काश्मिरात माहिती युद्ध जिंकण्याची गरज

    दिनांक :19-Jun-2022
|
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
Information war : काश्मीरमध्ये 150-200 दहशतवादी असल्याचे अनेक वर्षांपासून आपल्याला सांगितले जात आहे. दरवर्षी लष्कर 150-200 दहशतवाद्यांना ठार मारते. पुन्हा नवीन दहशतवादी तयार होतात आणि दहशतवाद सुरूच राहतो. दक्षिण काश्मीर उग्रवाद आणि दहशतवादाचे केंद्र आहे. तेथून प्रवास करीत असताना एक दृश्य वारंवार समोर येते; तरुण काश्मिरी मुले, पुरुष स्मार्ट फोनकडे टक लावून, डोके वाकून चालत असतात. ते देशातील तरुण पुरुषांपेक्षा काही वेगळे नाहीत; त्यापैकी बहुतेक वापरत असलेले स्मार्ट फोन तसाच असतो. मात्र, त्यांच्या Information war मोबाईलमध्ये शुद्ध, विषारी प्रचार येत असतो.
 
 
information-war
 
Information war : काश्मीरमधील स्मार्ट फोनमध्ये येणारा मजकूर धक्कादायक आहे. त्याचा प्रतिकार करण्यासाठी देशाकडे रणनीती नाही. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सचा वापर केवळ चकमकीच्या ठिकाणी दगडफेक करणार्‍यांना गोळा करण्यासाठी केला जात नाही, तर दहशतवाद्यांना सुरक्षा दलांच्या हालचालींबाबत इशारा देण्यासाठीही केला जातो. तरुण नेहमी फिरत असतात. जर त्यांना लष्करी छावणीच्या गेटमधून सैन्याचा ताफा निघताना दिसला, तर संदेश ताबडतोब प्रसारित केला जातो- वाहनांची संख्या, हालचालीची दिशा आणि सैन्याची संख्या.
काश्मीर खोर्‍याचे कट्टरपंथीकरण
Information war : काश्मीर खोर्‍याचे प्रचंड वेगाने कट्टरपंथीकरण होत आहे. एकट्या अनंतनागमध्ये 500 हून अधिक मदरसे आहेत. त्यावर देखरेख ठेवली जात नाही. मात्र मुलांना काय शिकवायचे हे तेच ठरवतात. असे हजारो मदरसे संपूर्ण काश्मीरमध्ये आहेत. धार्मिक शिक्षणाच्या शाळांमध्ये शिक्षक काश्मिरी राहिलेले नाहीत; ते देवबंद येथील आहेत. जमात-ए-इस्लामीचे हस्तक आहेत. या मदरशांमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना जिहादचा महिमा शिकविला जातो. बनावट ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजेस हजारो कट्टर तयार करतात; ज्यांना पाकिस्तानचे समर्थन आहे. ब्लॉग, व्लॉग्स, संगीत, व्हिडीओ आणि साहित्य काश्मिरींच्या मनात विष ओतण्यासाठी तयार केलेला हा संपूर्ण मोठा उद्योग आहे आणि येणारी माहिती, उच्च-गुणवत्तेची, व्यावसायिक सामग्री आहे. इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स, पाकिस्तानी सशस्त्र दलांची जनसंपर्क शाखा ही या ई-जिहादची जननी आहे. त्यांनी तयार केलेली विषारी सामग्री काश्मीरच्या तरुणांच्या स्मार्ट फोनवर उतरते. मोठ्या प्रमाणावर ब्रेनवॉशिंग होत आहे.
