opposite side राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर विधान केले आहे, ते म्हणतात - 'सरकार वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातील आणि आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत तसेच सर्व बंडखोर आमदारांना शिक्षा झालीच पाहिजे असे ते म्हणाले. तसेच महाविकास आघाडीतील राजकीय अस्थिरतेवर जयंत पाटील म्हणाले, 'सरकार चालले तर सत्तेत राहू, सरकार गेले तर विरोधी पक्षात बसू'. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आज वायबी चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता, मी माझ्या सर्व आमदारांना चालू घडामोडींची माहिती देण्यासाठी बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. एका राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या राज्यात तुमची ताकद दाखवू शकता, असे मला वाटत नाही. त्यांना आपले आमदार राज्यपालांना दाखवण्यासाठी येथे यावे लागेल त्यानंतर राज्यपाल आवश्यक निर्णय घेतील असेही ते म्हणाले.