विनाशकारी भूकंपाने उद्ध्वस्त झालेला अफगाणिस्तान

    दिनांक :23-Jun-2022
|
काबुल,
अफगाणिस्तानात Destroyed Afghanistan झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. काळ सुमारे 6.1 तीव्रतेच्या भूकंपात किमान 1,000 लोकांनाच मृत्यू झाला आहे. तसेच 1500 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी केली आहे. अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे 900 वर ठार एका  अहवालानुसार, तालिबानचे वरिष्ठ अधिकारी अब्दुल कहर बल्खी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अफगाणिस्तान मानवतावादी आणि आर्थिक संकटाशी झुंजत असल्यामुळे सरकार गरजू लोकांना आर्थिक मदत करण्यास असमर्थ आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू खोस्ट शहरापासून ४४ किमी अंतरावर होता, मात्र पाकिस्तान आणि भारतापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.
 

afgan 
 
दरम्यान शेजारी देश आणि जागतिक शक्तींकडून मदत असूनही, बाल्खी म्हणाले की मदत मोठ्या प्रमाणात वाढवणे आवश्यक आहे, कारण हा विनाशकारी भूकंप होता जो अनेक दशकांमध्ये अनुभवला गेला नव्हता. दरम्यान, तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांनी दावा केला की शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि मृतांची संख्या आणखी वाढू शकते, कारण बचाव पथके आणि आपत्कालीन कर्मचारी अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. प्रभावित भागातील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भूकंपानंतर तालिबानने हलगर्जीपणाचा अवलंब केला होता. घटनेच्या सुमारे आठ तासांनंतर तालिबान मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी वैद्यकीय स्थलांतरासाठी पाच हेलिकॉप्टर पाठवले. सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना 100,000 आणि जखमींना 50,000 देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान  अफगाणिस्तानमध्ये Destroyed Afghanistan भूकंपामुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी शोक व्यक्त केला आहे.