योगाभ्यास ठरतोय मोलाचा!

World Yoga Dayयोगामुळे ज्ञान विकसित होतं

    दिनांक :19-Jun-2022
|
आसमंत
- प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव
 
World Yoga Day दोन-सव्वा दोन वर्षांपूर्वी कोरोनाची लाट आली. त्याची तीन आवर्तनंही झाली. या लाटेच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेली अनेक घरं आजही चाचपडत जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. गमावलेले लोक परत येणं शक्य नसलं, तरी त्या आघातातून धडा घेत, जगण्याचा नवा, निरामय अर्थ समजलेले सुजाण नागरिक आरोग्य रक्षणासाठी आपल्या प्राचीन परंपरेकडे वळत आहेत. योगाभ्यास करणा-यांची संख्या वाढत आहे. World Yoga Day  योगगुरूंकडून प्रत्यक्ष धडे घेणं शक्य नसलं, तरी ऑनलाईन पद्धतीनं योगासनं करणा-यांचं प्रमाण लक्षणीय आहे. थोडक्यात, कोरोनाची आपत्ती ही इष्टापत्ती समजून काहींनी आपल्या विस्कळीत जीवनशैलीला आकार देण्याचा, योगाभ्यासाच्या सूत्रामध्ये दिवस बांधण्याचा प्रयत्न केला आहे. World Yoga Day या सकारात्मक परिस्थितीमध्ये साजरा होणारा यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस निश्चितच महत्त्वपूर्ण म्हणायला हवा. विशेषत: कोरोनाची चौथी लाट येण्याचे संकेत मिळत असताना याचं महत्त्व नव्याने जाणून घेण्याची गरज आहे. World Yoga Day साथीच्या आजाराला अथवा कोणत्याही अस्वास्थ्याला रोगप्रतिकारक क्षमता कमी असणारे लवकर बळी पडू शकतात. म्हणूनच आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर द्यायला हवा. World Yoga Day प्राणायाम, भस्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी आणि उद्गिथ यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सोबतच अश्वगंधा, शतावरी, आवळा, कोरफड, गिलॉय, तुळस आदी औषधी वनस्पतींमुळेही शरीराची आजारांशी, जंतूंशी लढण्याची क्षमता वाढते.World Yoga Day 
 
 
baba
 
World Yoga Dayअश्वगंधाच्या औषधी गुणधर्मांबाबत आम्ही बरंच संशोधन करीत आहोत. याबाबतची कागदपत्रं जगातल्या आघाडीच्या वैद्यकीय जर्नलकडेही पाठविण्यात आली. कोरोना विषाणूचं प्रथिन माणसाच्या शरीरातल्या प्रथिनांमध्ये मिसळल्यानंतर शरीरभर पसरतं आणि विविध अवयवांवर प्रभाव टाकू लागतं. World Yoga Day यामुळे अवयव निकामी होऊन माणसाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, अश्वगंधामधला मिथेनॉल हा घटक या विषाणूच्या प्रथिनांचा माणसाच्या शरीरातल्या प्रथिनांशी होणारा संपर्क टाळतो. म्हणजेच हा घटक या दोहोंमध्ये भिंत उभी करतो. मधुमेहींसाठी गिलॉय प्रभावी ठरू शकतं. यासोबतच कपालभाती, मंडुकासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वक्रासनामुळेही लाभ मिळू शकतात. त्यातही प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोमसारखे श्वसनाशी संबंधित व्यायाम मधुमेहींना कोरोनाविरोधात संरक्षणात्मक कवच देऊ शकतात. हृदयरुग्णांनी अनुलोम-विलोम, भ्रामरी, उद्गिथ केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. World Yoga Day कोरोनामुळे होणा-या मृत्यूंचं विश्लेषण केल्यास मधुमेही, हृदयरोगी, अस्थमाग्रस्त तसंच रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असणा-यांची संख्या अधिक असल्याचं लक्षात येतं.World Yoga Day मात्र, असे रुग्ण योगा आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून स्वत:चा बचाव करू शकतात.
 
