मानवाधिकारांची संकुचित संकल्पना त्यागण्याची गरज

    दिनांक :08-May-2022
|
नुकतेच अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलेले भारताचे परराष्ट्रमंत्री S. Jaishankar एस. जयशंकर यांच्या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. इतर देशांच्या मानवाधिकारांच्या स्थितीवर आमचीही काही मते आहेत आणि त्यात अमेरिकेचाही समावेश आहे, असे ते म्हणाले होते. अमेरिकेत बसून भारताचे परराष्ट्रमंत्री असे विधान करतील, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. विशेषत: पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांच्या दृष्टीनेही हे विधान म्हणजे एक आश्चर्यकारक बाब होती. कारण त्यांनी स्वत:च मानवी हक्कांची एक विशिष्ट चौकट स्वत:साठी आखून घेतली होती. भारताच्या बदलत्या व आक्रमक परराष्ट्र धोरणाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष व्यवहारात स्पष्टपणे दिसून आल्याने भारतातील लोकांना अतिशय आनंद झाला. अमेरिकेसारख्या देशासमोरदेखील आम्ही ठाम आणि कणखर भूमिका घेऊ शकतो, हे भारताने दाखवून दिले. पण हा केवळ मुत्सद्दी डावपेचांचा विषय नाही. मानवाधिकार हे खरोखरच अधिकार आहेत की केवळ हित साधण्याची साधने आहेत, या दृष्टिकोनातून जगाला आता विचार करावा लागेल. परराष्ट्रमंत्री S. Jaishankar एस. जयशंकर यांच्या सूचक विधानामुळे या विषयावर विविध दृष्टिकोनातून विचारमंथन सुरू झाले आहे. कारण मानवी हक्कांबद्दल बोलताना किंवा सिव्हिल सोसायटीबद्दल बोलताना हे पाहिले पाहिजे की, तुमचा प्राधान्यक्रम नेमका काय आहे आणि तुमची विचारसरणी, संकल्पना काय आहेत आणि त्याहीपेक्षा त्याबद्दलचे ‘तत्त्वज्ञान’ काय आहे?
 
