...तर शिवसेना आघाडीतून बाहेर पडण्यास तयार !

Ekanth Shinde संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य !

    दिनांक :23-Jun-2022
|

मुंबई,  

Ekanth Shinde गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राजकीय घडामोडींनी तापल्याचं दिसत आहे. Ekanth Shinde एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उगारून तीन दिवस झाले असताना शिवसेना नरमाईची भूमिका घेत असल्याचं आज दिसून आलं. Ekanth Shinde  शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतु, या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे.Ekanth Shinde तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेच्या संकटात वाढ...पुन्हा ३ आमदारांची बंडखोरी video पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आपल्या सुटकेची कथित कहाणी सांगितली. आपल्याला सुरतला नेण्यात आलं. पण वस्तुस्थिती समजल्यानंतर आपण तिथून निघून आलो, असा आशय दोघांच्याही वक्तव्यात दिसून आला.
 
 
ar
 
यावर पत्रकारांनी दोघांना आणखी काही प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले. यावर संजय राऊत म्हणाले, ‘त्यांना जे सांगायचं होतं. ते त्यांनी सांगितलं. आता शेवटचा मिनिट मी घेतो. जे आमदार सध्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यांनी हिंदुत्वाचा वगैरे मुद्दा उपस्थित केला आहे. या सर्व आमदारांची इच्छा आणि भूमिका असेल, की शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे आणि वेगळा विचार केला पाहिजे.
 
 
 
अनैसर्गिक आघाडी नको, असा आग्रह धरणाऱ्या एकनाथ शिंदेंचं Ekanth Shinde म्हणणं शिवसेना मान्य करायला तयार आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.शिवसेना Shiv Sena महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास  तयार आहे. पण, आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे संजय राऊत म्हणाले. आपण अधिकृतपणे ही भूमिका मांडत असल्याचे राऊत यांनी नमूद केले आहे.  महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडीमध्ये संजय राऊत यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. ही आहे आमदारांची भावना...बंडखोर आमदारांना मुंबईत परत बोलावून त्यांची मनधरणी करण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 
 
सध्या Ekanth Shinde एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे 41 आमदार आणि अपक्ष सहा असे एकूण 47 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. पण अजूनही अनेक आमदार शिंदेंच्या गोटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शिंदेंच्या खेळीने शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटात महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून मंत्री असलेले अनेक जण सहभागी झाले आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यासारखे अनेक मंत्री सहभागी झाले आहेत. 
 
सरकार गेले तर विरोधी पक्षात बसू... दरम्यान, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्रमकEkanth Shinde  प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, आम्हाला कळत नाही. शिवसेनेला पुन्हा भाजपसोबत जायचे आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे.' तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे.