निर्देशांकात 700 हून अधिक अंकांची घसरण

    दिनांक :22-Jun-2022
|
मुंबई, 
मागील दोन सत्रात index fell शेअर बाजारात दिसलेले तेजीचे वातावरण आज बुधवारी पुन्हा एकदा घसरणीच्या दरीत लोटले गेले. जागतिक बाजारातील मंदीमुळे दोन दिवसांची तेजी निकालात निघून निर्देशांकात 710 अंकांची घसरण झाली. 30 शेअर्सवर आधारित मुंबई बाजारातील निर्देशांकात सत्राअखेर 710 अंकांची घसरण झाली आणि तो 51,823 वर बंद झाला.
 
index fell
 
राष्ट्रीय बाजारातील निफ्टीतही 225 अंकांची index fell घसरण झाली. तो 15,413 वर बंद झाला. जागतिक मंदीच्या पृष्ठभूमीवर टाटा स्टील, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, एचसीएल टेक्नॉलॉजी, बजाज फिनसर्व्ह, टायटन आणि बजाज फायनान्स यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली राहिले. दुसरीकडे, टीसीएस, एचयूएल, पॉवरग्रीड आणि मारुती सुझुकी इंडिया यांचे शेअर्स या मंदीतही नफ्यात होते.