आता तरी राजधर्म पाळा !

Uddhav Thackeray अश्रू गाळणारे मुख्यमंत्री

    दिनांक :29-Jun-2022
|
अग्रलेख  
Uddhav Thackeray महाभारतात भीष्म पितामह यांनी महाराज युधिष्ठिरांना राजधर्माचा उपदेश दिला होता. भीष्म पितामह म्हणाले होते, महाराज, ज्या गुणांचा अंगीकार करून राजा मोठा होऊ शकतो, अशा गुणांची संख्या ३६ आहे. त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न जो राजा करतो, त्याचा सतत उत्कर्ष होतो. राजधर्माचा अर्थ होतो राजाचे कर्तव्य. त्यासाठी भीष्माने ज्या ३६ गुणांचा उल्लेख केला, त्यातील काही महत्त्वाचे गुण सांगण्याचा हा प्रसंग आहे आणि त्याला पृष्ठभूमी आहे महाराष्ट्रातील सत्ताधा-यांना झालेल्या राजधर्माच्या विस्मरणाची! Uddhav Thackeray राजाने शूरवीर जरूर असावे, पण बढाया मारू नयेत आणि समाजद्रोही लोकांशी कधीही हातमिळवणी करू नये, असा सल्ला पितामहांनी दिला होता. राजा उदार असला पाहिजे, पण दान अपात्री पडता कामा नये. आपल्या आप्तांशी कधीही संघर्ष करू नये, असेही पितामहांनी सांगितले होते. Uddhav Thackeray मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भीष्म पितामहांसारखा कुणीतरी कधी भेटला असेल, असे अजिबात वाटत नाही. मात्र, त्यांना राजधर्म ठाऊक असेल अशी आशा वाटते आणि त्यामुळेच विवेकाचे दोन शब्द त्यांच्यासाठी सांगावेसे वाटतात.
 

lekh 
 
एकीकडे त्यांच्या पक्षातले बोलभांड अतिआक्रमक लोक आणि दुसरीकडे सत्ता सोडावी लागतेय म्हणून अश्रू गाळणारे मुख्यमंत्री Uddhav Thackeray crying असे विसंगत दृश्य सध्या महाराष्ट्र पाहतो आहे. हा राजधर्म नाही आणि राजकारणदेखील नाही. राजकारणात अश्रूंना जागा नसते आणि राजधर्मात वेल्हाळ वागण्याला स्थान नसते. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे आणि त्यातही शिवसेनेचे सुमारे ४० आमदार फुटले आहेत, हे वास्तव! सरकार अल्पमतात आले आहे, हेही वास्तव. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्यामुळे काही काळ आणखी असाच अनिश्चिततेत जाईल, असे दिसते. पण, आता ही लढाई अश्रूंची नाही आणि अस्मितेची देखील नाही. ती आता कायद्याची आणि बहुमताची लढाई आहे. Uddhav Thackeray कारण हे राजकारण आहे. हे सारे राजकारण असेल तर ते राजकारणाच्या पद्धतीने लढले पाहिजे. धमक्या देणारे एकीकडे, आसवं गाळणारे दुसरीकडे, बतावण्या करणारे तिसरीकडे आणि कहाण्या रचणारे चौथीकडे... Uddhav Thackeray आणि तेसुद्धा सारेच शिवसेनेचे. आसामला गेलेल्या बंडखोर आमदारांच्या बॉड्या परत येतील, ही काही भाषा नव्हे आणि नंतर सारवासारव करण्यासाठी जहालत (मूर्खपणा, अज्ञान) म्हणजे आत्मा मरणे वगैरे सांगणे ही काही समर्थनाची पद्धत नव्हे. Uddhav Thackeray ही सरळसरळ धमकी आहे की, तुम्ही (बंडखोरांनो...) मुंबईत या, आम्ही तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही जिवंत कसे निसटता तेच पाहतो.
 
