बिश्केक,
किर्गिस्तानच्या Ahilya Shinde बिश्केक येथे सुरु असलेल्या 17 वर्षांखालील महिलांच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्या महाराष्ट्राच्या अहिल्या शिंदेने सुवर्णपदक पटकावले. 49 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अहिल्याने जपानच्या मसुदा एन. हिचा पराभव केला.
या संपूर्ण कुस्ती स्पर्धेत अहिल्याने किर्गिस्तान, उझ्बेकिस्तान, कोरिया, कझाकिस्तान व अंतिम फेरीत जपानच्या कुस्तीपटूवर मात करून सुवर्णपदक पटकावले व तिने प्रतिस्पर्ध्याला एकही गुण घेऊ दिला नाही. इंदापूरच्या Ahilya Shinde अहिल्याला घरातूनच कुस्तीचा वारसा मिळाला. यापूर्वी अहिल्याने झारखंड येथे 17 वर्षांखालील राष्ट्रीय कनिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत व 15 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 50 किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ गटाच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून अहिल्याने आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. आता आशियाई कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकण्याची चमकदार कामगिरी केली आहे.