न संपणारे चक्र सदैव सुरू
आम्ही ज्या ज्या वेळी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होतो तेव्हा परदेशी दहशतवाद्यांशी चकमक होणे सामान्य होते. अफगाण, सुदानी, पाकिस्तानी हे काही स्वर्ग शोधण्यासाठी भारतात आले होते. त्यांनी काश्मिरी महिलांवर बलात्कार केला. अनेक निर्दोषांना ठार मारले. कालांतराने परकीय अतिरेक्यांचा महापूर थांबवण्यात सैन्याला यश मिळाले. आता काश्मीरमधील बहुसंख्य दहशतवादी स्थानिक आहेत. पाकिस्तान काश्मीरमधील तरुणांना जिहादच्या नावाखाली कट्टरपंथी बनवत आहे. हे तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होतात. त्यांच्या मनात दुसरा विचार येऊ नये म्हणून त्यांची छायाचित्रे शस्त्रे घेऊन Information war सोशल मीडियावर प्रसारित केली जातात. सुरक्षा दलांना ही छायाचित्रे मिळाल्यावर या व्यक्तींना चिन्हांकित केले जाते. सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला की, मोठ्या अन्त्यसंस्काराचे आयोजन केले जाते. ही अन्त्ययात्रा म्हणजे भरती मेळावा! हे न संपणारे चक्र सदैव सुरू असते. उग्रवाद सुनिश्चित करते की, काश्मीरमध्ये नवीन दहशतवाद्यांचा सतत प्रवाह चालू असतो; ते आपल्याच घरात वाढतात आणि त्यांच्या सभोवतालच्या परिसरात मिसळण्यास सक्षम असतात. दहशतवाद्यांची संख्या कमी होत नाही. कारण मारलेल्या दहशतवाद्यांची जागा नवीन दहशतवादी घेतात.
माहिती युद्ध लढण्यासाठी
Information war माहिती युद्ध (IW)) हे युद्धाचे शस्त्र म्हणून ओळखले जाते. मात्र, माहिती युद्ध अतिशय कमजोर पद्धतीने लढले जात आहे. काश्मीरमध्ये आपल्याला भेडसावणार्‍या बहुतांश समस्यांना सोशल मीडिया कारणीभूत आहे. त्याचा मुकाबला आपण खूप पूर्वीपासून करायला हवा होता; जो आम्ही केला नाही. आज काश्मीरमध्ये Information war माहिती युद्ध लढण्यासाठी ते जिंकण्याची गरज आहे. एका वेगळ्या संस्थेची, ज्याचे नेतृत्व लष्करी अधिकारी करतील, त्यांच्या हाताखाली हजारो, कार्यकर्ते आणी तदन्य असतील, ज्यांचे सरासरी वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल. आम्हाला सामग्री लेखक, व्हिडीओग्राफर, विशेष प्रभाव तज्ज्ञ, व्हिडीओ संपादक, हॅकर्स, सोशल मीडिया तज्ज्ञ, संशोधन विद्वान, इस्लामिक धर्मशास्त्रातील तज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, गीतकार आणि संगीतकार सर्व एकाच छताखाली हवे आहेत. त्या इमारतीत रेकॉर्डिंग स्टुडिओ, सर्व्हर रूम, आयटी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, हायस्पीड इंटरनेट, सामग्री निर्मिती आणि सोशल मीडियाशी संबंधित सर्व उपकरणे असतील. आज आपल्याला देशासाठी काम करणार्‍या काश्मिरी मुस्लिम स्त्री-पुरुषांची गरज आहे. हजारो कार्यकर्ते जे भारताची कहाणी (Narrative) सांगण्यासाठी दररोज कार्यरत असतील.
