रविवार, 19 जून ते शनिवार, 25 जून 2022

    दिनांक :19-Jun-2022
|
साप्ताहिक राशिभविष्य  
 
मेष : अनपेक्षित खर्चाचे प्रसंग
weekely-horoscope : या आठवड्यात आपल्या वाट्याला काहीशी अस्थिरता व मनाचा त्रागा निर्माण करणारी ग्रहस्थिती येऊ घातली आहे. सुदैवाने आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार असली, तरी अनपेक्षित खर्चाचे प्रसंग उद्भवण्याचा धोका आहेच. प्रवासात त्रास, नुकसान, फसवणूक होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणदेखील भाऊबंदकीतील वादामुळे काहीसे त्रासदायक राहील. स्थावरसंबंधी कामात विलंब किंवा अपयश दर्शवीत आहे. नोकरीत हितशत्रूंच्या कारवाया वाढतील.
शुभ दिनांक - 19, 20, 22, 23.
 
 
Saptahik rashibhavishy
 
वृषभ : कार्यक्षेत्रात सुखवृद्धी व्हावी
या आठवड्यात लाभलेली ग्रहस्थिती पाहता आपल्या कुटुंबात व कार्यक्षेत्रात सुखवृद्धी करणारा हा काळ ठरू शकतो. उत्तम आत्मविश्वास लाभून आपला संघर्ष निश्चितच अपेक्षित यश पदरी पाडणार आहे. व्यवसायात व नोकरीत सहकार्‍यांची उत्तम मदत मिळेल. आर्थिक प्राप्तीदेखील उत्तम राहू शकेल. काहींना मात्र आरोग्याची कुरबूर त्रस्त करू शकते. दगदग व चिंता यांचा आपल्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जुने आजार डोके वर काढू शकतात. औषधोपचार सांभाळा.
शुभ दिनांक - 20, 21, 22, 23.
 
 
मिथुन : अवाजवी खर्च आवरा
weekely-horoscope : या आठवड्यात ग्रहांचे आपल्याला उत्तम सहकार्य मिळणार आहे. लाभलेल्या उत्तम ग्रहस्थितीमुळे घरात मंगलकार्याच्या वाटाघाटी घडू शकतात. विशेषतः ज्या युवांसाठी वर किंवा वधू संशोधन सुरू आहे, त्याबाबतच्या हालचालींना आठवड्याच्या मध्यात वेग यावा. संततीची चांगली प्रगती होईल. व्यवसायात प्रतिष्ठा व राजकारणात असलेल्यांना उत्तम यश मिळू शकेल. अवाजवी खर्च करण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण हवे. हितशत्रूंच्या कारवायांबाबत दक्ष राहण्याची गरज आहे.
शुभ दिनांक - 19, 21, 23, 25.
 
 
कर्क : सामाजिक प्रतिष्ठा वाढेल
या आठवड्यातील ग्रहांचे भ्रमण आपल्यासाठी बव्हंशी सुखकर ठरणार आहे. व्यवसायाच्या नवनव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक लाभदेखील होईल; मात्र त्यात सातत्याचा अभाव राहून काहींना चढउतार अनुभवास येऊ शकतो. तरीही आपल्या कामात धडाडीचा अनुभव येईल व त्याची लोकांवर छाप पडेल. नोकरी-व्यवसायातील स्पर्धेत पुढे राहाल. वरिष्ठांची मेहेरनजर होऊन आपले विरोधक तसेच छुप्या हितशत्रूंना चपराक बसेल. कौटुंबिक, सामाजिक प्रतिष्ठादेखील वाढेल.
शुभ दिनांक - 21, 22, 23, 24.
 
 
सिंह : हौशीखातर मोठा खर्च
weekely-horoscope : या आठवड्यात आपणास लाभलेली ग्रहस्थिती आर्थिकदृष्ट्या उपद्रवी ठरू शकणार आहे. एरवी आपल्या हौशी स्वभावाला पारावार नाही; मात्र त्याचमुळे आवडीने होणारी किंवा छंदाखातर मोठी खर्चवाढ दर्शवीत आहे. एखादा प्रवास, मंगलकार्य व कौटुंबिक कार्यातील सहभागामुळेही मोठा खर्च होऊ शकतो. कुटुंबात विशेषतः ज्येष्ठ महिलांकडून उत्तम सहकार्य मिळावे. आप्तेष्टांच्या भेटी व्हाव्यात. नोकरी-व्यवसायात वातावरण जैसे थे राहील. स्थावराच्या व्यवहारात मात्र सतर्क राहावे.
शुभ दिनांक - 19, 23, 24, 25.
 
 
कन्या : मेहनतीचे उत्तम फळ
या आठवड्यातील अनुकूल ग्रहस्थितीमुळे काही दिवसांपूर्वी घेतलेल्या व्यावसायिक निर्णयाचे, केलेल्या कामाचे, मेहनतीचे उत्तम फळ आता आपणांस मिळण्याची शक्यता आहे. अडलेली कामे मार्गी लागतील व त्यातून धनप्राप्ती होण्याचे संकेत देत आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीला आता यश मिळेल. पण असे असतानाही आपणास आर्थिक व्यवहारात सतर्क राहावे लागणार आहे. मोठी गुंतवणूक करण्याचा मोह तूर्त टाळला पाहिजे. कुटुंबातील सदस्यांचे मन राखण्याचे धोरण असावे.
शुभ दिनांक - 19, 21, 22, 25.
 
