मेघासम् आकाश भरू...!

Yamgarwadi समरसून काम करणं हा त्यांचा स्वभाव

    दिनांक :23-Jun-2022
|
ऊन-सावली
- गिरीश प्रभुणे
Yamgarwadi मानपानाची पर्वा नाही. मोठेपणाची हाव नाही. रात्री-अपरात्री केव्हाही जा. सारं घर तत्पर. एकदा गप्पांना सुरुवात झाली की, मग काळ-वेळेचं भान नाही. तासन् तास गप्पा झाल्याच पाहिजेत. Yamgarwadi ताटावर बसले की, मग मागे हटणार नाहीत. वाढणा-यानं थकून जावं आणि जेवण मिळालंच नाही, तर एक-एक, दोन-दोन दिवस पाण्यावर काढायची तयारी! कामाला वाघ. तहान-भुकेचं भान नाही राहणार... मग ध्यास एकच. Yamgarwadi हाती घेतलेला विषय पूर्ण झाल्याशिवाय थांबणे नाही. घरादाराला विसरून फक्त काम... काम... काम... आणि घरी आले की.. इतके घरचे होऊन जातील की विचारूच नका. Yamgarwadi एकदम घरकोंबडेच जणू...! मुलाबाळांत- बायकोत इतके रमतील की, हेवाच वाटावा. एकाच कार्यकर्त्याची ही दोन रूपं...!
 

unsa 
 
आबा... महादेवराव गायकवाड कोणत्याही कोनातून त्यांच्याकडे पहावं. प्रत्येक वेळा वेगळेच दर्शन! समरसून प्रत्येक काम करणं हाच त्यांचा स्वभाव. हाच त्यांचा गुण आणि कधी कधी हाच गुण अवगुण वाटावा असा स्वभाव. इतके गुंतून जातील की त्या गुंत्यातून बाहेर पडणं अशक्य होई. माझी भेट... Yamgarwadi पहिली भेट नाना नवले यांच्याबरोबर झाली. तुळजापूरजवळच्या काक्रंबा गावी. त्यांच्या घरी दोन-तीन खोल्यांचं घर. घराबाहेरच न्हाणीघर, अंगणात दोन-तीन झाडं. आडव्या-तिडव्या कपडे वाळत घालायला बांधलेल्या दो-या. दाराच्या शेजारी एक खोली. Yamgarwadi तिथे त्यांची आई दारात बसलेली असायची अंधवृद्ध. गायकवाड सरांकडे एक एमएटी होती. ही त्यांची घोडी कुठेही दौडायचीही. दोघांना सुटसुटीत असणा-या एमएटीवर प्रसंगी चार-चार जण बसलेत. Yamgarwadi गायकवाड सरांना कशाचंच ओझं कधी वाटलं नाही तसंच या एमएटीला ओझं कधी वाटलं नाही.
 
 
 
Yamgarwadi महादेवरावांना गप्पा विनाकारण मारलेल्या आवडत नसत. समोरच्याकडून माहिती काढून घेण्याची कला त्यांना अवगत होती. ‘‘असं म्हणताय...? बरं मग तुमच्याचकडे हे काम कसं आलं... तुम्ही ना भटक्यातले, ना या भागातले... बरं तुम्हाला माहिती नाही काही.. या समाजाची...'' ‘‘ही संघाची किमया... काय पाहिलं माझ्यात काय समजत नाही...''‘‘हं; हे मात्र खरं... आमच्याकडे सोमनाथजी खेडकर होते. Yamgarwadi त्यांना एकदम गुजरातेत पाठवलं. मधूभाई कुलकर्णीकडे. चांगला जम बसला होता तर त्यांनाही गुजरातला पाठविलं. गप्पांच्या ओघात आमचा नास्टा होऊन गेला होता. एवढ्यात सात-आठ वर्षांचा मुलगा धापा टाकत आला. मळका पांढरा बटन तुटका सदरा. पायात काही नाही. ‘‘अरे जया काय झालं... कसा आलाय तू...'' महादेवरावांच्या पत्नीनं त्याला पाणी दिलं. Yamgarwadi घटाघटा पाणी पिऊन तो म्हणाला, ‘‘गुरजी पुलीस आल्यात हाणामारी झालीय. आयनं पाठविलं.' पाच-सहा किलोमीटर तो धावत आला होता!
 
Yamgarwadi गुरुजींनी जयाला गाडीवर पुढ्यात घेतलं. मी मागे बसलो. खरं तर गुरुजींना शाळेत जायचं होतं. ताकविका गाव तसं मोठं. त्याच्या कडेला पारध्यांची पाच-सहा पालं होती. आम्ही पोहोचलो त्यावेळी वस्ती उद्ध्वस्त झाली होती. सामान इतस्तत: विखुरलं होतं. पारधी बाया रडत, ओरडत होत्या. Yamgarwadi डोकं आपटून ओरडत होत्या. गुरुजींना पाहताच सर्वजण त्यांच्याकडे आले. बायांनी उघड्या पाठीवरचे वळ दाखवले. फुटलेलं डोकं दाखवलं. झंपन्याला पहिलेच चालता येत नव्हतं. पोलिसांनीच त्याच्या पायाची शीर पूर्वीच तोडली होती. पोलिसांच्या धाडीचं असं चित्र मी प्रथमच पाहात होतो. सर्व बायांनी आम्हाला घेरलं होतं. सर्वांची समजूत काढता काढता गुरुजींची धावपळ होत होती. झंपन्या, टरलिंग्या, अरिंग्या बिट्टी, कस्तु-या- कस्तु-या आई सा-यांनी गायकवाडांचा हात ओढू ओढू आपलंच म्हणणं ऐकायला लावलं. Yamgarwadi एवढ्यात कुणाच्या तरी लक्षात आलं... ‘‘माझं प्वार... माझं प्वार...'' सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. जळक्या धुमसणा-या झोपडीत झंपन्या घुसला.
 
अर्धवट जळालेल्या झोपडीच्या राखेत झोळीत झोपलेलं ते मूल झोळीसह जळून भाजून गेलं होतं... अंगावर काटा उभं करणारं ते दृश्य पाहून बायांनी परत छाती बडवायला सुरुवात केली. Yamgarwadi माझ्या डोळ्यात पाणी आलं... सहा महिन्याचं ते मूल... पोलिस सारा खेळ करून निघून गेले होते. सारच दृश्य हृदयद्रावक होतं. गायकवाड गुरुजींनी कशीबशी सर्वांची समजून काढली आणि सर्वांना तुळजापूरला बोलावलं. त्यांचा अर्ज तयार करून पोलिस चौकीवर तक्रार नोंदविल्यात सर्व दिवस गेला. आधी तक्रार घेतच नव्हते. Yamgarwadi मुलाच्या मृत्यूची नोंद अपघाती करून सायंकाळी त्याचा अन्त्यविधी तिथेच गावात शेताच्या बांधावर खड्डा खणून केला. मी गायकवाडांच्या बरोबर मूक साक्षीदार होतो. गायकवाड पोलिस चौकीत संतापले होते. पोलिस शांतपणे सर्व आरोप-प्रत्यारोप ऐकत होते. Yamgarwadi कुठले पोलिस आले होते हे कळत नव्हते... या केसचं पुढं काहीच झालं नाही. पण गायकवाड गुरुजी ज्या तत्परतेने धडाडीने प्रकरण हाताळत होते ते पाहून मी चकीतच झालो.
 
Yamgarwadi एवढं धैर्य, प्रसंगावधान यांच्यात कुठून आलं. पोलिसांनी चार वाक्यात पत्रे देऊन तिथंच थोडं बाजूला त्यांचं पुनर्वसन केलं. पुढे असे प्रसंग रोजच येऊ लागले. Yamgarwadi गुरुजी एमएटीवर स्वार होऊन सर्वत्र जात होते. त्या आठवड्यात पाच-सहा प्रकरणं झाली. हळूहळू गायकवाड सर मला ‘जरा निवेदन तयार करा', ‘अर्ज लिहा' अशी कामं सांगू लागले. एका यमगरवाडी प्रकल्पाच्या सगळ्या योजना त्यांच्या घरीच रात्र रात्र जागून तयार झाल्या. Yamgarwadi त्यांच्या पगाराला आधीच अनेक वाटा चळवळीच्या होत्या. त्यात यमगरवाडी सुरू झालं आणि आम्ही हा सरस्वतीचा गुप्त ज्ञान धनाचा प्रवाह, किती पैसे त्यांचे या प्रकल्पात गेले असतील काही गणती नाही. त्यांनी तो हिशोब ठेवला नाही. घेणारा तर बेहिशोबीच असतो...! धाराशिवच्या कडेकपारी राहणा-या पारध्यांच्या वस्त्या-वस्त्यांतून महादेवराव अनेकदा हिंडले. Yamgarwadi मला हिंडवलं. मला कळलं नव्हतं की, हे सर्व माझ्याच गळ्यात पडणार आहे. गुरुजींचा व्यवहार, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं त्यांच्या घराची दारं बंद केव्हाच नसत. आलेल्या प्रत्येकाला जेवण-चहापाणी मध्यरात्रीसुद्धा वहिनी रांधून वाढत.
 