 
human-rights
 
S. Jaishankar जेव्हा हे तपासून पाहिले जाते त्यावेळी हा मुद्दा उपस्थित करणार्‍यांचा इतिहासही तपासला जातो की तुम्ही जे काही बोलत आहात, ते केवळ बोलण्यापुरतेच मर्यादित नाही. मग तुमची पृष्ठभूमी रक्तरंजित इतिहासाची, संस्कृतीची असेल तर तर तेही सर्वांच्या नजरेस पडते. मानवाधिकारांच्या बाबतीतही काहीसे असेच आहे की जे सर्वाधिक सल्ले देतात, अन्य लोकांवर डोळे वटारतात त्यांचीच कामगिरी या क्षेत्रात अतिशय वाईट आहे. या विषयाकडे दोन-तीन प्रकारे पाहिले जाऊ शकते. एक तर पाश्चिमात्य जगताचा वांशिक पक्षपात, भेदभावाचा घृणास्पद आणि रक्तरंजित इतिहास आहे आणि आधुनिक कालखंडात मानवाधिकारांना भांडवलशाहीचे धोरणात्मक साधन बनवले गेले आहे. दुसरे, चीनसारखे देश, जेथे साम्यवादाचा बुरखा पांघरून डाव्या कम्युनिस्टांपर्यंत मर्यादित भांडवलशाही आहे आणि उत्पादनाच्या महाकाय यंत्रात क्षणोक्षणी मानवाधिकार चिरडले जातात. रक्त आणि अश्रू वाहतात. पण याची बातमी बाहेरदेखील येत नाही. त्यानंतर तिसरा मानवाधिकाराचा प्रकार आहे; तो म्हणजे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म. जिथे मानवाधिकार अथवा मानवी हक्क एका विशिष्ट धर्म किंवा वर्गापुरते मर्यादित आहेत. कारण आपलाच धर्म श्रेष्ठ असून अन्य धर्मीय अथवा उपासना पंथीयांना मुळापासून चिरडून टाकण्याचे लिखित आवाहन हे त्यांच्या धर्मग्रंथाचाच एक भाग आहे. वरील सर्व संदर्भांचा विचार करून व्यापक परिघातून चर्चा करताना आपण प्रथम मानवाधिकार अथवा मानवी हक्कांच्या व्याख्येकडे पाहिले पाहिजे.
मानवाधिकार म्हणजे नेमके काय?
S. Jaishankar मानवाधिकारांच्या संदर्भात सर्वात प्रसिद्ध नोंदी म्हणून, 1215 चा इंग्लंडचा मॅग्ना कार्टा (इंग्रजी संवैधानिक विधीचा प्रारंभ करणारा दस्तऐवज, स्वातंत्र्याची महान सनद), 1628 हक्क याचिका, 1679 चा बंदी प्रत्यक्षीकरण अधिनियम अर्थात हेबियस कॉर्पस अर्थात कायदा, 1689 ची अधिकारविषयक सनद, 1789 ची फ्रान्सचा ख्यातनाम मानवी हक्कांविषयीचा जाहीरनामा तसेच 1779 ची अमेरिकेच्या स्वातंत्र्याची घोषणा यांच्याकडे पाहिले जाते. सोव्हिएत युनियन (रशिया) मध्ये 1936 मध्ये नागरी अधिकारांना घटनात्मक मान्यता प्रदान करण्यात आली. 1946 मध्ये जपान, 1948 मध्ये स्वित्झर्लंड, 1950 मध्ये भारत आणि 1954 मध्ये चीनमध्ये नागरी अधिकारांना घटनात्मक मान्यता प्रदान करण्यात आली. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेद्वारे मानवाधिकारांची सार्वत्रिक घोषणा करण्यात आली. त्यात मानवाधिकारांशी संबंधित 30 कलमांचा समावेश होता. मानवाधिकारांच्या सार्वत्रिक जाहीरनाम्याच्या कलम 2 उल्लेख करण्यात आला आहे की, जगातील सर्व मानवांना अधिकार आहेत. जात, रंग, लिंग, भाषा, धर्म, मालमत्ता, जन्म आणि राजकीय आणि सामाजिक मत किंवा दर्जा असा कोणताही भेदभाव न करता समाजाची स्थापना करणे हे त्यांचे मूळ कार्य आहे.
यामध्ये मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकार वर्णन केले आहेत
S. Jaishankar प्रत्यक्ष किंवा हेतुपुरस्सर- हे उल्लंघन एक तर सरकारद्वारे हेतुपुरस्सर असू शकते आणि किंवा सरकार उल्लंघन रोखण्यात अयशस्वी झाल्यामुळे होऊ शकते. उल्लंघन शारीरिकदृष्ट्या हिंसक असू शकते, जसे की पोलिसांचे क्रौर्य तसेच निष्पक्ष सुनावणीच्या अधिकारांसारख्या अधिकारांचे उल्लंघन केले जाऊ शकते; जेथे कोणतीही शारीरिक हिंसा समाविष्ट नाही. अधिकारांचे संरक्षण करण्यात सरकारचे अपयश- जेव्हा समाजातील व्यक्ती किंवा गटांमध्ये संघर्ष असतो तेव्हा हे घडते. जर सरकारने असुरक्षित जनता आणि गटांना संरक्षण करण्यासाठी काहीही केले नाही तर ही प्रतिक्रिया उल्लंघन मानली जाईल. या आधारावर पाहिले असता आज जे मानवाधिकारांचे ढोल जोरजोरात बडवत आहेत, त्यांनीच मानवाधिकारांची सर्वाधिक हत्या केली होती.
अमेरिकेत मानवी हक्कांचे उल्लंंघन
S. Jaishankar 2021 च्या मानवाधिकार अहवालानुसार, मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे पहिले 5 देश आहेत- इजिप्त, सीरिया, येमेन, चीन आणि इराण. यामध्ये अमेरिकेचे नाव नाही. परंतु, अमेरिका मानवाधिकारांच्या (विशेषतः वांशिक न्यायाच्या क्षेत्रात) वचनबद्धतेची पूर्तता करण्यात अपयशी ठरली आहे, असे मानवाधिकार संबंधित जागतिक अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेतील मानवाधिकार उल्लंंघनाची प्रकरणे डोळे उघडणारी आहेत. मोंटगोमरी येथे 1955 मध्ये एक कृष्णवर्णीय महिला रोझा पार्कने आपली बसण्याची जागा एका गोर्‍या माणसाला देण्यास नकार दिल्याने तिला तुरुंगात टाकण्यात आले. 21 फेब्रुवारी 1965 रोजी कृष्णवर्णीय मंत्री आणि मानवाधिकार कार्यकर्ते माल्कम एक्स यांची एका रॅलीत भाषण करताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी तडकाफडकी 5 कृष्णवर्णीयांना अटक केली. त्यापैकी दोघांना शिक्षा झाली. नेटफ्लिक्सवर आलेली मालिका या दोघांना माल्कम एक्स यांच्या हत्येचा आरोपी मानत नाही. मालिकेच्या या सादरीकरणामुळे अमेरिकन पोलिस पुन्हा एकदा हे प्रकरण नव्याने उघडत आहेत.
 
