तळणी सोसायटीत शिवसेनेचा दणदणीत पराभव

    दिनांक :23-Jun-2022
|
तभा वृत्तसेवा
हदगाव,
विविध Shiv Sena सहकारी सेवा सोसायटी तळणी निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून या निवडणुकीत बाबुराव कदम, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत लवंढेश्वर विकास पॅनेल गटाने 13 पैकी 13 जागेवर शिवसेनेचा पराजय करत दणदणीत विजय मिळवला आहे.
 
Shiv Sena
 
या Shiv Sena निवडणुकीत बाबुराव कदम, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित लवंढेश्वर विकास पॅनेलचे 13 उमेदवार, 2 अपक्ष व शिवसेना प्रणित श्री दत्त विकास पॅनेलचे 13 असे एकूण 28 उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले होते. सुरुवातीला शिवसेनेचे माजी आमदार नागेश आष्टीकर व त्यांच्या सहकार्‍यांनी तळणी, साप्ती, भाटेगाव, उमरी, निवळा व चक‘ी या गावात जाऊन मतदारांच्या भेटी-गाठी घेऊन आपल्या पक्षाचे कार्य सांगून मतदारांची मने जिंकण्यात चांगलेच यश मिळवले होते. परंतु विरुद्ध पक्ष असलेले काँग्रेस, बाबुराव कदम गट व राष्ट्रवादी काँग्रेस गट यांनी शिवसेनेच्या मुसंडीची चांगलीच धास्ती घेऊन एकदिलाने काम केल्याने रविवार, 19 जून रोजी झालेल्या मतदानात मतदारांचे मन जिंकून 13 पैकी 13 जागांवर विजय संपादन करण्यात मोठे यश मिळवले आहे.
 
 
या Shiv Sena निवडणुकीसाठी रविवारी तळणी येथील केंद्रावर मतदान झाले व त्याच दिवशी रात्री 8 वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीमध्ये तळणी, साप्ती, भाटेगाव, उमरी, निवळा व चक्री या 6 गावांच्या मतदारांचा समावेश होता. तेराही जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग‘ेस, बाबुराव कदम गट व राष्ट्रवादी प्रणित लवंढेश्वर विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला.