यशस्वी जयस्वालचे अर्धशतक, मुंबई 5 बाद 248

- रणजी करंडक अंतिम सामना
- अनुभव अग्रवाल, सारांश जैनचे प्रत्येकी 2 बळी

    दिनांक :22-Jun-2022
|
बंगळुरू,
एम. चिन्नास्वामी Ranji Trophy स्टेडियमवर आजपासून प्रारंभ झालेल्या रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्धच्या यशस्वी जयस्वालच्या (78) अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दिवस अखेर पहिल्या डावात 90 षटकांत 5 बाद 248 धावा नोंदविल्या. मध्य प्रदेशच्या अनुभव अग‘वाल व सारांश जैनने अचूक मारा करीत प्रत्येकी 2 बळी टिपलेत.
 
Ranji Trophy
 
मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून Ranji Trophy प्रथम फलंदाजी स्विकारली. पृथ्वी व यशस्वी जयस्वालने 87 धावांची सलामी भागीदारी करून डावाची चांगली सुरुवात केली. मात्र पृथ्वी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना मध्यम गती वेगवान गोलंदाज अनुभव अग्रवालने उपहारासाठी खेळ थांबण्यापूर्वी पृथ्वीचा त्रिफळा उडविला. पृथ्वीने 79 चेंडूंत 5 चौकार व एका षट्कारसह 47 धावांचे योगदान दिले. पुढे यशस्वी जयस्वालने अरमान जाफर (26), सुवेद पारकर (18) व हार्दिक तामोरेच्या (24) साथीने आपले अर्धशतक साजरे केले व संघाला 185 धावांचा टप्पा गाठून दिला. यादरम्यान कुमार कार्तिकेयने अरमानला, तर डावखुरा सारांश जैनने पारकर व तामोरेला बाद करून 41 वेळा रणजी करंडक जिंकणार्‍या मुंबई संघाला नियमित अंतराने धक्का दिला. यशस्वीने अरमानसोबत Ranji Trophy दुसर्‍या गड्यासाठी 33 धावांची, सुवेद पारकरसोबत तिसर्‍या गड्यासाठी 27 धावांची, तर तामोरेसोबत चौथ्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली. पुढे यशस्वी जयस्वाल अनुभव अग‘वालच्या भेदक मार्‍याला बळी पडला. यशस्वीने 163 चेंडूंत 78 धावांची यशस्वी खेळी केली. यात त्याने 7 चौकार व एक षट्कार खेचला.
 
 
पहिल्या दिवस Ranji Trophy अखेरपर्यंत सर्फराज खान व शम्स मुलानीने अनुक‘मे 40 व 12 धावांची नाबाद खेळी करीत मुंबईला पहिल्या डावात 5 बाद 248 धावांचा टप्पा गाठून दिला. मध्य प्रदेशकडून अनुभव अग‘वाल व सारांश जैनने प्रत्येकी 2 बळी, तर कुमार कार्तिकेयने 1 बळी टिपला.
 
धावफलक
मुंबई Ranji Trophy पहिला डाव : 90 षटकांत 5 बाद 248.
पृथ्वी शॉ त्रि. गो. अग्रवाल 47, यशस्वी जयस्वाल झे. दुबे गो. अग‘वाल 78, अरमान जाफर झे. दुबे गो. कार्तिकेय 26, सुवेद पारकर झे. श्रीवास्तव गो. जैन 18, सर्फराज खान खेळत आहे 40, हार्दिक तामोरे झे. पाटीदार गो. जैन 24, शम्स मुलानी खेळत आहे 12, अवांतर 3.
गडी बाद क्रम : 1-87, 2-120, 3-147, 4-185, 5-228.
गोलंदाजी : कुमार कार्तिकेय 31-6-91-1, अनुभव अग‘वाल 19-3-56-2, सारांश जैन 17-2, 31-2, गौरव यादव 23-5-68-0.