रशिया-युक्रेन युद्धामध्ये सागरी आणि महासागरी युद्धाचे विश्लेषण

    दिनांक :08-May-2022
|
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
Russia and Ukraine रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपण्याऐवजी अधिक तीव्र होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रशियाला धक्के बसत आहेत. रशियाची युद्धनौका मोस्कवा काळा समुद्रात बुडाल्यानंतर रशियाला आणखी एक झटका बसला. युक्रेनमधील अनेक शहरं बेचिराख झाली असली, तरीदेखील राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हार मानली नाही. युक्रेनच्या सैन्यानं रशियन नौदलाला दुसरा धक्का दिला आहे. रशियाच्या तिसर्‍या रँकचे कप्तान आणि रशियन नौदलाचे लँडिग शिप सीजर कनिकोवचे कमांडर अलेक्झांडर चिर्वा यांना मारण्यात युक्रेनला यश आलं आहे. 24 मार्चला युक्रेनच्या संरक्षण दलाच्या वतीनं सीझर कुनिकोवला बर्दियास्क शहराजवळ दुर्घटनाग्रस्त केलं होतं.
 
 
russian-curise
 
Russia and Ukraine रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या 50 व्या दिवशी रशियन युद्धनौका मोस्कवा काळा समुद्रात बुडाली होती. युक्रेननं त्यांच्याकडील नेपच्यून क्षेपणास्त्राचा वापर करून मोस्कवाला आगीच्या भक्ष्यस्थानी पाडलं. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पहिल्या दिवसापासून मोस्कवा युद्धनौका चर्चेत होती. मोस्कवा युद्धनौकेचा वापर करून युक्रेनच्या 13 सैनिकांना मारण्यात आलं होतं. 13 सैनिकांच्या स्मरणार्थ वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक पोस्टल तिकीटदेखील जारी होतं. रशियन सैनिकांनी वेढा घातलेले युक्रेनचे मारियुपोल शहर आता रशियाच्या ताब्यात आहे. या युद्धामध्ये दोन्ही नौदलाच्या अनेक जहाजांना बुडवण्यात आलं आहे.
मीडियाचे लक्ष जमिनीवर चाललेल्या लढाईवर केंद्रित
Russia and Ukraine युक्रेन युद्धाला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, मीडियाचे लक्ष हे रशियन सैन्याच्या जमिनीवर चाललेल्या लढाईवर केंद्रित होते. सागरी किनारपट्टीवर काय झाले, याची फार माहिती पुढे आली नाही. गेल्या दोन महिन्यांमध्ये या लढाईमध्ये नेमके काय झाले? युक्रेन आणि रशियाच्या नौदलाची कारवाई कशी होती आणि येणार्‍या काळात नौदलाचे युद्ध कशाप्रकारे होऊ शकते, याविषयी आपण चर्चा करू. युक्रेनची ब्लॅक समुद्राला लागलेली किनारपट्टी ही 2 हजार 700 किलोमीटर आहे आणि यामध्ये अझोव्हचा समुद्र एक छोटा समुद्र कोण आहे; जो ब्लॅक समुद्राचा भाग आहे.
 