 
दुष्प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी सामग्रीची निर्मिती
हजारो ट्विटर हँडल, फेसबुक प्रोफाईल, इन्स्टाग्राम खाती, ब्लॉग, व्लॉग, वेबसाईट्स आणि व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्स तयार करणे आवश्यक आहे; जे भारतसमर्थक सामग्री तयार करतील. दुष्प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी सामग्रीची निर्मिती, आपल्या देशाची Information war माहिती देण्यासाठी आणि स्थानिक काश्मिरी माध्यमांचे व्यवस्थापन ही तीन तत्काळ आव्हाने आहेत. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर जाणे ही काळाची गरज आहे. प्रतिकथनाचा (Counter narrative) काश्मिरी मीडियामध्ये पूर येणे महत्त्वाचे आहे; ज्यामध्ये दुष्प्रचार वाहून जाईल. खोर्‍यात राहण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी तुम्हाला काश्मिरी असणे आवश्यक आहे. काश्मीर खोर्‍याबाहेरील भारतीय पत्रकार श्रीनगरमध्ये राहिल्यास त्यांना इजा होण्याची किंवा मारले जाण्याची भीती वाटते. त्यामुळे भारतीय प्रसारमाध्यमे थोडे घाबरून बातम्या देतात. बहुतेक स्थानिक काश्मिरी माध्यमे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मागे लपून अफवा, टोमणे आणि खोटे बोलतात. स्थानिक काश्मिरी माध्यमे पाकिस्तान/ हुर्रियतच्या प्रचार शाखेप्रमाणे वागतात. अनेक पत्रकार पाकिस्तानच्या वेतनावर असतात. डीडी काशीर फारसे काही करत नाही. खाजगी काश्मिरी टीव्ही चॅनेल्स ही निकडीची गरज आहे. खाजगी एफएम चॅनेल्स काश्मिरी जीवनाचा एक भाग बनल्या पाहिजेत. दोन्ही ऑडिओ आणि व्हिडीओ सामग्री संपूर्ण व्हॅलीमध्ये लाईव्ह बीम करणे आवश्यक आहे. त्यातील बहुतांश वेबआधारित असणे आवश्यक आहे. भारताची गोष्ट सांगणारी काश्मिरी आणि उर्दू वृत्तपत्रे सुरू करावीत. आवश्यक असल्यास ते विनामूल्य वितरित करावेत. देशाला टीव्ही, प्रिंट, रेडिओ, वेब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काश्मिरी जनतेशी संवाद साधावा लागेल.
आधुनिक अभ्यासक्रम
जमात-ए-इस्लामीद्वारे अर्थसहाय्यित मदरसे बंद केले करून त्यांच्या जागी आधुनिक अभ्यासक्रम असलेल्या शाळा आणल्या पाहिजेत. काश्मीरमध्ये असलेला उग्रवाद मानसिक आजार आहे. आपण बेफिकीर राष्ट्र झालो आहोत आणि हा वेडेपणा, उग्रवाद काश्मीरमध्ये पसरू दिला आहे. पण याचा आता शेवट झाला पाहिजे. केवळ मंत्रालये, गुप्तचर संस्था आणि विभाग हे युद्ध लढू शकत नाहीत. त्यांच्याकडे पुरेशी क्षमता किंवा समज नाही. पौगंडावस्थेतील आणि तरुण प्रौढांनी, नियमांचे पालन न करणार्‍यांनी हे Information war माहिती युद्ध चालविले पाहिजे. लष्कराने या ऑपरेशनवर देखरेख ठेवली पाहिजे. आता पुन्हा एकदा भारतीय लष्कराला बोलावण्याची वेळ आली आहे. फरक एवढाच असेल की, यावेळी लॅपटॉप घ-47 ची जागा घेईल. इतिहास साक्षी आहे; भारतीय लष्करापेक्षा कोणीही इतके कार्यक्षम नाही. भारतीय लष्कर ही एकमेव अशी संस्था आहे की, ते काम करू शकतात. ते कोणतीही सबब देणार नाही; विलंब करणार नाही. तुम्ही K-47 ने एखाद्या विषारी कल्पनेला मारू शकत नाही. फक्त एक कल्पना (Narrative) एखाद्या कल्पनेला मारू शकते. काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेली मनाची लढाई जिंकायची असेल तर आपली बाजू मांडणार्‍या प्रतिकथनाची गरज आहे. मनाच्या लढाई जिंकण्यासाठी आपण स्वतःला खथ साधनांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे . 2000 च्या सुरुवातीपासून माहिती युद्धाविषयी लिहिले जात आहे, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. शत्रूचा प्रचार आणि माहिती युद्धात पराभव केला पाहिजे. सोशल मीडियाची लढाई पीओके आणि पाकिस्तानमध्ये पोहोचली पाहिजे. या लेखाच्या पुढच्या भागांमध्ये माहिती युद्ध जिंकण्यासाठी अजून काही कल्पना पुढे मांडल्या जातील. पुरेसे प्रयत्न केले तरच हे Information war माहिती युद्ध जिंकता येईल.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
9096701253