साप्ताहिक राशिभविष्य, 8 मे ते 14 मे 2022

    दिनांक :08-May-2022
|
साप्ताहिक राशिभविष्य 
 
 
saptahik
 
मेष-  खर्च व आरोग्याच्या तक्रारी
weekely-horoscope : या आठवड्याची सुरुवात काहीशी खर्चिक व प्रकृतिविषयक तक्रारींनी होऊ शकते. आरोग्याची कोणतीही तक्रार जाणवल्यास वेळीच उपाय योजले पाहिजेत. काहींना किरकोळ अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यावर वाहने सांभाळून चालवली पाहिजेत. वाहनाचा वेग आटोक्यात हवा. त्याचप्रमाणे वीज व आगीची उपकरणे सांभाळून वापरावीत. खर्च आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. नोकरी-व्यवसायात मात्र समाधानकारक यश मिळेल.
शुभ दिनांक - 9, 10, 11, 14.
 
 
वृषभ- आर्थिक कामांमध्ये यश
या आठवड्यात आपल्या नोकरी- व्यवसायात समाधानकारक व प्रगतीचे वातावरण राहील. मुलांच्याही प्रगतीच्या वार्ता कळतील. काही आर्थिक कामे पूर्णत्वास नेता येतील. आरोग्याच्या पातळीवर किरकोळ तक्रारी उद्भवण्याची शक्यता राहील तसेच जुने त्रास असलेल्यांनी औषध-पाणी-पथ्य व्यवस्थित सांभाळावयास हवे. बाहेरचे खाणे-पिणे, सवयी, व्यसनी राहणीमान आटोक्यात असावे. काहींना कुटुंबासह प्रवासास जाण्याचे योग आहेत.
शुभ दिनांक - 8, 10, 12, 13.
 
 
मिथुन- कार्यक्षेत्रात भरीव कामगिरी
weekely-horoscope : या आठवड्यातील ग़्रहमान पाहता नोकरी-व्यवसायात काही भरीव काम आपल्या वाट्यास येऊ शकते. अधिकारी वर्गाचीदेखील आपल्यावर मर्जी राहील. दरम्यान, काहींना आरोग्यासंबंधी किरकोळ तक्रारी निर्माण होऊ शकतात. बदललेल्या हवामानाचे परिणाम जाणवतील. काही आकस्मिक खर्च किंवा वेळेवर कार्यक्रम बदलल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान संभवते. उत्तरार्धात चांगले योग संभवतात. एखाद्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग राहील.
शुभ दिनांक - 8, 9, 12, 14.
 
कर्क- प्रवास, आप्तेष्टांच्या भेटीगाठी
काही कौटुंंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने होणारे प्रवास, पाहुण्यांचे आगमन, त्यात होणार्‍या आप्तेष्टांच्या भेटीगाठी यामुळे हा आठवडा आनंदात जावा. काहींना मात्र हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी त्रस्त करू शकतात तसेच काही जुन्या त्रासांचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. यामुळे आपल्या नोकरी-व्यवसायात काहीशी गैरसोय निर्माण होऊ शकते, त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे लाभदायक ठरेल.
शुभ दिनांक - 8, 9, 12, 13.
 
 
सिंह- व्यावसायिक कामांचा भरणा
weekely-horoscope : प्रामुख्याने आरोग्याच्या किरकोळ तक्रारींसह सुरू होणार्‍या या आठवड्यात आपल्यामागे व्यावसायिक कामांचाही भरणा लागलेला राहील. विशेषतः सरकारी कामांना वेग मिळेल. आपल्या कामाचे चीज होताना दिसेल. आरोग्याबाबत मात्र आपणास सतर्क राहण्याची गरज आहे. आहारादी सवयींबाबत अनियंत्रिक वागणे योग्य ठरणार नाही. हॉटेलिंग, पार्ट्यांमधील सहभाग, व्यसने सारे काही आटोक्यात असावे. एखादा तातडीचा प्रवास घडू शकतो.
शुभ दिनांक - 10, 11, 13, 14.
 
 
कन्या- अतिशय व्यग्रता, चिंता
हा आठवडा आपणास अतिशय व्यग्रतेचा, मानसिक चिंता व प्रसंगी मानाचा हिरमोड करावयास लावणारा ठरू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍यांना ताण-तणाव अनुभवास येईल. काहींना स्वतःच्या तसेच जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. या सार्‍यात आपणास मनाने खंबीर राहावयास हवे. कार्यक्रमांचे योग्य नियमन करून, संयमी भूमिका घेऊन वाटचाल सुरू ठेवावी. खर्चावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्‍यांची मर्जी सांभाळावी.
शुभ दिनांक - 8, 12, 13, 14.
 
 
तुळ- कामे तडीस जातील
weekely-horoscope : या आठवड्यात कर्म व आरोग्य, तंदुरुस्ती यांचा समतोल साधावा लागणार आहे. त्यामुळे नोकरी-व्यवसायात विशेषतः आठवड्याच्या मध्यात अतिशय व्यग्रता राहील. मित्रवर्ग आणि कुटुंबीयांचे लक्षणीय सहकार्य मिळेल. काहींना गुंतवणुकीतून चांगला लाभ संभवतो. आतापर्यंत प्रलंबित व्यावसायिक कामे तडीस जाऊ शकतील. प्रवासातूनही कार्यसिद्धी व्हावी. महिला वर्गाकडून विशेष लाभ संभवतो. या सार्‍यात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये.
शुभ दिनांक - 8, 10, 11, 14.
 
 
वृश्चिक- कुटुंबात आनंदाचे वातावरण
कला व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींना हा आठवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. कार्यक्षेत्राचा, व्यवसायाचा विस्तार करता येईल. त्यात सहकार्‍यांची मदत मिळून प्रगतीकडे वाटचाल करता येईल. संततीच्या प्रगतीनेही कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. काहींना लांबच्या प्रवासास जावे लागू शकते. तरुण वर्गास विवाहादी कार्य जुळण्याचे योग यावेत. महिलावर्ग व सहकार्‍यांकडून विशेष लाभ संभवतो. आर्थिक बाजू मजबूत राहील.
शुभ दिनांक - 9, 11, 12, 14.
 
 
धनु- प्रतिष्ठा-मानसन्मानाचे योग
weekely-horoscope : एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासह या आठवड्याची सुरुवात होऊ शकते. आपली आर्थिक बाजू या आठवड्यात मजबूत राहणार असून प्रसंगी अपेक्षित आर्थिक सहाय्यदेखील उपलब्ध होऊ शकेल. काहींना शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रतिष्ठा-मानसन्मानाचे योग लाभू शकतात. काहींना आरोग्याच्या किरकोळ तक्रारी संभवतात. कुटुंबात सहकार्याचे व आनंदाचे वातावरण राहील. अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात.
शुभ दिनांक - 10, 11, 13, 14.
 
 
मकर- सुखकर, आनंददायक प्रवास
विशेषतः प्रवासाचे, तीर्थाटनाचे योग, विदेश गमनासाठी प्रयत्नशील असणार्‍यांसाठी उपयुक्त योग हे या आठवड्याचे वैशिष्ट्य राहील. प्रवास सुखकर व आनंददायक ठरावा. काहींना मात्र आठवड्याच्या मध्यात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः जुन्या व दीर्घ स्वरूपाच्या तक्रारी असणार्‍यांनी योग्य काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहारात कोणावरही विसंबून राहू नये. पुरेशी खात्री करूनच मोठे आर्थिक व्यवहार तसेच गुंतवणुकीबाबतचे निर्णय घ्यावेत.
शुभ दिनांक - 8, 9, 12, 13.
  
कुंभ- आर्थिक घडी मजबूत
weekely-horoscope : आपली आर्थिक घडी मजबूत करणारा हा आठवडा ठरावा. व्यापार-व्यवसायाचा विस्तार करता येऊ शकेल. नोकरीत असणार्‍यांना पदोन्नती, आर्थिक लाभ, पदबदल, पगारवाढ असे योग संभवतात. काहींना प्रवास, बदली, स्थानबदल असाही योग येऊ शकते. मात्र, या दरम्यान आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. खाण्या-पिण्याच्या सवयी, पथ्ये सांभाळली पाहिजेत. हवामानातील बदल त्रासदायक ठरू शकतात. ज्येष्ठांनी औषधोपचाराकडे लक्ष दिले पाहिजे.
शुभ दिनांक - 8, 10, 11, 14.
 
 
मीन- मनातील योजनांना गती
weekely-horoscope : हा आठवडा आपणास उत्तम, प्रगतिकारक आणि प्रतिष्ठा-मानसन्मान वाढविणारा ठरू शकतो. आपल्या मनातील योजना कार्यान्वित करता येऊ शकतील. नोकरी-व्यवसायात कामाची चुणूक दिसू शकेल. आठवड्याच्या मध्यात मात्र विरोधकांचा काहीसा उपद्रव निर्माण होऊ शकतो. तसेच आरोग्याच्या किरकोळ तक्रारी बेजार करू शकतात. कुटुंबातील विशेषतः महिला वर्गाचे सहकार्य फायद्याचे ठरू शकेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
शुभ दिनांक - 8, 10, 12, 13.
 
मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746