हवाई मार्गाने चीनची तैवानमध्ये घुसखोरी

    दिनांक :23-Jun-2022
|

युक्रेन,
गेल्या 19 दिवसांत Infiltration into Taiwan  दोनवेळा चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानमध्ये घुसखोरी केली आहे. बुधवारी जवळपास 29 लढाऊ विमाने तैवानला पाठवण्यात आली. यानंतर तैवानच्या हवाई दलाने इशारा देत, चिनी लढाऊ विमानांना आपल्या हवाई हद्दीतून बाहेर काढले. चीनने स्वतः तैवानचा परिसर Infiltration into Taiwan एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन म्हणून घोषित केला आहे.
 
TAIVAN
 

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, Infiltration into Taiwan त्यांच्या देशाच्या हवाई दलाने 29 चिनी विमाने इशारे देऊन उडवली. या घुसखोरीत चिनी हवाई दलाची सात J-10 ही लढाऊ विमानं, पाच J-16 लढाऊ विमान आणि 1Y8 इलेक्ट्रॉनिक युद्ध विमाने सहभागी झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. या विमानांनी तैवान नियंत्रित प्रतास द्वीपसमूह जवळ दक्षिण चीन समुद्रात उड्डाण केले. दरम्यान चीन तैवानवर हल्ला करु शकतो अशी भीती अमेरिकेने अनेकदा व्यक्त केली होती. Infiltration into Taiwan  तसेच झाल्यास तैवानच्या मदतीसाठी सैन्य पाठवेल, अशी उघड घोषणाही अमेरिकेने केली आहे.चीनचा सिक्रेट प्लॅन एका  ऑडिओ क्लिपमध्ये कैद झाला आहे. त्यांनी 57 मिनिटांची ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. या ऑडिओ क्लिपनुसार, Infiltration into Taiwan  चिनी सैन्याला पर्ल नदी डेल्टाजवळ सी डिफेन्स ब्रिगेड बनवायची होती. हा परिसर साखर उद्योगाचे केंद्र मानला जातो. या नदी डेल्टामध्ये चीनची अनेक महत्त्वाची शहरे आहेत. या ऑडिओमध्ये तैवान सामुद्रधुनी मध्य आणि दक्षिण चीन समुद्र यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.