 
Russia and Ukraine 14 तारखेला मोस्कवा नावाचे रशियाच्या ब्लॅक फ्लिटचे सर्वात महत्त्वाचे जहाज बुडवण्यात आले. रशियाच्या म्हणण्याप्रमाणे, तिथे लागल्यामुळे आगीमुळे हे जहाज बुडाले. युक्रेनचे म्हणणे आहे की, दोन नेपच्यून क्षेपणास्त्रे फायर केली होती; त्यामुळे हे जहाज बुडाले. ब्लॅक समुद्राला मेडिटरेनियन समुद्राशी जोडणार्‍या सामुद्रधुनीचे नाव आहे, बॉस्फोरस आणि डार्डेनेल सामुद्रधुनी. मात्र, या सामुद्रधुनीवर तुर्कस्तानचा कंट्रोल आहे. तुर्कस्थान कुठल्याही लढाऊ जहाज आला तिथून जाण्याची परवानगी देत नाही. यामुळे लढाई संपेपर्यंत रशियाला इतर कुठूनही जहाजे आणून, बुडालेल्या जहाजाची बदली करता येणार नाही. या 20 हजार टन वजनाच्या जहाजाच्या बुडण्यामुळे विश्लेषकांमध्ये एक चर्चा सुरू झाली आहे की, मोठी जहाजे विरुद्ध क्षेपणास्त्र ज्यामध्ये प्रिसिजन गाईडेड क्षेपणास्त्र किंवा क्रूज मिसाइल्स किंवा हाईपर्सोनिक मिसाईल असतील. यामध्ये कोण जिंकेल? मिसाईल्स जिंकण्याची शक्यता फार जास्त आहे.
रशियन नौदलाची तैनाती
Russia and Ukraine रशियाच्या नौदलाची जहाजे ही चार महासमुद्रामध्ये पसरलेली आहेत, परंतु जानेवारी 2022 मध्ये युद्ध सुरू व्हायच्या आधी रशियाने ब्लॅक समुद्रामध्ये किंवा काळ्या समुद्रामध्ये आपली अनेक शक्तिशाली जहाजे तैनात केली. त्यांचे काम होते रशियन सैन्याला किनार्‍यावरून समुद्रातून दुसर्‍या शहराच्या दिशेने घेऊन जायचे किंवा ज्या लढाया जमिनीवर सुरू आहेत त्यांना फायर सपोर्ट द्यायचा आणि समुद्रावर गस्त घालून आपला व्यापार चालू ठेवायचा. रशियन नौदलाने या भागामध्ये सहा लँडिंग शिप आणले होते. उद्देश होता की, समुद्राच्या बाजूने जमिनीवर एमएफबीएस हल्ला करून युद्ध लवकर संपवायचे. महत्त्वाचे हे आहे की, युक्रेनला लाभलेल्या किनारपट्टीमध्ये रशियन नौदल पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे आणि कुठल्याही प्रकारची मदत युक्रेनला समुद्रातून होऊ शकत नाही. मेडिटेरियन/भूमध्य समुद्रामध्ये रशियाने नाटो आलायसच्या नौदलावर लक्ष ठेवण्याकरिता रशियाने आपली सर्वात मोठी जहाजे या भागात तैनात केली आहेत; ज्यामुळे नाटोची जहाजे युक्रेनला कुठल्याही प्रकारची मदत करू शकणार नाही.
युक्रेनची नौदले
Russia and Ukraine युक्रेनच्या नौदलाची संख्या 6500 नाविक आणि 90 ते 120 वेगवेगळ्या प्रकारची छोटी जहाजे आहेत. युक्रेनच्या सैन्याने त्यांच्याकडे असलेले सर्वात मोठे लढाऊ जहाज हेडमनला रशिया त्यावर कब्जा करेल म्हणून आधीच बुडवून टाकले. थोडक्यात युक्रेनची नौदलं हे केवळ रक्षात्मक कारवाई करू शकते आणि काही वेळा त्यांनी कमांडो रेड किंवा मिसाईल फायर करण्याकरिता त्यांचा वापर केला गेला आहे.
समुद्रामध्ये झालेल्या कारवाया
सुरुवातीला रशियन नौदलाने रुमानिया, अनामिया, ईस्टोनिया आणि बांगलादेशी व्यापारी जहाजांवर हल्ला केला. त्यामधला ईस्टोनिया हा नाटोचा सदस्य आहे, परंतु तरीही नाटोने फारशी कारवाई केली नाही. सध्या रशियाची 12 ते 24 जहाजे ब्लॅक समुद्रामध्ये आहे. या जहाजांचा मुख्य वापर मिसाईल लॉन्चर म्हणून करण्यात आला आहे. Russia and Ukraine रशियन नौदलाने क्रूस मिसाईल फायर करून, तोफांचा मारा करून किनार्‍यावर हल्ला करणार्‍या आपल्या सैन्याला फायर सपोर्ट दिला. रशियन नौदलाने अनेक ठिकाणी आपण एमएफबीएस हल्ला समुद्राच्या बाजूने करणार आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये रशियाची अनेक लँडिंग शिप फायर करून युक्रेनियन नौदलाने बुडवल्या.
या सगळ्यांपासून भारत काय शिकू शकतो?
Russia and Ukraine तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे दूरवर असलेल्या जहाजावर क्षेपणास्त्रांच्या मदतीने आकाशातून, जमिनीवरून आणि समुद्रामधून फायर करून त्यांना नष्ट करणे शक्य झालेले आहे. क्षेपणास्त्रांची मारक क्षमता अतिशय अचूक झाली आहे. कारण ते जीपीएस, लेझर गाईडन्स आणि इनरशियल नेविगेशन सिस्टीमसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. तिन्ही प्रकारची क्षेपणास्त्रे जी एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलू शकतात. म्हणून आपल्याला नेमकी किती क्षेपणास्त्रे पाहिजे, याकरिता तिन्ही दले म्हणजे भूदल, नौदल आणि हवाई दलांना एकत्रित विचार करावा लागेल. त्यानंतर क्षेपणास्त्रे बनविण्याकरिता लागणारे बजेट आणि तंत्रज्ञान गरजेचे असेल. चिनी सीमेवर येणार्‍या कुठल्याही आव्हानांना तोंड देण्याची आपली क्षमता असायला पाहिजे. ज्याप्रमाणे रशियाचे मोठे युद्ध जहाज बुडवले गेले त्यामुळे मोठी जहाजे नौदलात आल्यामुळे फायदा होईल की नुकसान, यावर चर्चा सुरू झाली आहे. मोठी जहाजे विरुद्ध क्षेपणास्त्रे या लढाईमध्ये क्षेपणास्त्रांना सध्या आघाडी मिळालेली आहे. जगातले सर्व देश चीन, रशिया, अमेरिका आणि भारत वेगवेगळ्या प्रकारच्या क्रूज क्षेपणास्त्रांवर संशोधन करून त्यांना आपल्या सैन्यात सामील करीत आहे.
 