 
S. Jaishankar अलीकडेच घडलेली घटना. न्यू यॉर्कमधील रिचमंड हिलजवळ दोन शीख तरुणांची हत्या करण्यात आली होती. एप्रिलच्या प्रारंभी येथे एका वृद्ध शीख व्यक्तीवर हल्ला झाला होता. पगडी घालणार्‍यांना तेथे ओसामा बिन लादेन म्हणून पुकारण्यात येते. 2021 मध्ये इंडियाना राज्यात 4 शिखांच्या हत्येची घटनाही समोर आली होती. 5 ऑगस्ट 2012 रोजी अमेरिकेतील औक क्रीक शहरातील विस्कॉन्सिन गुरुद्वारामध्ये गोळीबार झाला होता; ज्यामध्ये 6 शिखांचा मृत्यू झाला होता. 2013 मध्ये कृष्णवर्णीय किशोरी ट्रेव्हॉन मार्टिनला गोळ्या घालणार्‍या जॉर्ज जिम्मरमॅनची निर्दोष मुक्तता केल्यानंतर सोशल मीडियावर ञ्च्लश्ररलज्ञश्रर्ळींशीारीींंशी या हॅशटॅगसह पद्धतशीर वर्णद्वेष मुळापासूनच संपुष्टात आणण्याची चळवळ सुरू झाली. हे आंदोलन 2014 मध्येही सुरूच होते. 25 मे 2020 रोजी जॉर्ज फ्लॉईड या 46 वर्षीय कृष्णवर्णीय माणसाला 20 डॉलरच्या बनावट बिलासाठी मिनिया पोलिसचा श्वेतवर्णीय पोलिस अधिकारी डेरेक चाऊविनने अटक करून 9 मिनिटांपर्यंत त्याची मान पायाखाली दाबून ठेवली; परिणामी श्वास न घेता आल्याने जॉर्जचा गुदमरून मृत्यू झाला. यानंतर तर वर्णद्वेषाविरुद्धचे हे आंदोलन अधिकच तीव्र झाले. अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये (पॅरिस आणि लंडन) ब्लॅक लाईव्ह्स मॅटर अंतर्गत पोलिसांचे क्रौर्य आणि वांशिक हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले.
 
 
S. Jaishankar अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इस्रायलमध्ये मानवी हिंसाचारासाठी केलेल्या शस्त्रास्त्रांची विक्रीदेखील मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचेही जागतिक अहवालाने मानले आहे. मानवी हक्कांशी संबंधित गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेलाही संयुक्त राष्ट्रसंघाने आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. स्टॉप हेट अगेन्स्ट एशियन अमेरिकन कॅम्पेन पोर्टलवर अमेरिकेत मार्च 2020 ते जून 2021 दरम्यान द्वेषाच्या गुन्ह्यांची (हेट क्राईम) 10905 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. त्यापैकी 4632 गुन्हे 2020 मध्ये आणि 6273 गुन्हे 2021 मध्ये नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियामध्येदेखील मूलभूत मानवाधिकारांचे उल्लंघन झाले असल्याचे यूएनएचआरसीला अनेक प्रसंगी आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध होऊनही ऑस्ट्रेलियात स्थलांतरित समुदायावरील क्रौर्याच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. ऑस्ट्रेलियातील स्थानिक अर्थात मूळनिवासी गटदेखील त्यांच्या मानवी हक्कांसाठी तसेच त्यांची संस्कृती, मालमत्ता, जमीन, कायदेशीर समानता आणि वांशिक समानतेसाठी आंदोलन करीत आहेत.
 
 
मानवाधिकारांच्या नावाखाली दानवाधिकार
काही लोकांनी मानवाधिकारांना आपल्या वर्चस्वाचे साधन बनवले आहे. काही जण राजकीय वर्चस्वाचे एक शस्त्र म्हणून मानवाधिकारांकडे बघतात तर काहींनी या मानवाधिकारांच्या आडून आपले दानवाधिकारही सिद्ध केले आहेत. ते मानवाधिकाराच्या नावाखाली नक्षलवाद्यांचे पुरस्कर्ते आहेत तर गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या 10 वर्षांत म्हणजे 2011 ते 2020 या काळात छत्तीसगडमध्ये 3 हजार 722 नक्षलवादी हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये 489 जवान आणि सुमारे 736 नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या 15 वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर देशभरात नक्षलवादी हल्ल्यात आतापर्यंत हजारो लोक आणि शेकडो पोलिसांचे प्राण गेले आहेत. या मारल्या गेलेल्या लोकांना मानवाधिकार नव्हते का? गेल्या 15 वर्षांत जगातील अनेक दहशतवादी संघटनांनी सुमारे 50,000 लोकांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. 1993 पासून आतापर्यंत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुमारे 1200 लोक ठार झाले आणि 100 हून अधिक पोलिस आणि लष्कराचे जवानही हुतात्मा झाले. दहशतवाद हा मानवाधिकारांसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सिद्ध होत आहे. दहशतवादाला मानवाधिकारांशी काही देणेघेणे नाही; उलट मानवाधिकार दहशतवाद्यांसाठी ढाल बनून पुढे उभे ठाकतात. परंतु, ‘अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’ सारख्या घोषणा देत दहशतवाद्यांचे उघडपणे समर्थन करणारे या देशात आहेत. पण प्रत्यक्षात जेथे खरोखरच मानवाधिकार पायदळी तुडविले जातात तेथे मात्र कुणी तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नाही.
 
