जेईईचे पहिले सत्र गुरुवारपासून सुरू

    दिनांक :22-Jun-2022
|
मुंबई,
जेईई JEE first session परीक्षेचे पहिले सत्र उद्या गुरुवारपासून सुरू होत आहे. ही परीक्षा एनटीएद्वारे आयोजित केली जाईल आणि 29 जूनपर्यंत चालेल.
 
JEE first session
 
23 जून ते 29 जून या कालावधीत संयुक्त प्रवेश JEE first session परीक्षा मुख्य आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. परीक्षेच्या आधी अनेक विद्यार्थी त्यांची प्रवेशपत्रे जाहीर होण्याची वाट पाहात होते. त्यानुसार आता हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. जेईई मेन परीक्षेला बसणार्‍या उमेदवारांना केंद्रावर जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांना परीक्षा देऊ दिली जाणार नाही.
 
 
परीक्षा केंद्रात पेन्सिल बॉक्स इत्यादींना परवानगी नाही. कोणतीही वस्तू आत घ्यायची असेल तर, त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागेल. ही परीक्षा परदेशातील 22 शहरांव्यतिरिक्त भारतातील 501 शहरांमध्ये होणार आहे. JEE first session परीक्षा केंद्रांमध्ये पेपर, स्टेशनरी किंवा खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी नाही.