लक्ष्णण माने, आसाराम जाधव गुरुजी, बाळकृष्ण रेणके यांच्या विविध आंदोलनात काम करता करता संघाच्या कामातही सहभागी होत होते. भटके विमुक्त विकास परिषदेचं स्वतंत्र काम त्यांनी उभं केलं. Yamgarwadi भटके विमुक्त जाती जमाती समितीचे (शासकीय) ते निमंत्रित सदस्य बनले. संपूर्ण महाराष्ट्रभर ते समितीत आमच्या बरोबर होते. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग समितीच्या कामकाजात झाला. ‘अभ्यासेन प्रकटावे' या सूत्राप्रमाणे त्यांचं वाचन जाती जातींचं सुक्ष्म निरीक्षण. वहीमध्ये टिपण करणं. Yamgarwadi न थकता न कंटाळता एकेक प्रकरण चिकाटीने मार्गी लावणं. यमगरवाडीला खरा आकार आला, तो महादेवरावांच्या तिथल्या अस्तित्वानं. मुला-मुलींमध्ये त्यांचा सहज वावर असे. अत्यंत खोडकर, व्रात्य मुलांना बदलण्याची त्यांची हातोटी विलोभनीयच. प्रेमानं पाठीवर थाप मारून, ‘‘अरे ‘भाड्या' असं वागू नये...'' या ‘भाड्या' शब्दावर प्रेमानं असा भर देत की, तो मुलगा सुतासारखा सरळ येई. Yamgarwadi यमगरवाडीत एक दुर्घटना घडली. एका लहान मुलाला ताप आला आणि बघता बघता तासाभरात तो गेलाही.
 
Yamgarwadi आमची पाचावर धारण झाली. पण महादेवराव शांतच होते. त्यांच्याच कैकाडी समाजातला तो मुलगा. त्यांचे सर्व आप्त अचानक आलेल्या संकटाने संतापले. त्यांच्या दु:खाला सीमाच नव्हती. Yamgarwadi पोलिस स्टेशन पाहून सर्वत्र महादेवरावांच्या शांत, समजूतदार स्वभावानं येणारं, घोंघावणार वादळ शांत झालं. बेबी शाहि-या पवार आणि जयश्री कस्तु-या या दोघींवरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर एकदा महादेवराव म्हणाले, ‘‘गिरीशजी, आपल्या कामाचा प्रभाव केव्हा पडणार आणि समाज केव्हा सुधारणार? मनुस्मृती लिहिणारा मनू कदाचित पारधी असेल. Yamgarwadi कारण स्त्री जीवनाचा त्याचा अभ्यास, सामाजिक अभ्यास किती खोलवर होता. पारध्यामध्ये जो काम करेल त्याला जगातल्या कुठल्याही सामाजिक समस्येला तोंड देता येईल...'' अनेक अडचणींवर मात करीत महादेवरावांनी आपली नोकरी, संसार आणि जगावेगळं समाज कार्य केलं. साध्या-सरळ स्वभावानं कधी कधी त्यांचा घातही झाला. Yamgarwadi असं का व्हावं? अशाच सज्जनांच्या हे काटेकुटे वाट्याला का यावेत...? दुस-यावर निरंतर छाया धरणा-याच्या जीवनात वाळवंटाची वाट का यावी... की यालाच जीवन म्हणायचे...! परमेश्वर अशांचीच का परीक्षा घेतो...?