 
तूळ : दूरगामी चांगले प्रभाव
weekely-horoscope : या आठवड्यात उपयुक्त ग्रहस्थितीमुळे आपली रास बलवान झाली आहे. महत्त्वाची कामे या आठवड्यात वेगाने उरकून घ्यावीत असे योग आहेत. या ग्रहयोगांमुळे बर्‍यापैकी आर्थिक लाभ व्हावा. नोकरी व व्यवसायात काही चांगल्या घडामोडी घडून त्याचे दूरगामी चांगले प्रभाव अनुभवास येतील. नव्या क्षेत्रात व्यवसाय वाढविण्यासाठीदेखील हा काळ उपयोगी ठरावा. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक समाधान लाभेल. दरम्यान, आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालायचे नाही.
शुभ दिनांक - 19, 20, 23, 25.
 
 
वृश्चिक : उत्कृष्ट यश मिळावे
या आठवड्यात लाभलेली ग्रहस्थिती पाहता या राशीच्या मंडळींनी शेअर बाजार, वायदे बाजार, कमिशन व एजन्सीची कामे यात गुंतवणूक प्रयत्न करून बघावयास हरकत नाही. कला क्षेत्रातील मंडळींनादेखील या काळात उत्कृष्ट यश मिळावे तसेच नोकरी करणार्‍या मंडळींना व व्यावसायिकांना आठवडा लाभाचा ठरेल. नोकरदार वर्गाचे पुरेपूर सहकार्य मिळेल. आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात मात्र कामाचा वेग काहीसा कमी होऊ शकतो. त्यामुळे कामे उशिरा पूर्णत्वास जातील.
शुभ दिनांक - 20, 22, 23, 25.
 
 
धनू : मेहनत घ्यावी लागणार
weekely-horoscope : या आठवड्यात आपल्याला योजलेली कामे पूर्ण करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे असे प्राप्त ग्रहस्थितीवरून दिसते. आर्थिक आघाडी मजबूत राहणार असली, तरी नोकरी-व्यवसायात काहीशी मंदीचे वातावरणदेखील राहण्याची शक्यता आहे. जिद्दीने अडचणींवर मात करू शकाल. आठवड्याच्या मध्यानंतर परिस्थिती काहीशी निवळायला सुरुवात व्हावी. आर्थिक चिंता व दगदग कमी होईल. विविध कामातील अडचणी दूर होतील. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल.
शुभ दिनांक - 19, 21, 24, 25.
 
 
मकर : अडचणींतून मार्ग निघेल
या आठवड्यात आपल्या वाट्याला आलेली ग्रहस्थिती पाहता उत्तम आत्मविश्वास लाभून आपण प्राप्त अडचणींतून मार्ग काढू शकाल. आपला संघर्ष निश्चितच अपेक्षित यश पदरी पाडणार आहे. व्यवसायात व नोकरीत यश मिळेल. आर्थिक प्राप्तीदेखील उत्तम राहू शकेल. शेअर व वायदे बाजारात गुंतवणूक करणार्‍यांनी मात्र जरा सावध पवित्रा घेणे आवश्यक आहे. काहींना मात्र आरोग्याची अपेक्षित साथ मिळू शकणार नाही. त्यामुळे दगदग-धावपळ टाळावी. वाहने सावध चालवावी.
शुभ दिनांक - 19, 20, 22, 24.
 
 
कुंभ : कुटुंबात मतभेद नकोत
weekely-horoscope : प्राप्त ग्रहस्थिती पाहता हा आठवडा आपल्यासाठी सुखवृद्धी करणारा ठरू शकतो. त्यामुळे चिकाटी व जिद्द ठेवल्यास अनेक कठीण प्रसंगांवर मात करून आपले ईप्सित गाठू शकाल. अपेक्षित यश निश्चित मिळेल. युवांना चांगल्या संधी याव्यात. दरम्यान, विद्यार्थी वर्ग तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना काही त्रासदायक घडामोडींना तोंड द्यावे लागू शकते. काही कुटुंबातील वातावरण तणाव राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मतभेदाचे प्रसंग टाळा. कौशल्याने परिस्थिती हाताळावी.
शुभ दिनांक - 19, 20, 22, 23.
 
 
मीन : कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक
weekely-horoscope : या आठवड्यात आपल्या वाट्याला आलेली ग्रहस्थिती बव्हंशी उत्तम असून आपल्या कार्यात त्यांचे सहकार्यही चांगले मिळावयास हवे. या ग्रहमानामुळे कार्यक्षेत्रात आपला वट निर्माण होऊ शकतो. आपल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक आवक वाढेल; मात्र काही अनपेक्षित खर्चही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपले आर्थिक अंदाजपत्रक काहीसे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यात मोठा फटका बसू नये म्हणून सतर्क राहायला हवे. कुटुंबात समाधान राहील.
शुभ दिनांक - 21, 22, 23, 24.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री 
8600105746