वांझोटी आंदोलने; यश येणारच कसे?

Agni Path विरोधकांची आडकाठी ठरलेलीच आहे

    दिनांक :18-Jun-2022
|
अग्रलेख
Agni Pathकेंद्र सरकारने साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना भारतीय लष्करात सेवेची संधी देण्यासाठी आणलेल्या महत्त्वाकांक्षी ‘अग्निपथ' Agni Path योजनेविरुद्ध अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला असून विनाकारण हिंसाचाराचा आगडोंब माजवण्यामागे केंद्र सरकार अस्थिर करण्याचे अथवा नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचा निष्कर्ष निश्चितच काढला जाऊ शकतो. Agni Path कुठल्याही चांगल्या योजना आणा, विरोधकांची त्याला आडकाठी ठरलेलीच आहे. विरोधकांना सरकारच्या निरनिराळ्या योजनांबद्दल मत मांडण्याचा, सरकारला विरोध करण्याचा, अयोग्य निर्णय मागे फिरवण्यासाठी उपलब्ध आयुधांचा वापर करायचा अधिकार राज्यघटनेने दिलाच आहे. पण कुठल्या वेळी कुठली आयुधं आणि कोणत्या पद्धतीने वापरायची याचे ताळतंत्रच विरोधकांनी सोडल्यामुळे सरकारविरोधी आंदोलनात जाळपोळ, हिंसाचार, पोलिसांना लक्ष्य करणे, महिला आणि बालकांची कोंडी करणे असे प्रकार केले जात आहेत. Agni Path अशा प्रकारातून सरकारची नव्हे, तर विरोधकांचीच नाचक्की होत असून जनतेची ते सहानुभूतीही गमावत आहेत.
 

alekh  
 
गेल्या काही दिवसांपासून विरोधक प्रतिक्रियावादी झाल्याचे दिसत आहे. Agni Pathस्वतःचे कार्यक्रम आखायचे, त्यानुसार पक्ष संघटन वाढवायचे सोडून, निव्वळ सत्ताधा-यांनी घेतलेल्या निर्णयांविरुद्ध वांझोटी आंदोलने उभारण्यातच विरोधकांचा पैसा, वेळ आणि श्रम वाया जात आहे. त्यामुळे त्यांना यश येण्याची शक्यता नाही. आताही विविध राज्यांमध्ये Agni Path अग्निपथविरुद्ध जी आंदोलने सुरू आहेत, रेल्वेगाड्यांना आगी लावल्या जात आहेत, बसेस पेटवून दिल्या जात आहेत आणि वाहतुकीला अडथळे आणण्याचे प्रकार सुरू आहेत, ते सत्ताच्युत विरोधकांच्या नैराश्यातून, हे ठोसपणे सांगता येते. सरकारविरुद्ध असा एकाएकी आगडोंब उसळविण्यामागे दुसरे कुठलेच कारण दिसत नाही. मोदी सरकारला यंदा सत्तेत येऊन आठ वर्षे झाली असून सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेला देण्यासाठी देशभरात भारतीय जनता पक्षातर्फे जनजागरण सुरू आहे. Agni Path त्यासाठी सभा, संमेलने, मेळावे, चर्चा, मंथन, मिरवणुका, चाय पे चर्चा आदी कार्यक्रमांची आखणी संघटन पातळीवर केली जात आहे.
 
 
 
Agni Path विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. ना त्यांच्या सरकारमधील कुणा मंत्र्याला भ्रष्टाचाराबद्दल मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आले. Agni Path मोदी स्वतःच मंत्र्यांच्या कामकाजाचे नित्यनेमाने अंकेक्षण करीत असल्याने अकार्यक्षम मंत्र्यांना ते एका ठिकाणी थांबण्याचे निर्देश देतात आणि त्यांच्याऐवजी नव्या दमाच्या मंत्र्यांना संधी दिली जाते. खरे तर कामाची हीच योग्य पद्धती असल्याने मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत विकासकामांचे मजल्यावर मजले बांधले. Agni Path त्यामुळे ते देशातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय होत आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतीय राजनयिकांना, मुत्सद्यांना आणि विविध देशांच्या राजदूतांना जे महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यावरून मोदींच्या कामाच्या झपाट्याची कल्पना करता येते. Agni Path हीच बाब विरोधकांना खुपत आहे.
 
नरेंद्र मोदींमुळे अनेक नेत्यांची दोन नंबरची कामे बंद पडली आहेत. Agni Path अनेक नेते राजकीयदृष्ट्या बेरोजगार झाले आहेत. राजकारणात स्थान नसल्याने लोक त्यांना विचारेनासे झाले आहेत. मोदींच्या उत्कर्षाच्या पोटदुखीपायी अनेक नेते बेजार झाले आहेत. जिकडे तिकडे नवनव्या राजकीय आघाड्या तयार केल्या जात आहेत. तरीही विरोधकांना यश मिळताना दिसत नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही ममतांच्या बालेकिल्ल्याला धडक देत मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने ७० हून अधिक आमदार निवडून आणले. Agni Path राजकीय दंडेलीला आव्हान देत कमळ फुलवून आणताना राज्यातील विरोधी पक्ष म्हणून आमच्याशी गाठ आहे, असा इशाराही भाजपने ममतांना दिला. शेतकरी कायद्यांच्या वेळीही विरोधकांनी सरकारविरुद्ध रान पेटवून दिले होते. संसदेत विधेयक पारित करूनही विरोधक ऐकायला तयार नव्हते. कृषी कायदे लागू करण्यास त्यांचा विरोध होता. दिल्लीतील वाटा त्यांनी सीमेवर अडवून ठेवल्या. Agni Path सरकारला जेरीस आणण्यासाठी नाना क्लृप्त्या केल्या.
 
Agni Path रात्रीच्या वेळी थंडीत कुडकुडून अनेक आंदोलकांचा बळी गेल्याच्या कंड्या पिकविल्या गेल्या. या निमित्ताने मोदी सरकार अस्थिर करण्याचे मोठे प्रयत्न झाले. शेतकरी आंदोलनात जिहादी, माओवादी, नक्षली आणि खलिस्तानवाद्यांची मदत घेतली गेली. दिल्लीत लाल किल्ल्यावर २६ जानेवारीला तिरंग्याशेजारी खलिस्तानी झेंडा फडकवून भारताच्या सार्वभौमत्वालाही आव्हान दिले गेले. Agni Path अखेर मोदींनी कमीपणा घेत, जे कायदे शेतकरी हितासाठी म्हणून संसदेद्वारे पारित करवून घेतले होते, ते मागे घेण्याची घोषणा केली. या आंदोलनात भांडवलदार शेतक-यांचा विजय झाला आणि छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी पुन्हा दलालांच्या कचाट्यात सापडले. त्यांना त्यांचा शेती माल देशातील कुठल्याही मंडीत विकण्याचा जो पर्याय उपलब्ध झाला होता, तो कृषी कायदे रद्द झाल्याने हिरावला गेला. Agni Path कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीमागेही मोदी सरकार अस्थिर करण्याचेच कारस्थान होते आणि त्यासाठीची जी टूलकिट वापरण्यात आली होती, तिचे आंतरराष्ट्रीय संबंधही चौकशीअंती उघडकीस आले होते.
 
Agni Path अशाच प्रकारचे कारस्थान नागरिकता संशोधन कायदा पारित झाल्यानंतर आखले गेले आणि त्यात काँग्रेससह सर्व राज्यातील प्रादेशिक पक्ष सहभागी झाले. आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, तेलगू देसम, समता पार्टी, तृणमूल काँग्रेस, माकपा, भाकपा आदी देशभरातील विरोधी पक्ष या आंदोलनात सक्रिय झाले होते. या कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलन उभारले गेले आणि त्यासाठी मुस्लिम जिहादी आणि अतिरेकी संघटनांचेही समर्थन घेतले गेले. Agni Path याच आंदोलनात दिल्ली दंगलीची बीजे रोवली गेली; ज्यात अनेक निरपराध हिंदूंची हत्या झाली आणि अनेकांच्या संपत्तीची राखरांगोळी झाली. अनेक दिवस सरकारला वेठीस धरले गेले. आंदोलकांसाठी जी रसद येत होती, त्यांचे मूळ जेव्हा शोधले गेले तेव्हा ते थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचले. Agni Path त्यामुळे या आंदोलनाला असलेले मुस्लिम जिहादी तत्त्वांचे समर्थन उघडकीस आले. कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन हवी की ऑफलाईन असा प्रश्न जेव्हा उभा ठाकला, तेव्हा काही समाजकंटकांनी ऑफलाईन परीक्षेला विरोध करून महाराष्ट्रातील विविध शहरात एकाच दिवशी आंदोलन पुकारून जाळपोळ केली. Agni Path त्या कारस्थानांमागेही सरकार अस्थिर करण्याचेच प्रयत्न होते. विरोधकांनी हिंसक आंदोलनाचे सत्र देशातील विविध भागात चालू ठेवले. कोरोनाकाळ किती कठीण होता हे आपण साèयांनी बघितले आहे. सा-या जगालाच कोरोनाने पेचात पाडले होते, तिथे भारताची एकट्याची काय डाळ शिजणार? Agni Path 
 
पण, त्या पडत्या काळातही मोदींनी ज्या धैर्याने कोरोनाविरुद्ध लढा दिला, ज्या त्वरेने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या, व्हेंटिलेटर्स निर्मितीला चालना दिली, पीपीई किट ज्यांचे भारतात उत्पादनच होत नव्हते, तिच्या उत्पादनास आपण सुरुवातच केली नाही तर निर्यातीचे उच्चांक गाठले. Agni Path कोरोनासाठी आवश्यक असलेल्या औषधी गोळ्यांची निर्यातही आपण मोठ्या प्रमाणात केली. रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्मितीत भारताने घेतलेली आघाडी आणि कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड लसींच्या निर्मितीत जागतिक कंपन्यांना माघारी टाकून भारताने मिळविलेले अग्रेसरत्व आपण अनुभवले. Agni Path लसीकरणामध्येही भारताने जागतिक उच्चांक स्थापित केला. Agni Path तब्बल १७५ कोटी लोकांचे लसीकरण ही सहजसाध्य बाब नव्हती, पण एका ध्येयाने पछाडलेल्या आणि या देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनापासून वाचविण्याच्या उद्देशाने मोदींनी लसीकरण सफल करून दाखविले. मोदींच्या याच गुणांमुळे विरोधकांना त्यांच्यातील कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध नाही. Agni Path त्यामुळे चांगल्या कामातून नव्हे, तर हिंसक मार्गाने मोदींना बदनाम करण्याचे कारस्थान वेळोवेळी आखले जात आहे. Agni Path पण अयोग्य नियोजनामुळे ही सारी आंदोलने असफल ठरत आहेत. Agni Path त्यामुळे विरोधकांनी कितीही आदळआपट केली, तरी त्यांना नजीकच्या भविष्यात सफलता नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.