मीर फाईल्स' या चित्रपटातून लोकांच्या तनामनात निर्माण झालेला संताप शांत होत नाही, तोच एनआयएच्या न्यायालयाने यासिन मलिकला yasin malik फक्त जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे लोकांच्या मनातील असंतोषाचा उद्रेक होणे स्वाभाविक होते. कारण यासिन मलिकचा गुन्हा हा अतिशय गंभीर असा आहे. आज रामशास्त्री प्रभुणेंसारखे न्यायाधीश असते, तर त्यांनी या गुन्ह्यासाठी मलिकला देहांत प्रायश्चित्तापेक्षा अन्य कोणतीही शिक्षा सुनावली नसती. मलिकने yasin malik पाकिस्तान तसेच अन्य मुस्लिम देशांतून दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा केला आणि तो दहशतवादी संघटनांना वाटला. विशेष म्हणजे मलिकने केलेल्या या देशविरोधी कृत्याची त्याच्या समर्थकांना लाज वाटायला हवी होती, पण न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावताच श्रीनगरमध्ये मलिकच्या yasin malik घराजवळ त्याचे समर्थक गोळा झाले आणि त्यांनी या शिक्षेविरुद्ध दगडफेक करीत संताप व्यक्त केला. परिणामी खो-यातील इंटरनेट सेवा रद्द करावी लागली.
 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३५ ए आणि ३७० कलम रद्द केल्यानंतर खो-यातून दहशतवाद आटोक्यात येईल, असे वाटत होते. पण यासिन मलिकच्या शिक्षेच्या निमित्ताने काश्मीर खो-यात अजूनही दहशतवादी आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत, याची खात्री पटली. खो-यातील या दहशतवाद्यांना तसेच त्यांच्या समर्थकांना लवकरात लवकर ठेचून काढले पाहिजे. ज्याप्रमाणे सापाला कितीही दूध पाजले तरी तो विषारी फूत्कार टाकण्याचे सोडत नाही, तसेच खो-यातील या दहशतवाद्यांच्या समर्थकांचे झाले आहे. याचाच अर्थ ३७० कलम रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय किती अचूक होता, याची खात्री पटली. ३७० कलम रद्द केले नसते, तर दहशतवाद्यांनी खो-यात किती नंगानाच घातला असता, याची कल्पना करवत नाही. यासिन मलिकला yasin malik झालेल्या शिक्षेमुळे पाकिस्तानला वाईट वाटण्याचे कारण नव्हते. पण पाकिस्तानने या शिक्षेविरुद्ध नाराजी व्यक्त केली.
 
यासिन मलिक yasin malik आणि पाकिस्तान यांचा काही तरी संबंध आहे. त्यामुळेच पाकिस्तानला मलिकला झालेल्या शिक्षेचे वाईट वाटले. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जबर धडा शिकवला होता, पण पाकिस्तानला अजूनही शहाणपण येत नाही, याचे आश्चर्य वाटते. ‘तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा' सारखे पाकिस्तानचे झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे बिघडलेले डोके एका सर्जिकल स्ट्राईकनंतर ठिकाणावर येत नाही. त्यासाठी आणखी काही सर्जिकल स्ट्राईकची गरज पडली तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. yasin malik पाकिस्तानने भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नये. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी जितक्या वेळा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल तो करण्याची भारताची तयारी आहे. तसे पाहिले तर पाकिस्तानसारख्या चिमूटभर देशाला जगाच्या नकाशावरून संपवणे भारतासाठी काही कठीण नाही. पण भारत तसे करत नाही, हे पाकिस्तानने आपले भाग्य समजले पाहिजे.
 
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानचा माजी कसोटीपटू शाहीद अफ्रिदीने shahid afridi ज्या प्रकारे मलिकची पाठराखण केली, ती धक्कादायक म्हटली पाहिजे. मानवाधिकार हननाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे मलिकला शिक्षा ठोठावण्यात आली, असे अकलेचे तारे अफ्रिदीने तोडले आहेत. yasin malik काश्मीरच्या आझादीचा आवाज यापुढे तुम्हाला दडपता येणार नाही, असा पोकळ इशाराही त्याने दिला. आपण काय बोलतो, कोणाची पाठराखण करतो, याचे भान अफ्रिदीने ठेवले नाही. क्रिकेटच्या धावपट्टीवर धावा काढण्याऐवजी अफ्रिदीने yasin malik दहशतवादाच्या धावपट्टीवर उतरण्याचा आणि निरपराधांचे बळी घेण्याचा निर्णय घेतला की काय, अशी शंका येते. अफ्रिदीच्या या आगाऊपणाला भारताचा कसोटीपटू अमित मिश्राने जशास तसे उत्तर दिले. yasin malik भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणत्याही सामन्याला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचे स्वरूप का येते, हे पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या अशा मानसिकतेवरून दिसून येते. खेळाडूंनी खेळाडूसारखे राहिले पाहिजे. आपल्या हातात बॅट शोभते, बंदूक नाही, याचे भान ठेवले पाहिजे.
 
yasin malik विशेष म्हणजे यासिन मलिकने न्यायालयात आपला गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच त्याच्या वकिलाने मलिकला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणीही केली होती. त्यामुळे आपल्याला गुन्ह्यात फसवले, असे म्हणायला मलिकला आता जागा आणि तोंडही उरले नाही. यासिन मलिकला आधी अटक आणि नंतर शिक्षा झाल्यामुळे तो पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे दिसून आले, पण असे समोर न आलेले अनेक पाकिस्तानी तसेच दहशतवाद्यांचे छुपे समर्थक भारतात मोठ्या संख्येत आहेत. yasin malik या सर्वांना हुडकून काढण्याची तसेच तुरुंगात डांबण्याची गरज आहे. देशाच्या अनेक भागात यासिन मलिक आणि दहशतवादी तसेच पाकिस्तानचे छुपे समर्थक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. yasin malik मध्यंतरी राजधानी दिल्लीत झालेली दंगल याच लोकांनी घडवून आणली होती, यात शंका नाही. आताही अयोध्येतील राममंदिरांचे बांधकाम तसेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर तसेच त्याला लागूनच असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणातून आढळलेली माहिती यामुळे देशातील मुस्लिमांमध्ये अशांतता आणि अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान भारतातील आपल्या छुप्या समर्थकांच्या माध्यमातून करणारच नाही, याची कोणतीही खात्री नाही. yasin malik त्यामुळे भारताने सावध राहण्याचीही गरज आहे.
 
असे किती यासिन मलिक yasin malik पाकिस्तानने भारतात पाठवले तरी ते भारताचे काहीही वाकडे करू शकणार नाही. yasin malik याआधी पाकिस्तानने भारतात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केला. देशात अनेक ठिकाणी दंगली आणि बॉम्बस्फोट घडवले. पण त्यातून भारताचे काही प्रमाणात तात्कालिक नुकसान झाले; मात्र भारताचे दीर्घकालीन नुकसान करण्याची पाकिस्तानची ताकद आणि औकातही नाही. त्यामुळे तसे स्वप्न त्याने दिवसाच काय रात्री झोपेतही पाहू नये. भारताशी कारण नसताना शत्रुत्व घेऊन पाकिस्तानने भारताचे नाही तर आपले स्वत:चेच नुकसान करून घेतले आहे. आपल्या हातानेच आपल्या पायावर दगड पाडून घेतला आहे. अशांत अस्थिर परिस्थितीमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. yasin malik महागाईचा आगडोंब तेथे उसळला आहे. राजकीयदृष्ट्या तेथे yasin malikकमालीची अस्थिरता आहे. त्यामुळे भारतासाठी खड्डे खोदण्याच्या नादात पाकिस्तान आपणच खोदलेल्या खड्ड्यात पडला आहे. भारताशी मैत्री करण्यात पाकिस्तानचा खरा फायदा आहे; भारताशी शत्रुत्व घेऊन नाही. त्यामुळे आता तरी पाकिस्तानचे डोळे उघडतील, अशी आशा आपण करू या.