निर्णायक वळणावर...!

raj thackerayशिवसैनिकांनाही ते पटणार नाही

    दिनांक :03-May-2022
|
अग्रलेख
raj thackeray महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रात तीन नेत्यांचे विचारमंथन जनतेसमोर येण्याचा योग आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एका दैनिकाच्या कार्यक्रमात आणि मुंबई विमानतळावरच्या कार्यक्रमात भाषण झाले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत भाजपच्या बुस्टर सभेत मुख्य भाषण झाले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे raj thackerayयांचे बरीच चर्चा झालेले भाषण संभाजीनगर येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या संवादात नवीन काही नव्हते. ‘बाळासाहेब ठाकरे भोळे होते आणि आपण धूर्त आहोत. बाळासाहेबांना भाजपने वेळोवेळी फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे,' असे त्यांनी नवीन सांगितले. नवीन यासाठी की बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांची इतकी बदनामी आजवर कोणी केली नसेल. बाळासाहेब भोळे होते आणि त्यांना फसवणे सहजशक्य होते हे नवीनच असले, तरी ते कोणालाही खरे वाटणारे नाही.
 
 
le
 
 
raj thackeray आज उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला ते सोयीचे असेल, पण खुद्द शिवसैनिकांनाही ते पटणार नाही. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात भाजप-सेना युतीची सूत्रे होती तोपर्यंत शिवसेनेची भूमिका मोठ्या भावाची होती; तितकी ताकद शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी निर्माण केली होती. आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याची ताकद हीच नेत्याची खरी ताकद असते. ती बाळासाहेबांमध्ये प्रचंड होती. त्यामुळेच त्यांचा दबदबा होता. त्यांचा शब्द अखेरचा निर्णायक शब्द असायचा. भाजपला त्यांनी कधीच शिवसेनेपेक्षा वरचढ, मोठे होऊ दिले नाही. raj thackeray याला भोळेपणा कसे म्हणता येईल? बाळासाहेब नेते होते तोपर्यंत भाजपने कधीच जागा वाटपात किंवा सत्तेच्या वाटपात झुकते माप घेतले नाही. कायम दुय्यम भूमिका घेतली. सतत उपमुख्यमंत्रिपद घेतले. मग भाजपने बाळासाहेबांना फसवले, असे कसे म्हणता येईल? शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती आल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेपेक्षा पुढे गेला. उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर जनादेशाचा अवमान करीत युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्रिपद मिळवले. याला उद्धव ठाकरे जर धूर्तपणा समजत असतील तर हा धूर्तपणा नसून संधिसाधूपणा आहे.
 
 
 
 
 
 
 
आणखी एक गोष्ट लक्षात आली की, जेथे देण्यासारखे उत्तर नसेल तेथे सरळ सरळ विषयांतर करून वेळ मारून न्यायचे एक तंत्र सुरू केले आहे. अशा ठिकाणी अडवून आपण विचारलेल्या प्रश्नाशी प्रामाणिक राहणारी पत्रकारिताही आता अजेंडा चालविण्याच्या काळात राहिलेली नाही. उद्धव ठाकरे यांना विचारले गेले की, ‘उत्तरप्रदेशात मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले अशी बातमी आहे. तेथे घडू शकते; मग महाराष्ट्रात का नाही?' त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘उत्तरप्रदेशात कोरोना काळात गंगा नदीत प्रेते तरंगली. महाराष्ट्रात कोरोनाचे नियंत्रण उत्तम झाले. अशी तुलना होऊ शकत नाही.' असाच एक प्रश्न शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना विचारला, ‘फडणवीस म्हणाले की, अयोध्येत बाबरी मशीद पडली तेव्हा ते तिथं होते आणि शिवसेनेचे कोणी नेते नव्हते; त्यावर तुमचे म्हणणे काय आहे?' त्यावर सफाईदारपणे विषय बदलत ते म्हणाले, ‘तो काही आताचा मुख्य मुद्दा नाही. आता महागाईपासून बेरोजगारीपर्यंत समस्या आहेत. (मोदींना थेट यात ओढता येत नाही हे लक्षात आल्याने) चीनची घुसखोरीसारखे विषय आहेत ते सोडून बाबरी बाबरी किती दिवस?'raj thackeray 
 
वास्तविक हा विषय मुख्यमंत्री ठाकरे यांनीच ‘आम्ही मशीद पाडली तेव्हा हे लोक बिळात बसले होते.' असे म्हणून काढला आहे. अशा प्रकारे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याची चतुराई जनतेच्या नजरेतून सुटत नसते, याचे भान हे राजकारणी ठेवत नाहीत. आपल्याला मूर्ख समजून नेते व्यवहार करतात हे जनतेला समजते आणि त्यावरची लोकांची प्रतिक्रियाही तिखट व तीव्र असते. देवेंद्र फडणवीस यांचे भाषण अधिक आक्रमक आणि मुद्देसूद होते. हनुमान चालीसा म्हणण्याचा मानस व्यक्त केला तर तो सरकार उलथवण्याचा डाव होता, असं सरकार सांगत आहे. raj thackeray तुम्ही रामाच्या बाजूचे आहात की रावणाच्या बाजूचे आहात, असा मार्मिक प्रश्न त्यांनी विचारला. कोणी विरोधात बोललं की कारवाई होते, कोणी विरोधात लिहिलं की कारवाई होते. ही तर अघोषित आणिबाणीच झाली, अशी टीका त्यांनी केली. raj thackeray मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करताना अधिकृतपणे नवाब मलिक यांचा फोटो छापला, हे निदर्शनास आणून ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं ‘वर्क फ्रॉम होम' माहीत होतं; पण आता ‘वर्क फ्रॉम जेल' सुरू झालं आहे की काय? मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पोलखोल यात्रा चालू असताना भाजपने आपल्या आक्रमक व्यूहरचनेचे रणशिंग या सभेतून फुंकले आहे.
 
फडणवीस यांचे भाषण संपले आणि तिकडे संभाजीनगरला राज ठाकरे raj thackeray मंचावर विराजमान झाले. प्रचंड गर्दी राज ठाकरे यांच्या या सभेला जमली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेची आठवण करून देणारी विक्रमी गर्दी हेच वैशिष्ट्य होते. राज ठाकरे यांनी आपला रोख शरद पवार यांच्यावर ठेवला होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून वाढलेला जातीय द्वेष, जेम्स लेन प्रकरणात बाबासाहेब पुरंदरे यांना विनाकारण दिलेला त्रास हे विषय त्यांनी त्यांच्या शैलीत घेतले. मशिदीवरचे भोंगे हा धार्मिक विषय नाही तर तो सामाजिक विषय आहे. त्या भोंग्यांचा त्रास सर्वच धर्माच्या लोकांना होतो. उत्तरप्रदेशात जर भोंगे काढले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात ते का होऊ शकत नाही? असे विचारत त्यांनी ४ मे नंतर जर भोंगे वाजले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा अधिक मोठ्या आवाजात वाजेल, असा इशारा देऊन टाकला. राज ठाकरे raj thackeray यांनी जो विषय हाती घेतला आहे तो अनेकांच्या मनातला विषय आहे. मात्र, त्यावर कृती काय करायची, याचा विचार करण्यापेक्षा सरकार पक्षाची मंडळी, राज ठाकरे यांच्या झालेल्या सभेत अटी मोडल्या काय आणि त्यावर काय कारवाई करता येईल, याचा जास्त विचार करीत आहेत.
 
राज ठाकरे raj thackeray यांच्या मागणीनुसार जर प्रार्थनास्थळावरील लाऊडस्पीकर काढायचे ठरले तर अनेक ठिकाणी मंदिरे, मठ यावर भजन, कीर्तन, जागरण गोंधळ यासाठी पण लाऊडस्पीकर्स लावता येणार नाहीत, अशी भीती घालण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणजे मशिदीवरचे भोंगे काढा असे म्हणताच तथाकथित सेक्युलॅरिस्टांना कोणाचीही तक्रार नसताना भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ यांना निर्बंध घालण्याचे सुचू लागले. विशेष म्हणजे ही भीती घालण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेचे नेते आघाडीवर आहेत. मुंबईच्या महापौर पेडणेकरबाई मोठ्या आवाजात हे सांगत होत्या. नवं सेक्युलर इतके कडवे असतील याचा हा अनुभव नवाच आहे. हे संतापजनक आहे. हिंदू raj thackeray म्हणतील की, ‘आम्ही आमचे कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मर्यादेतच कसे साजरे करायचे ते पाहू. मात्र, आमचा विचार न करता आधी मशिदीवरचे भोंगे बंद करून दाखवा.'
 
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील तीन काँग्रेसेतर नेत्यांची raj thackerayही तीन भाषणे होती. महाराष्ट्र निर्णायक वळणावर आहे. कोरोनाचा काळ संपला आहे. सत्तेची जबाबदारी न घेता लाभ मात्र पदरात पाडून घेण्याचा डाव काँग्रेस संस्कृतीतील दोन्ही पक्षांनी साधला आहे. शिवसेना वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी त्याला बळी पडली आहे. भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्ष म्हणून जबाबदारीसुद्धा अतिशय तात्त्विक आणि सैद्धान्तिक पातळीवर पार पाडत आणली आहे. raj thackeray अतिशय संयमाने विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस परिश्रम घेत काम करीत आहेत. आगामी काळात महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा अशा निवडणुका येत आहेत. परीक्षेचा काळ अभ्यास नसलेल्या विद्यार्थ्यांना नकोच असतो. त्यामुळे यात महापालिका निवडणुका जितक्या पुढे ढकलता येतील तितक्या पुढे ढकलण्याचे प्रयत्नही होत आहेत. सत्ताधारी शिवसेनेला सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची साथ हवी आहे. मात्र हक्काचा qहदुत्ववादी मतदारही हवा आहे. त्यामुळे जपून जपून हिंदुत्वाची बाजू घेणे; प्रसंगी विषयांतर करून मैदान बदलणे अशा कसरती चालू आहेत. raj thackeray प्रसार माध्यमे समाजाचे वैचारिक नेतृत्व करण्याची जबाबदारी साफ बाजूला ठेवून नफेखोरीत फायदेशीर मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रसारण एकसुरी आणि पक्षपाती झाल्याचे रोज जाणवते आहे. सुज्ञ जनता मूकदर्शक होऊन हे सगळे पाहते आहे. यावर निर्णय देण्याची वेळ येताच हीच जनता अतिशय अचूक निर्णय देत भारतीय लोकशाहीला जगातील सर्वात मोठी लोकशाही raj thackerayम्हटले जाते ते अधोरेखित करेल, यात काही शंकाच नाही!