आईनेच लावले १२ वर्षीय मुलीचे दोनदा लग्न

३६ वर्षीय पुरुषाशी लावले होते लग्न

    दिनांक :23-Jun-2022
|
डेहराडून, 
उत्तराखंडमधील Child marriage  पिथौरागढमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न एका 36 वर्षीय पुरुषाशी लावले. अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर असून तिचे हे दुसरे लग्न होते. घरगुती हिंसाचारामुळे पहिले लग्न मोडले. Child marriage घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि आरोपी महिलेला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला.

Child marriage
 
 पोलिसांनी मुलीच्या Child marriage आईविरुद्ध मानवी तस्करी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मुलीच्या पहिल्या पतीला अटक करण्यात आली होती. ही घटना पिथौरागढच्या धारचुला भागातील आहे. Child marriage  मुलगी गरोदर असल्याचे समोर येताच हे प्रकरण पिथौरागढ महिला हेल्पलाइनकडे वर्ग करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, Child marriage मुलीची आई आणि सावत्र वडिलांनी जून 2021 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी धारचुलामध्ये पहिले लग्न केले होते. पतीच्या मारहाणीला कंटाळून ती काही वेळाने माहेरी परतली. त्यानंतर कुटुंबाने मुलीचे दुसरे लग्न डिसेंबर 2021 मध्ये बेरिनाग येथील एका 36 वर्षीय पुरुषाशी लावले. Child marriage  जो तीनपट मोठा होता.
ही बाब गांभीर्याने Child marriage घेत पिथौरागढचे अधीक्षक लोकेश्वर सिंह यांच्या आदेशानुसार एसएचओ बेरिनाग हेम तिवारी, हायवे पेट्रोल युनिटचे प्रभारी रवींद्र पंगती आणि इतर पोलिस कर्मचारी मुलाच्या घरी पोहोचले आणि दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले. यासोबतच बालविवाहासंदर्भातील कायद्याचीही माहिती देण्यात आली. Child marriage त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी आपली चूक मान्य केली.