द्रौपदी मुर्मू होणार पहिल्या आदिवासी राष्ट्रपती !

president मूलभूत सुविधा आणि विकासापासून वंचित

    दिनांक :23-Jun-2022
|
दिल्ली वार्तापत्र 
- श्यामकांत जहागीरदार
 
राष्ट्रपतिपदाच्या president निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची तर विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजपाला बहुमतासाठी काही मते कमी पडतात; मात्र काही पक्षांच्या मदतीने भाजपाला ही निवडणूक जिंकण्यात काही अडचण येईल, असे वाटत नाही. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित समजला जात आहे. मुर्मू यांची उमेदवारी जाहीर करून भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. मुर्मू यांच्या उमेदवारीमुळे झारखंड मुक्ती मोर्चाचीही अडचण होणार आहे. कारण, एक आदिवासी महिला राष्ट्रपती president होणार असल्यामुळे आदिवासी हिताचे राजकारण करणाऱ्या झामुमोला मुर्मू यांनाच मतदान करावे लागणार आहे. दुसरीकडे मुर्मू या ओडिशाच्या असल्यामुळे बिजू जनता दलही त्यांच्या उमेदवारीला विरोध करू शकणार नाही.
 

murmu 
विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या नावातच यशवंत असले, तरी ते या निवडणुकीत यशवंत होण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नाही. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात देशाला प्रथमच एक आदिवासी महिला राष्ट्रपती president म्हणून मिळणार आहे. महिला राष्ट्रपतींचा विचार केला तर मुर्मू या दुसऱ्या राष्ट्रपती president ठरतील. याआधी प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या होत्या. राष्ट्रपतिपदासाठी यावेळी चार महिलांचीच नावे चर्चेत होती. द्रौपदी मुर्मू यांच्याशिवाय उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके आणि तेलंगणाच्या राज्यपाल तामीलसाई सुंदरराजन. यात मुर्मू यांनी बाजी मारली.
देशात आतापर्यंत तीन मुस्लिम, दोन दलित, एक महिला आणि एक शीख राष्ट्रपती president झाले. झाकीर हुसैन, फक्रुद्दिन अली अहमद आणि एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम राष्ट्रपती होते. के. आर. नारायणन आणि रामनाथ कोविंद हे दोन दलित राष्ट्रपती झाले. ग्यानी झैलसिंग हे शीख तर प्रतिभाताई पाटील या महिला राष्ट्रपती होत्या. पण या देशाची मूळ संस्कृती असणाऱ्या आदिवासी समाजाला आतापर्यंत कधी राष्ट्रपतिपद मिळाले नाही. मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाचा president उमेदवार बनवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक जबरदस्त मास्टरस्ट्रोक खेळला आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या धक्कातंत्राच्या राजकारणाचा परिचय देशाला करून दिला आहे.
५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ४७ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. देशातील जवळपास ६० मतदारसंघ आदिवासीबहुल आहेत. मात्र, देशातील १० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघात निर्णायक संख्येत असणाऱ्या आदिवासी समाजाला राजकारणात आतापर्यंत फारसे प्राधान्य आणि महत्त्व मिळाले नाही. महाराष्ट्र, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाचा president उमेदवार बनवत या समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या दुर्गम आणि अविकसित भागात वास्तव्याला असणारा आदिवासी समाज हा या देशातील मूळ रहिवासी असला, तरी तो आतापर्यंत पूर्णपणे उपेक्षित आहे.
विकासापासून वंचित आहे. विकासाच्या आणि प्रगतीच्या कोणत्याही सोयी-सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधांपासूनही तो दूर आहे. मुर्मू या राष्ट्रपती president झाल्यामुळे या समाजाकडे आता सरकारला लक्ष द्यावे लागेल. विकासाच्या सूर्याची किरणे या समाजापर्यंत पोहोचवून त्यांच्यातील अंधकार दूर करावा लागेल. देशाच्या आदिवासी भागातच नक्षलवाद आहे. त्यामुळे आदिवासी भागापर्यंत विकासाचे फायदे पोहोचले तर नक्षलवादाची समस्याही आपोआप कमी होऊ शकते. आतापर्यंत आदिवासी समाज हा नक्षलवाद आणि पोलिस प्रशासन या दोघांच्या कचाट्यात सापडत होता. नक्षलवादी त्यांना पोलिसांचे खबरे समजायचे तर पोलिस त्यांना नक्षलवादी समर्थक. त्यामुळे या समाजाचे दोन्ही बाजूने मरण होत होते. त्याला आता काही प्रमाणात आळा बसेल, असे वाटते.
यावेळच्या राष्ट्रपतिपदाच्या president निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा संबंध झारखंडशी आहे. द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचे राज्यपालपद भूषवले आहे, तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा झारखंडचेच आहेत. देशात आदिवासी व्यक्तीला राष्ट्रपती president बनवण्याचा प्रयत्न याआधीही झाला होता. १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. यापुढे आदिवासी व्यक्तीच देशाची राष्ट्रपती व्हावी, असा प्रस्ताव संगमा यांनी अ. भा. आदिवासी विकास परिषदेत पारित करून घेतला होता. कृष्णवर्णीय बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात, तर आदिवासी व्यक्ती देशाची राष्ट्रपती president का होऊ शकणार नाही, असा प्रश्नही संगमा यांनी विचारला होता. आदिवासी व्यक्ती लायक नसेल तर त्याला राष्ट्रपती करू नका, पण लायक असेल तर त्याला डावलूही नका, असे संगमा यांनी १० वर्षांपूर्वी म्हटले होते. संगमा यांचे स्वप्न मोदी यांनी यावेळी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देत पूर्ण केले. विशेष म्हणजे संगमा यांनी आदिवासी समाजातील सहा नेत्यांची नावे त्यावेळी राष्ट्रपतिपदासाठी सुचवली होती. यात संगमा, नागालॅण्डचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले एस. सी. जमीर, माजी केंद्रीय मंत्री किशोरचंद्र देव, अरविंद नेताम आणि लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा या नावांचा समावेश होता.
 