 
 
योगासनं केल्यामुळे ब-याच आजारांपासून बचाव होऊ शकतो. World Yoga Day प्राणायाम हा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. प्राणायाम हा अत्यंत सोपा व्यायाम प्रकार असून कोणत्याही वयोगटातली व्यक्ती प्राणायाम करू शकते. यासाठी फार तयारी करावी लागत नाही. सतरंजी किंवा चटईवर बसून शांतपणे प्राणायाम करता येईल. इतकंच नाही, तर खुर्चीवर बसून किंवा चालता-फिरतानाही प्राणायाम करता येतं. World Yoga Day प्राणायाममध्ये दीर्घ श्वास घेऊन जलद गतीने सोडावा लागतो. प्राणायामाने श्वसनसंस्था बळकट होते. शरीरातली प्राणवायूची पातळी वाढायला मदत होते. प्राणायामाच्या लाभांबाबतही आम्ही बरंच संशोधन केलं आहे. World Yoga Day दररोज सकाळी उठल्यानंतर दोन ते पाच मिनिटं प्राणायाम, दोन मिनिटं भस्रिका प्राणायाम, प्रत्येकी पाच मिनिटं कपालभाती आणि अनुलोम-विलोम केल्यास शरीराची शक्ती वाढू शकेल. अनुलोम-विलोम हृदय, मेंदू तसंच मज्जासंस्थेसाठी प्राणायाम सर्वोत्तम आहे.
 
World Yoga Day तुम्ही आजवर कधीही योगा, प्राणायाम केला नसला, तरी काळजी करू नका. योगाचे लाभ मिळायला बराच काळ लागेल, हा समजही चुकीचा आहे. World Yoga Day प्राणायाम सुरू केल्यानंतर सकारात्मक प्रभाव त्वरित दिसू लागतो. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथीच्या औषधांप्रमाणेच प्राणायामही त्वरित लागू पडतो. World Yoga Day श्वसनसंस्थेशी संबंधित आजार प्राणायामाने दूर करता येतात. कोणताही विषाणू आपल्या श्वसनसंस्थेवर हल्ला चढवत असताना धोका टाळण्यासाठी प्राणायाम सुरू करता येईल. भस्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, उद्गिथ, शीतली आणि शीतकारी हे प्राणायामाचे सात प्रकार आहेत. World Yoga Day हे प्राणायाम दररोज केल्यास नक्कीच संरक्षण मिळेल. प्राणायामामुळे शरीरातल्या प्लेटलेट्सचं संतुलन साधलं जातं. सोबतच हार्मोन्सही संतुलित होतात. तुम्हाला प्राणायामचे असंख्य लाभ मिळतात.
 
योगाबद्दल सांगायचं तर हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हायला हवा. World Yoga Day योगामुळे काय होत नाही? नियमित योगासनं केल्यास विविध आजारांना प्रतिबंध घालता येतो. इतकंच नाही, तर आजार बरा करण्याची क्षमता योगामध्ये आहे. यामुळे शारीरिकच नाही तर मानसिक आजारही दूर होऊ शकतात. योगामुळे तुमचं आत्मबल, मनोबल, शरीरबल आणि बुद्धिबल वाढतं. आयुष्यातली अशक्य वाटणारी उद्दिष्टं साध्य करण्याचं बळही योगामुळे मिळतं. World Yoga Day रुग्णांसाठी योग एक उपचार पद्धती आहे तर सर्वसामान्यांसाठी योग ही जीवनशैली आहे. योगा हे विशिष्ट प्रकाराचं कर्मकांड qकवा पूजेची पद्धतही नाही. अध्यात्माशी जोडलं जात असलं, तरी योगाला शास्त्रीय आधार आहे. तुम्हाला १५ ते २० किलो वजन कमी करायचं असेल तर योगाभ्यास सुरू करा. World Yoga Day उच्च रक्तदाबाची औषधं कायमची आणि पूर्णपणे बंद करायची इच्छा असेल तर योग सुरू करा. याही पुढे जाऊन मी म्हणेन की रोगमुक्त, व्यसनमुक्त, औषधमुक्त व्यभिचार-दुराचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगाचा आधार घ्यायला हवा. रोगमुक्त आयुष्य हा योगामुळे मिळणारा प्राथमिक लाभ आहे.
 