 
सांस्कृतिक तत्त्वज्ञान महत्त्वाचे
S. Jaishankar जेव्हा भारत मानवाधिकारांबद्दल बोलतो तेव्हा असे म्हणण्याचा आधार आहे. कारण आम्ही केवळ ‘ब्लॅक लाईव्ह्स मॅटर’सारखी संकुचित विचारसरणी आणि निव्वळ राजकीय उद्दिष्टांसाठी करण्यात आलेल्या चळवळींपुरतेच मर्यादित नाही तर आम्ही ऑल लाईव्ह्स मॅटरबद्दल बोलणारे एक समाज आणि राष्ट्र आहोत. पाश्चात्त्य भांडवलशाही आणि त्यांच्या बरोबरीने वाटचाल करणार्‍या चर्चवर वसाहतवादी रानटीपणा आणि लाखो स्थानिकांच्या रक्ताचे डाग लागले आहेत तर इस्लामचा प्रचार करण्यासाठी लक्षावधी लोकांची हत्या झाली आहे. मात्र, भारताने नेहमीच ‘वसुधैव कुटुम्बकम’ आणि ‘सर्वे भवन्तु सुखिन:’चे तत्त्वज्ञान जगापुढे ठेवले आहे. काळ्या रंगाविषयी पाश्चिमात्य काहीही म्हणोत, आम्ही काळ्या रंगाला श्याम आणि माँ कालीच्या रूपात पूजत आलो आहोत. भलेही चर्च आणि इस्लाम लिंगाच्या आधारावर भेदभाव करतात, पण आम्ही स्त्रियांना कधीही पुरुषाच्या उपभोगाची वस्तू मानली नाही. जेव्हा मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा त्यामागचा इतिहासही तपासायला हवा, असे आम्ही म्हणतो. ही तपासणी अगदी मुळापासून व्हायला हवी आणि मला वाटते की, मानवाधिकारांचा एक नवीन जाहीरनामा असावा; ज्यामध्ये देशांच्या सांस्कृतिक तत्त्वज्ञानाचे आणि त्यांनी केलेल्या शोषणांचेदेखील वर्णन केले पाहिजे. भारतात जातीच्या आधारावर अराजकता असेल तर ते नाकारता येणार नाही, पण ती आपल्या समाजाने नेहमीच ठोकरून लावली आहे. पण पाश्चिमात्य देश यासंदर्भात अतिशयोक्ती करतात आणि त्याच्या नावाखाली लक्षावधी, कोट्यवधी लोकांच्या हत्येवर पांघरूण घालतात. आता या गोष्टी अजिबात मान्य करता येणार नाहीत.
 
 
किंबहुना तेच केले जाईल; जे भारताच्या प्रत्येक गावात, गल्ली- गल्लीत, कानाकोपर्‍यात चालते. येथे जेव्हा लोक आपल्या इष्ट देवतांची पूजा करतात तेव्हा ते ‘समस्त जिवांमध्ये सद्भावना असो, जगाचे कल्याण होवो’ अशा आशयाची उद्घोषणा करतात- ही मानवाधिकारांची सर्वात मोठी सनद आहे, सर्वात मोठी घोषणा आहे. भारत जेव्हा समस्त मानवांमधील सामंजस्याबद्दल बोलतो तेव्हा हे तत्त्वज्ञान माणसांच्या पलीकडे जिवंत जगापर्यंत पोहोचते. जगाने धार्मिक किंवा हितसंबंधांवर आधारित संकुचित संकल्पना सोडून देण्याची वेळ आली आहे. S. Jaishankar एस. जयशंकर यांचे वक्तव्य केवळ अमेरिकेकडे बोट दाखविण्यापुरते मर्यादित नाही तर जगाला दुराग्रह, निराशा आणि अन्याय याचा त्याग करून योग्य मार्गावर चालावे लागेल, जगाला भारताच्या मार्गावर चालावे लागेल, असे आवाहन त्यांनी या माध्यमातून केले आहे.

हितेश शंकर
- 8178816123