हरिद्वारहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात...१० ठार

    दिनांक :23-Jun-2022
|
पिलीभीत,
Haridwar accident उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात गुरुवारी पहाटे हरिद्वारहून गंगेत स्नान करून परतणाऱ्या भाविकांचा गाडीला भीषण अपघात झाला. गजरौला परिसरात झालेल्या अपघातात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी आहेत. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.
 
jhapali
 
मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूर खेरीतील गोला भागात राहणारे एक कुटुंब आपल्या मुलीच्या लग्नानंतर हरिद्वारमध्ये Haridwar accident गंगेत स्नान करून घरी परतत होते. पिलीभीतच्या गजरौला येथे अचानक त्यांची गाडी अपघाताचा बळी ठरला. दरम्यान चालकाला डुलकी लागली होती, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. गाडीमध्ये एकूण 15 लोक होते. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. या अपघातात सात जण जखमी झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.