चेल्सीचा लुकाकू इंटर मिलानमध्ये दाखल

    दिनांक :22-Jun-2022
|
लंडन, 
चेल्सीचा Chelsea Lukaku आक्रमक खेळाडू रोमेलू लुकाकू एका वर्षाच्या करारावर पुन्हा इंटर मिलान क्लबध्ये दाखल होणार आहे. इंटर मिलानने लोनच्या आधारावर लुकाकूला आपल्या संघात दाखल करून घेतले, त्याबद्दल हस्तांतरण शुल्क म्हणून इंटर मिलानने आठ दशलक्ष युरो (8.4 दशलक्ष) भरले आहेत. यात लुकाकूने स्टॅमफोर्ड बि‘ज सोडण्यासाठी वेतन कपात मान्य केली आहे.
 
Chelsea Lukaku
 
प्रीमियर लीगमध्ये चेल्सीकडून Chelsea Lukaku खेळताना लुकाकूची कामगिरी निराशाजनक राहिली होती. गत हंगामात लुकाकूने विक्रमी ः97.5 दशलक्षाचा करार करीत चेल्सीमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पहिल्या चार सामन्यांमध्ये चार गोल केल्यानंतर 29 वर्षीय लुकाकूचा चेल्सीसोबतचा दुसरा कार्यकाळ संपुष्टात आला. लुकाकूने 15 गोलांसह चेल्सीचा सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू म्हणून या हंगामाचा शेवट केला. चेल्सी क्लबने दिलेल्या वागणुकीबद्दल लुकाकूने डिसेंबरमध्ये इटालियन टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत आपली नाराजी व्यक्त केली होती.