 
 
नेत्याने आपल्या सहका-यांचा विश्वास गमावला असेल तर त्याने मन मोठे करून मार्ग काढला पाहिजे किंवा अनुभवी-ज्येष्ठ सहकारी सांगत असतील तसे तरी वागले पाहिजे. Uddhav Thackeray ५५ पैकी ४० आमदार फुटतात आणि तरीही मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे कायम राहतात. तिकडे बंडखोर आमदारांच्या वतीने एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर हे दोघेही स्पष्ट सांगतात की, आमचे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांच्याशी भांडण नाही. Uddhav Thackeray मुद्दा आहे तो महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आणि भाजपासोबत सरकार बनवण्याचा. कारण आपण शत्रूशी हातमिळवणी करू नये, असे आमचे म्हणणे आहे. बंडखोरांचा हा मुद्दा स्पष्ट आणि रास्त आहे. शिवसेनेतली ही चौथी फूट आहे. यापूर्वीच्या तीन फुटींच्या तुलनेत ही निर्णायक आहे. म्हणजे अख्खा पक्षच त्यात संपून जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. Uddhav Thackeray अशावेळी राजाने पक्ष वाचवायचा की खुर्ची वाचवायची, हा खरा राजधर्माचा मुद्दा. उद्धव ठाकरे यांनी अट्टाहास न करता चर्चेचा मार्ग मोकळा करायला हवा होता. Uddhav Thackeray त्यातून मार्ग निघाला असता. अजूनही निघू शकतो.
 
Uddhav Thackeray भाजपा हा शिवसेनेचा दीर्घकाळचा मित्रपक्ष आहे. एकदा नव्हे दोनदा या दोघांच्या युतीने महाराष्ट्राचे सरकार चालविले आहे. ३०-३५ वर्षे हे दोन पक्ष सोबत होते. दोन वेगवेगळे पक्ष असल्यामुळे त्यांच्यात मतभेद असतील. कुरघोडीचे राजकारणही झाले असेल. राजकारणात हे सगळे चालत असते. Uddhav Thackeray भाजपाने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, असे जे आरोप केले जातात, त्यात मात्र अर्थ नाही. कुणीही कुणालाही संपवू शकत नाही. लोकशाहीत फक्त जनताच कुणाला वर किंवा खाली नेऊ शकते. फक्त सत्ता आणि मुख्यमंत्रिपद यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या अगदी दुस-या तीरावरच्या, हिंदुत्वविरोधी आणि कथित पुरोगाम्यांशी हातमिळवणी करणे हा खरे तर लोकक्षोभासाठी पुरेसा मुद्दा होता. Uddhav Thackerayपण, भाजपाने संयम राखला. २०१९ सालातील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या सोबत शिवसेना होती. जो काही कौल मिळाला, तो युतीला मिळाला होता. Uddhav Thackeray पण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना समोर करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खेळी खेळली आणि त्यात शिवसेना अडकली. काँग्रेसही मागून साथीला आली. मुद्दा होता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा. कारण काय तर तो हिंदुत्ववादी पक्ष आहे म्हणून!Uddhav Thackeray
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे BalaSaheb Thackeray यांनी ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आजन्म लढा दिला, त्यांच्याच शिवसेनेने याच दोन पक्षांशी हातमिळवणी करून सेना-भाजपा युती संपविली. हिंदुत्वही गुंडाळून ठेवले. त्यामुळे ज्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्या दिवसापासून निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. Uddhav Thackeray ज्यांना आपण सातत्याने विरोध केला, जे लोक सतत हिंदूंच्या विरोधात बोलत असतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे कसे आणि त्यांच्या पालखीचे भोई व्हायचे कसे, असा त्यांचा सवाल होता. BalaSaheb Thackeray ज्या भाजपाशी आपण हिंदुत्वाच्या मुद्यावर संबंध जोडले, त्या पक्षाच्या नेत्यांवर दुगाण्या झाडायच्या कशा, असाही त्यांचा प्रश्न होता. पण, उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते होते. नंतर ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे हा वाद वाढला नाही म्हणा, किंवा दडपला गेला म्हणा. मात्र, अस्वस्थता संपली नव्हती. तिने बाहेर येण्यासाठी वेळ घेतला एवढेच! BalaSaheb Thackeray एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह चाळिसेक शिवसेना आमदारांचे जे बंड आहे, त्याला ही पृष्ठभूमी आहे आणि आता या बंडाचा निर्णय धमक्यांनी किंवा आसवांनी नव्हे तर कायद्याने होणार आहे. BalaSaheb Thackeray  राजधर्माची मूलभूत सूत्रे आणि आधुनिक लोकशाहीत अपेक्षित असलेल्या विचारपद्धतीनुसार, शिवसेनेच्या भूमिकेविरुद्ध गेलेले आमदार हे बंडखोर असतील वा अन्य कुणी, ते जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत, हे मान्य केले पाहिजे.
 
