वणी ही संस्कृत कार्यकर्त्यांची निर्माणभूमी : गजानन कासावार

    दिनांक :23-Jun-2022
|
तभा वृत्तसेवा
वणी, 
संस्कृत भारती Gajanan Kasawar वणी शाखा, नगरवाचनालय वणी आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाद्वारे नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संस्कृत संभाषण शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार Gajanan Kasawar यांनी वर्गाच्या मार्गदर्शक आभा पाठक यांची मातृभूमी आणि मातृभाषेसह नाळ जोडलेली असणे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, असे सांगत असे वर्ग दरवर्षी व्हावेत. वणी ही संस्कृत कार्यकर्त्यांची निर्माण भूमी असून या वर्गातून देखील भावी कार्यकर्ते निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
Gajanan Kasawar
 
याप्रसंगी व्यासपीठावर वणी संस्कृत Gajanan Kasawar भारती शाखेचे अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड व उपाध्यक्ष प्रशांत भाकरे उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात मुग्धा बांगरे यांनी गीत, अपूर्वा देशमुख गीता प्रार्थना, अर्जुन देशपांडे, कृष्णा देशपांडे संस्कृत श्लोक तर रेवा भागवत यांनी विमान गीत सादर केले. आचल गोजे, सुमेध झाडे तथा वेदिका विधाते यांनी शिबिराबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना या संभाषण शिबिरातून मिळालेल्या ज्ञानाचा उल्लेख करीत सातत्याने असे वर्ग आयोजित करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
 
सृष्टी राजेश माळीकर या शिबिरातील विद्यार्थिनीने Gajanan Kasawar संस्कृत भाषेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन कल्याणी भागवत यांनी केले. वणी नगरीच्या कन्या केनिया निवासी आभा पाठक यांनी घेतलेल्या या वर्गासाठी कोमल बोबडे, वृषाली देशपांडे, गायत्री महालक्ष्मे, गायत्री भाकरे संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी संस्कृत भारती आणि नगर वाचनालयाद्वारे गायत्री महालक्ष्मे यांनी वर्गाच्या मार्गदर्शक आभा पाठक यांचा सत्कार केला.