ओ.एन.डी.सी.:गेमचेंजर आयडिया !

ONDC Platform ऑनलाईन शॉपिंग जोरात धावतंय

    दिनांक :18-Jun-2022
|
दृष्टिक्षेप
- उदय निरगुडकर
ONDC Platform आपण कोरोना काळात असंख्य प्रकारच्या संकटांमधून गेलो, पण त्या काळात आपल्याला काही चांगल्या सवयीदेखील लागल्या. ONDC Platform वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य जपणं, वर्क फ्रॉम होम work from home अशा अनेक सवयींचा आपण नव्याने पुरस्कार केला. आता कोरोना जवळपास संपुष्टात येत असताना त्यातल्या किती सवयी टिकतील, हे सांगता येत नाही. पण, कोरोना काळात लागलेली ऑनलाईन शॉपिंगची ONDC Platformसवय कोरोना संपुष्टात येत असताना कायम आहे; ती आमच्या जीवन पद्धतीचा भाग बनली आहे; किंबहुना वाढत आहे. मग ऑनलाईन शॉपिंग ONDC Platform व्यवसायात खासगी गुंतवणूकदार आले, तांत्रिक उद्योजक आले. त्यांनी या क्षेत्रातून अक्षरशः सोनं पिकवलं. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन होता. इंटरनेटचं कनेक्शन होतं आणि आता ऑनलाईन शॉपिंग ONDC Platform जोरात धावतंय.
 

shopping  
 
प्रथम हे मेट्रो शहरांमध्ये आलं, स्थिरावलं, फोफावलं; मग जिल्हा स्तरावर पसरलं. आता काही तालुक्याच्या ठिकाणी ऑनलाईन शॉपिंग ONDC Platform वाढत चाललंय. इथेही प्रत्यक्ष खरेदीऐवजी ऑनलाईन शॉपिंग ONDC Platform ही जीवन पद्धती बनत आहे. आता एखादी शोरूम काढायची तर जागा, सजावट, कर्मचारीवर्ग, मांडणी अशा शेकडो गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तीच गोष्ट हॉटेलची. आता त्यात भर पडली ती लोकांना घरपोच सेवा देणा-या वस्तू पुरविणा-या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची! जेवढी शोरूम अथवा हॉटेल असणं महत्त्वाचं, तेवढ्याच तोडीचा तगडा ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ONDC Platform ही नवी व्यावसायिक गरज बनली. तोच आजच्या व्यवसायाचा फंडा आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, डंझो, झोमॅटो हे ‘खुल जा सिम सिम' सारखे परवलीचे शब्द बनले. अगदी लखनौमध्ये बनणा-या चपला असोत किंवा कांचीपुरमला बनणारी कांजीवरम साडी असो वा ओडिशामधलं संबळपूर सिल्क असो, प्रत्येकाला ऑनलाईन ONDC Platform येणं अत्यावश्यक बनलं. अस्तित्व आणि व्यवसायवृद्धी दोन्हींसाठी ते गरजेचे बनलं. कोरोना काळानंतरही हे असंच चालू राहणार अशीच चिन्हं आहेत.
 
 
 
या क्षेत्रातली सर्वात मोठी घडामोड सध्या घडतेय आणि त्यामुळे या क्षेत्राचं चित्रच पालटणार आहे. ते म्हणजे ONDC Platform ओ. एन. डी. सी. येतंय. आता सरकारच्या मदतीने ‘ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स हा प्लॅटफॉर्म तुमच्या सेवेला सादर होतोय. वस्तू अथवा सेवा किती छोटी अथवा मोठी असो, वस्तूचा ब्रँड कितीही मोठा अथवा छोटा असो, तुमच्याकडे स्वतःचा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म असो वा नसो; या सगळ्या तांत्रिक झंझटीतून मुक्तीचा मार्ग आता सरकारच सादर करतंय. सरकारी पाqठब्यावर चालणारं ओ. एन. डी. सी. ONDC Platform आता आकाराला येतंय. आज ई-कॉमर्स ही जागा दादा ब्रँड्सनी व्यापली आहे. ज्यांच्याजवळ पैसे आहेत, डिलिव्हरी मेकॅनिझम आहे, त्यांची मक्तेदारी निर्माण होतेय. परंतु सरकारी पाठींब्यावर चालणारा ओ. एन. डी. सी प्लॅटफॉर्म ONDC Platform ही एक प्रकारे ई-कॉमर्स क्षेत्रातल्या लोकशाहीकरणाची सुरुवात मानायला हवी. म्हणूनच हे निव्वळ थरारक नाही तर आजमितीला अत्यावश्यकही आहे. लक्षात घ्या, आजही भारतातले ९० टक्के किरकोळ विक्रेते केवळ ऑफलाईन मोडवर आहेत. म्हणजे प्रत्यक्ष खरेदी-विक्रीवरच त्यांच्या व्यवसायाचं अस्तित्व अवलंबून आहे. याचा अर्थ ग्राहकाला त्यांच्या दुकानात अथवा हॉटेलमध्ये प्रत्यक्ष जाऊन सेवा-सुविधा-वस्तू घ्याव्या लागतात. ONDC Platform भारत ही जगासाठी अत्यंत आकर्षक अशी बाजारपेठ आहे. इथे जसे जगप्रसिद्ध ब्रँड आहेत तसे ओळख आणि सामर्थ्य नसणारे छोटे विक्रेतेदेखील आहेत.
 
