चीनकडून पाकिस्तानसाठी आलेल्या युद्धनौका निकामी

    दिनांक :22-Jun-2022
|
इस्लामाबाद, 
पाकिस्तानी China to Pakistan नौदल सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे आणि या सगळ्यामागे चीन आहे. कारण चीनने पाकिस्तानी नौदलासाठी पुरवलेली सर्व फ्रिगेट्स आणि शस्त्रे निकामी निघाली आहेत. आता ही पाकिस्तानची सर्वात मोठी चूक आहे.  यामुळे आता पाकिस्तानी नौदलला घाम फुटला आहे. इतर देशाच्या पैशावर, शस्त्रांवर अवलंबून असलेला पाकिस्तान आता नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. 

China to Pakistan
 
वास्तविक, चीनने China to Pakistan पाकिस्तानी नौदलाला दिलेले फ्रिगेट्स खूप महाग आहेत आणि त्यांचे ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे आहे. युद्ध कवायतीदरम्यान पाकिस्तानी नौदलाने जेव्हा या फ्रिगेट्समधून गोळीबार केला तेव्हा ते अपयशी ठरले. फ्रिगेट निकामी होताच पाकिस्तानी नौदलात घबराट पसरली होती. अशा परिस्थितीत भारताने यावेळी हल्ला केला तर, पुन्हा एकदा १९७१ सारखी परिस्थिती निर्माण होऊन, कराची भारताच्या ताब्यात जाईल, असे बोलले जात आहे.
 
जुलै 2009 मध्ये किमान चार चीनी China to Pakistan युद्धनौका पाकिस्तानच्या नौदलात दाखल झाल्या होत्या. अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या अशांत काळात पाकिस्तानला तरंगत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. चीनकडून फ्रिगेटचे अपयश दुःस्वप्नात बदलले आहे. यापूर्वी चीनकडून पाकिस्तानी हवाई दलाला मिळालेल्या JF17 लढाऊ विमानांचे संपूर्ण स्क्वॉड्रन ग्राउंड करण्यात आले होते. कारण त्याच्या इलेक्ट्रॉनिक रडार यंत्रणेत बिघाड झाला होता. पाकिस्तानी वैमानिकांनी चिनी JF-17 उडवण्यास नकार दिला. आता चीनकडून मिळालेले फ्रिगेट निकामी झाल्याने पाकिस्तानी लष्करात घबराटीचे वातावरण आहे.