BalaSaheb Thackeray  त्यांना त्यांच्या मतदारांनी बहुसंख्येने निवडून दिलेले आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे बरे-वाईट कळते आणि त्यामुळेच त्यांना स्वतःबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांना आता या महाविकास आघाडी सरकारात राहण्याची इच्छा नसेल तर त्यांना कुणीही अटकाव करू शकत नाही. BalaSaheb Thackeray  त्यांना धमक्या देण्यात किंवा त्यांच्यामुळे खुर्ची सोडण्याचा प्रसंग आला असेल तर त्यासाठी अश्रू ढाळण्यात मर्दुमकी नाही. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या कायम आहेत. शासन-प्रशासन त्यांच्या हातात आहे. जे काही व्हायचे ते होऊन गेले आहे. आधी युती तुटली, आता शिवसेनेत बंडखोरी झाली. BalaSaheb Thackeray  युती तुटण्याच्या घटनेतच शिवसेनेतल्या बंडखोरीची मुळे आहेत, हे उद्धवजींच्या लक्षात आले असेलच. या बंडखोरीचे जे काही व्हायचे ते होईल. आता स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेसाठी त्यांनी राजधर्म पाळावा. BalaSaheb Thackeray पक्षातील आणि पक्षाबाहेरील स्वत:च्या विरोधकांना त्यांची मते मांडू द्यावीत आणि आपल्या बाजूने किंवा विरोधात मतदान करू द्यावे.
 
BalaSaheb Thackeray  जे काय व्हायचे ते सदनात घडू द्यावे. त्यासाठी निर्भयतेचे वातावरण निर्माण करावे. BalaSaheb Thackeray  त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी जी काही तोडफोड चालविली आहे किंवा त्यांच्या पक्षातील विश्वप्रवक्त्यांनी जी धमक्यांची भाषा सुरू केली आहे, ती उद्धवजींना रोखावी लागेल. शिवसेना हा राजकीय पक्ष नाही; ती एका कुटुंबावर अवलंबून असलेली व त्याभोवतीच केंद्रित असलेली एक संघटना आहे, असे सेनेचे विरोधक म्हणतात. BalaSaheb Thackeray  बंडाच्या पृष्ठभूमीवर झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काही ठराव झाल्याच्या बातम्या आल्या तेव्हा लोकांना कळले की, या पक्षाला कार्यकारिणी वगैरे आहे. हे समज खोटे ठरवण्याची ही संधी आहे आणि ती संधी त्यांना जे झाले ते मान्य करण्यावाचून वापरता येणार नाही. BalaSaheb Thackeray  राजधर्मात पुरुषार्थाला फार मोठे महत्त्व आहे. पुरुषार्थाविना कोणताही राज्यप्रमुख शासन संचालनात निर्णायक भूमिका करू शकत नाही. युती तोडण्याच्या निर्णयासाठी उद्धव ठाकरेंना इतिहास माफ करेल की नाही, हे आज सांगता येत नाही. परंतु, राजधर्माचे पालन करून स्वत:च्या आणि पक्षाच्या प्रतिमेला उजळपणा प्राप्त करून देण्याची संधी नियती त्यांना देऊ इच्छिते. BalaSaheb Thackeray  तिचा लाभ घेऊन पुनरुज्जीवित व्हायचे, की शत्रूंशी हातमिळवणी केल्यामुळे अटळ दिसत असलेल्या विनाशाला आमंत्रण द्यायचे हे त्यांनाच ठरवायचे आहे.