 
Russia and Ukraine भारताला 7 हजार 600 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि आपल्याकडे दोन द्वीपसमूह आहेत. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावर चांगले लक्ष ठेवू शकतो. याचप्रमाणे लक्षद्वीप आणि मिनिकॉय ही अरेबियन समुद्र हिंदी महासागरावर आपले लक्ष ठेवते. लांबलचक किनारपट्टीमुळे आपण इंडो पॅसिफिक समुद्रावर लक्ष ठेवण्याची क्षमता प्राप्त करू शकतो. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे ज्यामध्ये बॅलेस्टिक मिसाईल किंवा क्रूझ मिसाईल किंवा हाईपर्सोनिक मिसाईल सामील आहेत, त्यावर वेगाने काम सुरू आहे.
 
 
थोडक्यात Russia and Ukraine रशिया आणि युक्रेन नौदलाच्या लढाईच्या पृष्ठभूमीवर भारताला आपल्या नौदलाच्या रचनेवर, डावपेचावर पुनर्विचार करावा लागेल. याशिवाय क्षेपणास्त्र विरुद्ध मोठी जहाजे, सॅटेलाईटच्या मदतीने समुद्रावर पूर्ण लक्ष ठेवणे, या वेगवेगळ्या बाबींचे विश्लेषण करून नौदलाकरिता किती क्षेपणास्त्रे किती छोटी किंवा मोठी जहाजे याचा अभ्यास करावा लागेल. आशा करूया की, नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती झाल्यावर या सगळ्या बाबींवर विचार केला जाईल.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
9096701253