- मलबारहिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबई,
भावनिक आवाहनानंतर वर्षा बंगल्याहून मातोश्री या खाजगी निवासस्थानी जाताना मुख्यमंत्री Uddhav Thackeray उद्धव ठाकरे रात्री गाडीतून उतरून रस्त्याच्या कडेला जमलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या गर्दीत सामील झाले. कोरोना झाल्याचे सांगणार्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियमांचा एकप्रकारे भंग केला असून, साथरोग नियंत्रण कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध मलबारहिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्याचे वृत्त बुधवारी प्रसारमाध्यमांमध्ये झळकत होते. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. सायंकाळी फेसबुक लाईव्हद्वारे बोलतानाही उद्धव यांनी आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले. या पृष्ठभूमीवर, मुख्यमंत्री रात्री लोकांमध्ये मिसळल्याने त्यांच्याविरोधात कोरोना नियमांचा भंग करीत लोकांची भेट घेतली, अशी तक्रार तेजिंदर पाल सिंह यांनी दिली.
कोरोना काळात जनतेला वारंवार सुरक्षित राहण्याचे, अंतर राखण्याचे, मुखाच्छादन लावण्याचे, हात धुण्याचे आवाहान करणार्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः असा भंग करावा, यावर विश्वास बसण्यासारखे नसले तरी, तसे झालेले दिसते. एक तर सत्तानाट्यातून सहानुभूती मिळविण्यासाठी कोरोनाचा खोटा सहारा घेतला की, प्रत्यक्ष कोरोना होऊनही ते लोकांच्यात मिसळले, याबाबत येणार्या काळात वस्तुस्थिती समोर येईल.