शिवसेनेच्या संकटात वाढ...पुन्हा ३ आमदारांची बंडखोरी video
मुंबईत एकनाथ शिंदेंचे समर्थनार्थ पोस्टर
दिनांक :23-Jun-2022
|
मुंबई,
शिवसेनेचे बंडखोर Crisis of Shiv Sena आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारवर संकट ओढवले आहे. गुरुवारी आणखी 3 बंडखोर आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले. दरम्यान बुधवारी चार बंडखोर आमदार हॉटेलमध्ये पोहोचले होते. यातच महत्वाचे म्हणजे मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी सुरु झाली आहे. पोस्टरवर एकनाथ शिंदे आणि बाळ ठाकरे यांचा फोटो आहे. त्यावर ‘गो अहेड सर, आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असे लिहिले आहे.
दुसरीकडे, उद्धव-पवार भेटीनंतर शिवसेनेचा दृष्टिकोन वेगळा असल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. गरज पडली तर आमची ताकद विधानसभेच्या पटलावर दाखवू असे ते म्हणाले. असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची ऑफर दिल्यानंतर जिथे त्यांचे समर्थक त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याची चर्चा होती, तिथे आता शिवसेनेचे बंडखोर Crisis of Shiv Sena आमदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मुंबईत पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सध्याच्या राजकीय पेचप्रसंगाला तोंड देण्यासाठी काय मार्ग असू शकतो याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी पोहोचले. शरद पवार उद्धव यांच्याशी विचारमंथन करून या राजकीय संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवतील, असे मानले जात आहे. 1 तासाच्या बैठकीनंतर उद्धव यांचा तणाव थोडा कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान या भेटीनंतर ते घरातून निघत असताना सुप्रिया सुळे यांनी विजयाची निशाणी करत जनतेकडे बोट दाखवले. म्हणजे सर्व काही ठीक आहे.