ONDC Platform आता या सर्वांना तांत्रिक झंझटी ओलांडून बिग ब्रँडशी स्पर्धा करीत आपल्या ग्राहकांपर्यंत ऑनलाईन डिलिव्हरी मोडमध्ये जाणं सहज शक्य होणार आहे. अशा प्रकारे त्यांचा प्रत्यक्ष कॉमर्समधून होणारा ई-कॉमर्समधला प्रवेश ही आजच्या घडीला बाजारातली सर्वात मोठी क्रांती म्हणायला हवी. तुम्ही छोटे विक्रेते असाल तर आपलं नाव या ओ. एन. डी. सी. प्लॅटफॉर्मवर ONDC Platform सर्व माहितीसकट रजिस्टर करायचं. पुढचं काम तो प्लॅटफॉर्म करेल. तुम्हाला मोठ्या ब्रँडशी स्पर्धा करण्याचं बळ देईल. लेव्हल प्लेईंग फिल्ड म्हणजे समान संधी देईल. आहे की नाही ही मोठी क्रांती? अशा प्रकारे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्या एकाधिकारशाहीला आता सरकारी पाठबळाचं आव्हान निर्माण होणार हे उघड आहे, पण हे तांत्रिकदृष्ट्या टिकेल का? ज्या तांत्रिक टीमने आधार किंवा युपीआय भारतात यशस्वीपणे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवलं, ते तंत्रज्ञ, उद्योजक यावर काम करीत आहेत. नंदन नीलकेणी यांच्यासारख्या एका अत्यंत विश्वासू, टेक्नोक्रॅटचं नाव यात आघाडीवर आहे. आर. एस. शर्मा सरकारी कमिटीचे प्रमुख आहेत. ONDC Platform त्यांनी मिळून एक ओपन सोर्स तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ही आताच्या घडीची बेस्ट टेक्नॉलॉजी नाही तर ती ‘नेक्स्ट टेक्नॉलॉजी' आहे. विज्ञान तंत्रज्ञानात ‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग महत्त्वाचं! सरधोपट मार्गाने काम करण्यापेक्षा नव्या वाटा धुंडाळत केलेलं डिसरप्शन महत्त्वाचं आहे. आता नेमकं तेच घडतंय. इथेच ई-कॉमर्सची परिभाषा बदलतीय.
 
ONDC Platform पूर्वी दादा मंडळींनी या प्रक्रियेत दुस-या स्पर्धकांसाठी भरपूर अडथळे निर्माण केले होते; ते सर्व आता कोसळून पडणार आहेत. मग छोट्या विक्रेत्यांच्या सेवा वस्तूंच्या अचूक डिलिव्हरीचं काय? त्याची काळजी ओ. एन. डी. सी. प्लॅटफॉर्म घेणार. यात ग्राहक अशा किरकोळ विक्रेत्यांना पैसे कसे देणार? तर, त्याचीही काळजी हाच डिलिव्हरी प्लॅटफॉर्म घेणार आणि किरकोळ विक्रेत्याच्या बँक खात्यावर ते पैसे वर्ग करणार. ONDC Platform ग्राहकाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर प्रस्थापित ब्रँड नव्हे तर आता शेकडो पर्याय तितक्याच ताकदीने पुढे येणार. म्हणजेच आजपर्यंत ऑनलाईन शॉपिंग म्हणजे विक्रेत्यांचा प्लॅटफॉर्म होता. आता तो ग्राहकांचा प्लॅटफॉर्म बनणार आहे. विश्वास बसत नाही ना, हे खरंच घडतंय ना, असा प्रश्न तुमच्या मनात आला असणार. सध्या दिल्ली, बंगळुरू, भोपाळ, शिलाँग, कोईम्बतूर या पाच शहरांमध्ये हा प्लॅटफॉर्म कार्यरत आहे. अर्थात तो मर्यादित स्वरूपात आहे. ONDC Platform लवकरच तो अमर्याद सेवा वस्तू घेऊन शंभर शहरांमध्ये जोरदार आगमन करणार आहे. अर्थातच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट असे दादा ब्रँडही या प्लॅटफॉर्मवर यायला उत्सुक आहेत. पण मग हे गावागावातले किरकोळ विक्रेते आणि ग्राहकापर्यंत कसं पोहोचणार? ONDC Platform दर पाचव्या गावामागे एका गावात आपल्याकडे सरकारी कॉमन सव्र्हिस सेंटर आहे. त्यासाठी कनेक्टिव्हिटी आहे. तिथे आज प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. अनेक प्रकारच्या सेवा, सल्ले, वस्तू आणि शिक्षण केंद्रं या कॉमन सव्र्हिस सेंटरमधून ग्रामीण भारतात उभी राहताहेत. अशी लाखो सेंटर्स आता कार्यरत आहेत. ONDC Platform (या कॉमन सर्व्हिस सेंटर्सची उभारणी, त्यांचं बिझनेस मॉडेल, मार्केटिंग लिंकेजेस, प्रशिक्षित मनुष्यबळ, यांचं प्रशिक्षण मी दहा वर्षांपूर्वी केलं आहे.)
 