World Yoga Day अधिक विस्ताराने सांगायचं तर आपली सूर्यमाला या प्रचंड मोठ्या ब्रह्मांडाचा एक छोटासा भाग आहे. आपल्या आकाशगंगेत ४० हजार कोटी सूर्य आहेत. इतकंच नाही, अशा जवळपास दोन लाख कोटी आकाशगंगा आहेत. आपल्या शरीरातल्या छोट्यातल्या छोट्या पेशीमध्ये एका सेकंदात काही लाख प्रकारच्या क्रिया-प्रक्रिया सुरू असतात. हे सगळं रहस्यमय आहे. हे रहस्यमय जग समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे योग. World Yoga Day योग ही जीवन आणि जगातली गहिरं सत्य जाणून घेण्याची एक प्रक्रिया आहे. शरीरापासून सुरू होणारा योगाचा प्रवास पुढे मन, प्राण, आत्मा आणि परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो. योग म्हणजे नराचा नारायण, जीवाचा ब्रह्म होण्याची साधना. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यापैकी एक शारीरिक तर दुसरा मानसिक आहे. तिसरा पैलू आध्यात्मिक आणि आपल्या आत्म्याशी जोडला आहे. हे आपल्या चेतनेचे बहुविध पैलू आहेत. World Yoga Day आपलं शरीर कोणत्याही रहस्यापेक्षा कमी नाही. आपल्याला येणारी झोप, मेंदूचं-मूत्रqपडाचं कार्य थक्क करून सोडतं. झोपेत असतानाही शरीरातला प्रत्येक अवयव आपलं कार्य करत असतो. हे सगळं कसं काय घडतं, असा प्रश्न आपल्याला पडत असतो.
 
आपलं शरीर निरोगी असणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. World Yoga Day कोरोनामुळे आपल्याला निरोगी शरीराचं महत्त्व लक्षात आलं आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या, यशस्वी व्यक्तीच्या निरोगी असण्याला जास्त महत्त्व आहे. World Yoga Day व्यक्ती कितीही यशस्वी, श्रीमंत असेल, तिने विश्वविजय मिळविला असेल; मात्र शरीर साथ देत नसेल तर या सगळ्या वैभवाचा काहीच लाभ होत नाही. अशा व्यक्तीला कॅन्सर झाला किंवा मूत्रपिंडं, यकृत निकामी झालं, हृदयविकाराचा झटका आला तर अशा जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही. World Yoga Day म्हणूनच सर्वात आधी आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला हवं. सर्वांनी बलवान, बळकट व्हावं असं मला वाटत नाही. पण प्रत्येकाने निरोगी राहायला हवं, अशी माझी इच्छा आहे. World Yoga Day तुम्ही बारीक असा वा स्थूल, निरोगी राहणं गरजेचं आहे. योगामुळे शरीर निरोगी राहायला मदत होतेच; मात्र त्याही पलीकडे आपलं मन निरोगी राहतं. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. योगामुळे आपल्या आत दडलेलं ज्ञान विकसित होतं. आपल्या मेंदूची क्षमता प्रचंड आहे. World Yoga Day आपण एक लाखांपेक्षा अधिक पुस्तकांमधलं ज्ञान मेंदूत साठवून ठेवू शकतो. मेंदूच्या विकासात योग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. योगा आपली बौद्धिक चेतना जागवतो. आपल्या हुशारीला नवी धार चढते. मन चंचल असतं. या चंचल मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा करायला हवा. World Yoga Day सध्याच्या शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य बिघडण्याच्या काळात योगसाधनाच योग्य मार्गावर नेऊ शकते.
 
(योग दिनाचे महत्त्व विषद करणा-या रामदेव बाबा यांच्या एका मनोगतातला भाग)