गद्दारांना पक्षात पुन्हा स्थान नाही

    दिनांक :25-Jun-2022
|
- उद्धव ठाकरे यांची भूमिका

मुंबई, 
शिवसेनेशी फारकत घेऊन हिंदूत्वासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असा आग्रह धरत बंड पुकारलेले आमदार ऐकण्याच्या स्थितीत नसल्याची खात्री पक्षप्रमुख Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांना पटल्यानंतर, या बंडखोरांना थेट गद्दार संबोधत, आता गद्दारांना पुन्हा पक्षात स्थान देणार नसल्याची भूमिका Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर केली. अंतर्गत बंडाळीच्या पृष्ठभूमीवर तातडीने निर्णय घेण्यासाठी शिवसेना भवनात बोलावण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
 
 
Uddhav Thackeray
 
शिवसेनेशी गद्दारी करणार्‍यांना पुन्हा पक्षात स्थान देऊ नका, अशी एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली. शिवसेना हा निखारा असून, त्यावर पाय ठेवल्यास जाळून टाकू, असा इशारा Uddhav Thackeray ठाकरे यांनी दिला. गद्दारांनी बाळासाहेबांचे नाव न वापरता, स्वतःच्या बापाचे नाव लावून मते मागावी आणि निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान देताना, आधी नाथ होते, आता दास झाल्याचा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष, पेटंट असू शकत नाही
बाळासाहेबांचे नाव वापरू नका, या उद्धव ठाकरेंच्या विधानावरून आता वाद ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत. राष्ट्रपुरुषाचे नाव वापरण्यावर कोणीही बंदी करू शकत नाहीत. ते कोणा एकाचे पेटंट असू शकत नाही, असा सूर आता उमटू लागला आहे.