आता या सेंटर्समधून जशी धान्याची विक्री होणार, तशीच लग्नासाठी पत्रिका जुळवून देण्याची सोयही असणार आणि तसाच शेतक-याला ट्रॅक्टरसुद्धा खरेदी करता येणार. ONDC Platform एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून विक्रेता विविध प्लॅटफॉर्मवर असला, तरी त्याचा शोध घेऊन ती माहिती क्षणार्धात तुमच्यासमोर पोहोचणार. तुमच्या गरजेची आणि लोकेशनची माहिती त्या विक्रेत्यांपर्यंत पोहोचणार. तुम्ही ग्राहक म्हणून एका प्लॅटफॉर्मवर असलात आणि विक्रेते दुस-या प्लॅटफॉर्मवर असले, तरी आता ते सर्व ओ. एन. डी. सी.च्या माध्यमातून एकत्र आल्यामुळे ग्राहकांच्या संख्येत आणि विक्रेत्यांच्या संख्येतही लाखोंनी वाढ होणार, यात शंकाच नाही. विश्वास बसत नाही ना? ONDC Platform लक्षात घ्या, युपीआय येण्याआधी क्रेडिट कार्डने पेमेंट करणाèयांची अथवा इंटरनेट बँqकगच्या माध्यमातून व्यवहार करणा-यांची संख्या दरमहा २ कोटी ५० लाख एवढी होती. युपीआय आल्यामुळे या सगळ्याचाच एक प्रचंड विस्फोट झाला. दरमहा तब्बल ५०० कोटी व्यवहार व्हायला लागले. ONDC Platform यामुळे प्रचलित व्यवस्थेतले कोणीही बाद झाले नाही, तर त्या व्यवस्थेच्या हजारो शक्यता वाढल्यामुळे मार्केट बघता बघता फोफावलं. आता हे ओ. एन. डी. सी. ऑगस्टपासून तुमच्या सेवेला येतंय. ONDC Platform ते जसं जास्तीत जास्त विक्रेत्यांपर्यंत पोहोचणार तसंच जास्तीत जास्त ग्राहकांना सामावून घेणार.
 
ONDC Platform अमेरिका, चीनमध्ये ऑनलाईन शॉपिंग नियंत्रित करण्यासाठी कायदे बनवावे लागले. इथे भारतीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक जबरदस्त बदल घडून येतोय. हे सगळं विकेंद्रित पद्धतीने होणार आणि ओ. एन. डी. सी. फक्त त्या खरेदी-विक्रीच्या प्रोटोकॉल्सवर लक्ष ठेऊन असणार. सर्व काही सुरळीत होत आहे की नाही यावर ते लक्ष ठेवणार. ONDC Platform प्रत्येक व्यवहार गुप्त राहील, ग्राहकाची माहिती इतरांना उपलब्ध होणार नाही यासाठी इथे नोंदी इनक्रिप्टेड असतील. या सगळ्यामुळे पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये भारतीय बाजारपेठेचं चित्र पूर्णपणे बदललेलं असणार. ONDC Platform स्पर्धेची ठिकाणं बदललेली असणार, मुळात स्पर्धाच बदललेली असणार. ONDC Platform खेळ बदलला की खेळाचे नियमही बदलतात. भारतीय बाजारपेठेत एक गेमचेंजर आयडिया आलीय. त्याचा फायदा सर्वांना होणार आहे.