तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
येथील Mahila Mahavidyalaya लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी विभूती चक्रधर कुसरे हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून संगीत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. त्यासाठी तिला अमरावती विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभात प्रभाकर नवसाळकर रौप्यपदक, यादवराव केशव अंधारे स्मृती रोख पारितोषिक, पं. देविदास काळे गुरुजी रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तिच्या या Mahila Mahavidyalaya यशाबद्दल एज्युकेशन सोसायटी यवतमाळचे अध्यक्ष दिवाकर पांडे, सचिव चंद्रकांत रानडे, सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे व सर्व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन केले आहे. आपल्या यशाचे श्रेय विभूती कुसरे हिने संगीत विभागप्रमुख डॉ. अर्चना देशपांडे, प्रा. डॉ. ज्वाला नागले, प्रा. डॉ. चंद्रशेखर कुडमेथे व आपल्या आई वडिलांना दिले आहे.