तेजस्वीन शंकरचा विचार करण्याचा कोर्टाचा आदेश

    दिनांक :22-Jun-2022
|
नवी दिल्ली, 
दिल्ली उच्च Tejaswin Shankar न्यायालयाने बुधवारी भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या (एएफआय) निवड समितीला आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी उंच उडीपटू तेजस्वीन शंकरचा Tejaswin Shankar संघ निवडीसाठी विचार करावा व नुकत्याच पार पडलेल्या आंतर-राज्य अ‍ॅथ्लेटिक्समध्ये सहभागी न झाल्याच्या कारणास्तव त्याला सोडले जाऊ नये, असे आदेश दिले आहेत.
 
Tejaswin Shankar
 
राष्ट्रीय स्पर्धेत 2.27 मीटरच्या पात्रता मानकांची पूर्तता करणारा एकमेव उंच उडीपटू असूनही Tejaswin Shankar तेजस्वीनचा भारताच्या 37-सदस्यीय अ‍ॅथ्लेटिक्स संघात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे तेजस्विनने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा आदेश दिला. तेजस्वीनचा संघासाठी विचार करण्यात आली नाही, कारण त्याने चेन्नईत झालेल्या आंतर-राज्य अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत भाग घेतला नाही, तर त्याने अमेरिकेतील स्पर्धेत भाग घेतला होता. चेन्नईतील स्पर्धा ही राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याची शेवटची स्पर्धा होती, असे एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले.