वाढत्या बेरोजगारी-महागाईत अर्थतंत्राची भरारी

    दिनांक :08-May-2022
|
अर्थचक्र
- महेश देशपांडे
अर्थव्यवहारांना मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे खूश व्हावं, नव्या तंत्रामुळे हे व्यवहार सुलभ होत असल्याचा आनंद बाळगावा की वाढत्या Unemployment-inflation बेरोजगारीमुळे, दरवाढीमुळे, अगदी रोजचं खाणंदेखील महाग होत असल्यामुळे धास्तावून जावं याचा निर्णय सध्या सामान्यजनांना घ्यावा लागत आहे. एकीकडे नेटफ्लिक्सचे हजारो कर्मचारी कामावरून काढले गेले असताना, हॉटेलमध्ये खाणं भलतंच महाग होऊ घातलं असताना दुसरीकडे स्विगी लवकरच ड्रोनच्या मदतीने फूड डिलिव्हरी सुरू करीत असल्याची बातमी आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे, लक्षवेधी विक्रीतंत्र अवतरत आहे, याचा आनंद आहेच; पण inflation महागाईने जीवाला घोर लावला आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नेटफ्लिक्सने अलीकडेच मार्केटिंगसंबंधित अनेक कर्मचार्‍यांना कामावरून कमी केलं आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला. कोरोना काळात नेटफ्लिक्सचे सबस्क्राईबर्स सर्वाधिक वाढले. कोरोना काळात कंपनीच्या सबस्क्राईबर्समध्ये कमालीची वाढ झाली होती; मात्र 2022 ची सुरुवात नेटफ्लिक्ससाठी फारशी चांगली झालेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सच्या सब्सक्राईबर्समध्ये मोठी घट झाली. ही दशकातली मोठी घट आहे. अमेरिकन ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सने अलीकडेच एका अहवालात नोंदवलं आहे की, 2022 च्या पहिल्या तिमाहीत आपण सुमारे दोन लाख तर तिसर्‍या तिमाहीमध्ये दोन दशलक्षांहून अधिक सब्सक्राइबर्स गमावले. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळेही कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे कंपनीने सात लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स गमावले. युजर्समधलं पासवर्ड शेअरिंग या तोट्यामागील एक कारण असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्यामुळे त्याच्या पेड सबस्क्रिप्शनमध्ये फारशी वाढ झालेली नाही. या व्यतिरिक्त नेटफ्लिक्सला डिस्ने प्लस हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओसारख्या इतर ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत कठोर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
 
 
sweegy-food-delivery
 
Unemployment-inflation मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्क्यांची घसरण झाली आहे. यानंतर शेअर बाजारातली किंमत सुमारे 40 अब्ज डॉलरने (सुमारे 3,05,320 कोटी रुपये) कमी झाली. कंपनीने अमेरिकेसह कॅनडामधले सुमारे सहा लाख सब्सक्राइबर्स गमावले. जानेवारीमध्ये कंपनीने दोन वर्षांमध्ये पहिल्यांदा मासिक सबस्क्रिप्शनमध्ये दरवाढ केली. त्यावेळी कंपनीने सांगितलं की, सध्याची परिस्थिती पाहता कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जगभरात नेटफ्लिक्सचे 222 दशलक्ष सब्सक्राइबर्स आहेत. याव्यतिरिक्त 100 दशलक्षांहून अधिक सब्सक्राइबर्स त्यांची खाते एकमेकांसोबत शेअर करतात. नेटफ्लिक्सच्या मते, पासवर्ड शेअरिंगमुळे कंपनीला अधिक तोटा सहन करावा लागत आहे. युजर्सना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने अनेक देशांमध्ये आपल्या मासिक प्लॅनच्या किमतीही कमी केल्या होत्या तसंच उत्पन्न वाढविण्यासाठी काही देशांमध्ये प्लॅनच्या किमतीतही वाढ केली होती; मात्र यामुळे कंपनीचं अधिक नुकसान झालं.
 
 
देशात गेल्या काही दिवसांमध्ये inflation महागाई सर्वोच्च स्तरावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक धक्का बसला असून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी भाववाढ करण्यात आली आहे. 1 मे पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर तब्बल 104 रुपयांनी महागला आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्याचा परिणाम आता हॉटेलमधील जेवणावर होणार असून हॉटेलिंगचा खर्च ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. लग्नामधलं जेवणदेखील inflation महागण्याची शक्यता आहे. आधीच इंधनाच्या दरांमुळे वाढलेल्या वाहतूक खर्चात व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीची भर पडल्यामुळे येणार्‍या काळात हॉटेलमधलं जेवण तसंच लग्नाचा खर्च वाढू शकतो. गेल्या दोन महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडरचे दर स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना थोडासा का होईना, दिलासा आहे; मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या एप्रिल महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 268 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या धक्क्यातून व्यावसायिक सावरत नाहीत; तोच रविवारी, 1 मे रोजी पुन्हा एकदा व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 104 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आता निळ्या रंगाच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत प्रति सिलेंडर 2355 रुपयांवर पोहोचली आहे. सिलेंडरचे दर वाढल्याने जेवणाचे दरदेखील inflation वाढण्याची शक्यता आहे.
 
 
Unemployment-inflation एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर 10 रुपयांपेक्षाही अधिक वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. दुसरीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा inflation वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मिठाई आणि बाजारात मिळणार्‍या इतर खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे व्यवसायातले मार्जीन कमी झाल्याची प्रतिक्रिया सध्या अनेक व्यापारी देत आहेत. इंधनाचे दर वाढत चालल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घसरण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेलची विक्री कमी होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे इंधनाच्या दरात झालेली भरमसाट वाढ; मात्र मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत वाढ झाली. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोल-डिझेलची मागणी 2.1 टक्क्यांनी वाढली; परंतु दुसरीकडे एलपीजी गॅसच्या मागणीत घट झाली. कोरोना काळात एलपीजी गॅसची मागणी वाढली होती; मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता एलपीजी गॅसच्या विक्रीत मासिक आधारावर 9.1 टक्क्यांची घसरण झाली आहे.
 
 
Unemployment-inflation एप्रिल महिन्यात घरगुती गॅसच्या मागणीत घट झाल्याचं समोर आलं आहे. घरगुती गॅसच्या किमतीमध्ये गेल्या 22 मार्च रोजी दरवाढ करण्यात आली होती. inflation दरवाढीनंतर घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला. घरगुती गॅसच्या किमतीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत्या inflation महागाईचा ताण ग्राहकांच्या खिशावर आल्याने गॅसच्या मागणीत घसरण झाली. मे महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलेंडर 104 रुपयांनी महागला आहे. इंधनाच्या दरात सुरू असलेल्या दरवाढीचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या देशात inflation महागाई सर्वोच्च स्तरावर आहे. खाद्यतेलापासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अनेक गोष्टींचे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. याचा परिणाम म्हणजे दैनंदिन वापरासाठी लागणार्‍या वस्तूंच्या मागणीत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच सुमारास एक लक्षवेधी बातमी समोर आली आहे. स्विगी ही ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी लवकरच सामानाच्या डिलिव्हरीसाठी ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची माहिती कंपनीच्या वतीने ब्लॉगवर देण्यात आली आहे. ग्राहकांना जलद गतीने सामानाची डिलिव्हरी पोहोचावी यासाठी इन्स्टामार्ट पुढील महिन्यापासून देशातल्या काही भागांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ड्रोनच्या मदतीने थेट घरापर्यंत होम डिलिव्हरी पोहोचवणं खूप कठीण आणि अडचणीचं आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ ड्रोनच्या मदतीने फूड डिस्ट्रीब्यूशन सेंटरपर्यंतच सामान पोहोचविण्यात येणार असल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं. सुरुवातीच्या टप्प्यात स्विगी ड्रोनच्या मदतीने डिस्ट्रीब्यूशन सेंटरपर्यंत सामान पोहोचविणार आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्यूशन सेंटरमधून स्विगीचे कर्मचारी संबंधित सामान ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचं काम करतील.
 
 
Unemployment-inflation कंपनी आपल्या व्यवसायामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करू इच्छिते. यासाठी कंपनीच्या वतीने ड्रोन तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली आहे. ड्रोनच्या मदतीने सामानाची डिलिव्हरी थेट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे; मात्र ते पहिल्या टप्प्यात शक्य नाही. त्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन कंपनी सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या डिस्ट्रीब्यूशन सेंटरपर्यंत ड्रोनच्या मदतीने सामानाची डिलिव्हरी पोहोचविणार आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्यूशन सेंटरमधले कर्मचारी सामानाची डिलिव्हरी संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचं काम करतील. म्हणजे भविष्यात आकाशातून सामानाची ने-आण करणारे ड्रोन दिसतील; मात्र सध्या तरी लगेचच हे ड्रोन घरापर्यंत डिलिव्हरी करताना दिसणार नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यात स्विगी आपल्या या पायलट प्रोजेक्टची सुरुवात बंगळुरू आणि दिल्लीमधून करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)