तभा वृत्तसेवा
शेंबाळपिंपरी,
पुसद Dr. Dangale तालुक्यातील ईसापुर धरण येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. विलास डंगाले Dr. Dangale तर उपाध्यक्षपदी सुदाम खडसे यांची बिनविरोध निवड झाली. येथील तेरा सदस्य असलेली विवि कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्षपदी 20 जून रोजी डंगाले हेच प्रबळ दावेदार असल्यामुळे इतर इच्छुकांनी आपले नामांकन मागे घेतल्याने सलग दुसर्यांदा बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच कैलास नाईक, उत्तम ढोले, आनंद नाईक, भास्कर बैस, आसिफ खान, हसमखायन, डॉ. प्रकाश कानेकरसह अनेक गावकरी उपस्थित होते.