राजकारणातील नाव चालत नसतील तर संगमा यांनी राष्ट्रपतिपदासाठी माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह यांचेही नाव पुढे केले होते. आपण राष्ट्रपती president होत नाही, हे लक्षात आल्यावर संगमा यांनी यावेळी शक्य होत नसले, तरी येत्या पाच-दहा वर्षांत आदिवासी व्यक्ती राष्ट्रपती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. संगमा यांची ती इच्छा यावेळी मोदी यांनी पूर्ण केली आहे. आदिवासी व्यक्ती राष्ट्रपती president का व्हायला पाहिजे, या प्रश्नावर संगमा अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे वाक्य सांगत असत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर क्लिंटन यांनी, ‘आय प्रॉमिस्ड होप टू अमेरिकन पीपल' असे म्हटले होते. आदिवासींना विश्वास देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी तसेच त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी हे आवश्यक असल्याचे संगमा यांनी म्हटले होते; त्याची आज आठवण होणे अपरिहार्य आहे. २०१२ मध्ये संगमा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आदिवासी कार्ड खेळले होते, पण त्याचा फायदा २०२२ मध्ये देशाला मिळाला आहे. भाजपाने द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात देशाला महिला आणि आदिवासी राष्ट्रपती president दिला आहे. कोणत्याही पदासाठी मोदी योग्य माणसाची कशी आणि किती अचूक निवड करतात, ते यावेळी पुन्हा दिसून आले आहे.
मुर्मू यांच्या रूपात देशाला प्रथमच सर्वात कमी वयाची व्यक्ती राष्ट्रपती president म्हणून मिळणार आहे. २५ जुलैला राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारतील, तेव्हा मुर्मू या ६४ वर्षे ३५ दिवसांच्या असतील. नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपती झाले तेव्हा ते ६४ वर्षे २ महिने ६ दिवसांचे होते. दोन दशकांपासून राजकारणात असणाऱ्या मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात नगरपरिषद सदस्य म्हणून केली. रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या मुर्मू यांनी बिजद आणि भाजपा आघाडी सरकारमध्ये परिवहन, वाणिज्य, मत्स्य आणि पशुपालन खात्याची जबाबदारी सांभाळली. २००७ मध्ये त्यांना ओडिशा विधानसभेचा सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून पुरस्कारही मिळाला होता.
विरोधी पक्षांनी आपले राष्ट्रपतिपदाचे president उमेदवार बनवलेले यशवंत सिन्हा कधीकाळी भाजपाचेच होते. प्रशासनिक अधिकारी राहिलेल्या सिन्हा यांनी अनेक देशांत भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. नंतर प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला. चंद्रशेखर मंत्रिमंडळात अर्थमंत्री तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी काम केले. १९९६ मध्ये भाजपात प्रवेश केलेल्या सिन्हा यांनी २०१८ मध्ये भाजपाचा राजीनामा दिला. मध्ये काही काळ त्यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी राष्ट्रमंचच्या नावाने शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती; मात्र विरोधी पक्षांच्या ऐक्याचे तुणतुणे त्यांना फार काळ वाजवता आले नाही आणि त्यांना आपल्या राजकीय भविष्यासाठी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. १८ जुलैला राष्ट्रपतिपदासाठी रालोआच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकीचा निकाल निश्चित आहे. द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती president होणार आहेत.
 
९८८१७१७८१७