वंचित बहुजन आघाडी प्रस्थापितांना देणार हादरा

सर्व प्रभागांत निवडणूक लढविण्याचा निर्धार

    दिनांक :23-Jun-2022
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
वंचित Bahujan Aghadi बहुजन आघाडीने यवतमाळ नगर परिषदच्या सर्व प्रभागांत उमेदवार उभे करून पूर्ण शक्तीनिशी निवडणूक लढण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांनी केला आहे. शहर कार्यकारिणीतर्फे आयोजित मेळाव्यात जिल्हा निरीक्षक ज्येष्ठ नेते शरद वसतकर आणि पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना तळागाळातील वंचित समूहाला सोबत घेऊन प्रकाश आंबेडकर यांचे विचार आणि निवडणूक रणनीती विषयी मार्गदर्शन केले.
 
Bahujan Aghadi
 
त्याला अनुसरून जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे आणि Bahujan Aghadi महिला आघाडीच्या धम्मवती वासनिक यांनी सर्व प्रभागांत उमेदवार उभे करून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
 
 
शहर Bahujan Aghadi कार्यकारिणीतर्फे शहराध्यक्ष कुंदन नगराळे, महिला शहराध्यक्ष करुणा चौधरी यांनी आयोजित मेळाव्यात, युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी, पश्चिम जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड, उपाध्यक्ष शैलेश भानवे, प्रसिद्धीप्रमुख शिवदास कांबळे, अरुण कपिले, पुष्पा सिरसाठ, अ‍ॅड. श्रद्धा, संध्या काळे, करुणा मून, सरला स्थूल, रत्नमाला कांबळे, वंदना उरकुडे, रवी शंभरकर, प्रफुल्ल शंभरकर, गुणवंत मानकर, विवेक वाघमारे, विलास वाघमारे, प्रशांत भारसाकळे, भारती सावते, शीला वैद्य, शोभना कोटंबे आणि असंख्यय कार्यकर्ते उपस्थित होते.