‘वानप्रस्थाश्रम' - प्रवृत्तीकडून नियुक्तीकडे !

Hindu Cultureसृष्टीतील सर्व श्रेष्ठ प्राणी कोण?

    दिनांक :03-Jun-2022
|
जीवन जिज्ञासा
- प्राचार्य प्र. श्री. डोरले 
Hindu Culture मानवी जीवनाचे दोन प्रमुख आयाम आहेत. अभ्युदय आणि निःश्रेयस! अभ्युदय म्हणजे सर्व प्रकारच्या भौतिक समृद्धतेने विनटलेले जीवन. त्याची व्यवस्था भारतीय जीवन पद्धतीतील अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थांच्या द्वारा वेद-उपनिषद काळापासून भारतीय संस्कृतीत प्रस्थापित झाली आहे. Hindu Culture नुसतीच प्रस्थापित झाली नाही तर ती भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग झाली आहे. आपले पूर्वज नुसतेच विचार करून, सूचित करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी कार्यवाहीत आणण्याच्या दृष्टीने मानवाचे आयुष्य कमीत कमी शंभर वर्षांचे गृहीत धरून त्याची ब्रह्मचर्याश्रमादि चार आश्रमांमध्ये विभागणी करून, त्या त्या वयोगटाला साजेशा आणि भावनिक, मानसिक, शारीरिक क्षमतांवर आधारित अनुशासन निर्माण केले. त्या अनुशासन पालनाच्या सोयीसाठी शास्त्र निर्माण केले. Hindu Culture त्यातूनच क्रमविकासाची, उत्क्रांतीची प्रक्रिया भारतीय जीवन रचनेत सहजपणे प्रस्थापित झाली.
 

jj  
 
Hindu Culture चार आश्रमांच्या रचनेचा मूलभूतपणे विचार केला तर हे सत्य आपल्या सहजपणे लक्षात येते. Hindu Culture या सर्व प्रक्रियांची रचना करण्याआधी त्यांनी ज्या मानवी जीवनाचा विकास करायचा त्याचा मुख्य केन्द्रबिंदू असलेल्या ‘मानवाचा' समग्रपणे सम्यकतेने विचार केला. त्याचे आकलन केले. त्याचे मूळ स्वरूप समजावून घेतले आणि त्याबरहुकूम (अ‍ॅकॉर्डिंगली) त्याचे संस्कारांच्या माध्यमातून उपयोजन केले. त्याचमुळे लक्षावधी वर्षे या जीवनधारणा, रचना सातत्याने चालत राहिल्यात. Hindu Culture त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगातील संस्कृतींपेक्षा श्रेष्ठतम, विज्ञानानिष्ठ ‘नराचा नारायण' करणारी, पशुभावाकडून देवभावाकडे नेणारी ‘सर्व खल्विंद ब्रह्म' विज्ञानाच्या परिभाषेत ‘वननेस ऑफ युनिव्हर्स'ची अनुभूती देणारी ‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु' ही वैश्विक सद्भावना व्यक्त करणारी, प्राचीनतम हिंदू संस्कृती Hindu Culture उदयाला आली आणि तिने सांस्कृतिकदृष्ट्या संपूर्ण जगाचे गुरुपद भूषविले. तिच्या या सामर्थ्याचा उगम तिच्या आध्यात्मसंपन्न, दैवीगुणसंपन्न, स्वयंभू, स्वयंपूर्ण रचनेत आहे.
 
 
 
आम्ही पुत्र अमृताचे
Hindu Culture पाश्चात्त्य विचारवंतांनी ‘मॅन इज अ‍े सोशल अ‍ॅनिमल' अशी पशुभावाला धरून माणसाची व्याख्या केली आहे. पण अनादिकाळापासून सृष्टीतील सर्व श्रेष्ठ प्राणी कोण? याची चर्चा ऋषिमंडळातील अखंडपणे नैमिष्यारण्यातील चालणा-या ज्ञानसत्रामध्ये होत असे. त्यात आद्यगुरू महर्षी व्यासांनी अधिकृतपणे घोषणा केली की, ‘न हि मनुष्यात श्रेष्ठतरं हि कश्चित' संपूर्ण विश्वात मनुष्यच सर्व श्रेष्ठ आहे. (कृपया १२ मार्च २०२१ चा लेख पहावा.) Hindu Culture कारण त्याला विवेकज्ञान आहे. कर्मस्वातंत्र्य आहे. तो आपले प्रारब्ध, संचित, ज्ञान, कर्म, योग, भक्ती यांच्या साह्याने बदलू शकतो. देहबुद्धी ती आत्मबुद्धीत रूपांतरित करू शकतो. याचा निर्वाळा भगवद्गीतेनेही दिला आहे की, ‘मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. स्वतःला अधोगतीला नेऊ नये. कारण मनुष्य आपणच आपला बंधू म्हणजे हितकर्ता आहे व आपणच आपला शत्रू आहे.' (अ. ६ वा. श्लोक ५, ६) त्यामुळे या नरदेहाचे दैवीगुण संपदेने (वुईथ डिव्हाईन पॉवर) युक्त असलेले स्वरूप जे मुळातच आहे, ते लक्षात घेऊन त्याचे बळ वाढविणारी संस्कार प्रक्रिया, जीवनाची आखणी चार आश्रमांच्या रूपाने भारतीय जीवन पद्धतीत झाली आहे. Hindu Culture
 
त्यासाठी आवश्यक असलेले जीवनमूल्ये, ‘ऋत' म्हणजे निसर्गसिद्ध असलेले मूळ स्वरूप. सत्य म्हणजे, त्याचा आविष्कार, विज्ञानाच्या परिभाषेत यालाच ‘कॉस्मिक लॉज' म्हणतात. Hindu Culture त्यावर ते आधारित आहेत. त्यामुळे ते शाश्वत आहेत. निरपेक्ष आहेत. म्हणूनच ते आधुनिक काळातही व्यवहार्य आहेत. फक्त पूर्वजांचे जीवनोपयोगी, मूल्यवान संस्कारांचा वारसा ही श्रद्धायुक्त भावना त्यासाठी आवश्यक आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम हे अभ्युदयासाठी निश्चित केलेले दोन कार्यक्षेत्रे आणि जीवनाचे कालखंड आहेत. गणिती भाषेत बोलायचे झाले तर वयाच्या आठव्या वर्षी व्रतबंध म्हणजे मौंज होऊन बालवयात गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी त्याला पाठविले जाई. Hindu Culture तेथे १२ वर्षे सूर्यनमस्काराचे रूपाने बलोपासना, विविध शास्त्र, विषयांच्या अध्ययन रूपाने ज्ञानसाधना, श्रमनिष्ठा, स्वावलंबन, कृषिकार्य, गोशाळेतील गो-सेवा, नियमित बुद्धिवर्धक असलेले, अग्नितत्त्व प्रधान असलेले धारोष्ण गाईचे दुग्ध प्राशन, सात्त्विक आहार, वनश्रीचे सौंदर्यमय उल्हसित निसर्गदृश्य, गुरुमातेचे प्रेम, गुरूचा आधार आणि कसलेही नैसर्गिक पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण नसलेले, आश्रमीय वातावरण पूर्ण विकसित झालेला २१ वर्षांचा ज्ञान-बल-संपन्न असा युवक स्वगृही परत येत असे. Hindu Cultureत्यानंतर तो पितृऋण, समाजऋण फेडण्याच्या उदात्त हेतूने गृहस्थाश्रमाचा अंगीकार करीत असे. आश्रमीय संस्कारांमुळे त्याचा गृहस्थाश्रमदेखील धन्य होत असे. त्या गृहस्थाश्रमाचे वर्णन आपण या आधीच्या लेखात पाहिलेच आहे.
 
प्रवृत्तीतून नियुक्तीकडे
वयाच्या सुमारे ५५ ते ६० वर्षांपर्यंत गृहस्थाश्रम परिपूर्ण होत असे. आज त्याला आपण ‘पेन्शनर्स लाईफङ्क म्हणतो. या वयात ‘काम' आणि ‘अर्थ' हे सहजपणे संयमित होतात. कुटुंबप्रमुख म्हणून मुलांचे शिक्षण, मुलींचे विवाह या सर्व पितृधर्माचे पालन पूर्ण झालेले असते. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा कधीच पूर्ण झालेल्या असतात. अशा अवस्थेतच ‘वानप्रस्थाश्रमाचा' प्रारंभ होतो. आधुनिक काळाच्या संदर्भातही त्याचे पालन सहज-साध्य आहे. त्यासाठी प्रत्यक्ष वनामध्येच गेले पाहिजे असे नाही. कारण ‘वानप्रस्थाश्रम' आणि ‘संन्यासाधर्म' हे जड कर्मांपेक्षा ‘मानसिकतेशी' अधिकाधिक संबंधित आहेत. प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाण्याचा हा प्रवास आहे. हा प्रवास आंतरिक आहे. त्यामुळेच तो तसा होणे अभिप्रेत आहे. तो विचार नीट होण्यासाठी आज आधुनिक काळाचा, यंत्रयुगाचा, भौतिकवादी दृष्टिकोनावर आधारित, प्रस्थापित झालेल्या जीवन पद्धतीचा संदर्भ लक्षात घेणे जरूर आहे. त्यासाठी आधुनिक काळातील वानप्रस्थी जीवनाचा विधायक दृष्टीने, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आधुनिक विचारवंत कसा विचार करतात? ते समजण्याला त्यांच्या चिंतनाचा, अभ्यासाचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. त्याने आधुनिक परिस्थितीच्या संदर्भात भारतीय जीवन पद्धतीतील वानप्रस्थाश्रमाचेच चिंतन होईल. वानप्रस्थाश्रम म्हणजे ‘कर्मनिवृत्ती', ‘सेवानिवृत्ती' म्हणजे ‘रिटायर्डमेंट' ही संकल्पना गृहीत धरून अमेरिकेतील एका विख्यात मानसशास्त्रज्ञाने वर्तनवादी शास्त्राच्या (विव्हेवियरल सायन्स) दृष्टीने एक शोध निबंध सादर केला.
 
फाईटिंग द रिटायर्टमेंट ब्ल्युज
वरील निबंधात त्याने काही मूलभूत मानसिक प्रमेयांची चर्चा केली आहे. तो म्हणतो, ‘लौकिकदृष्ट्या, वयोमानाप्रमाणे आपण सेवानिवृत्त झालो असलो, तरीसुद्धा आपण ख-या अर्थाने मानसिकदृष्ट्या ‘निवृत्त' झालो आहोत का? याचे कठोर आत्मपरीक्षण, आत्मqचतन केले पाहिजे. कारण मानसिक स्तरावर जर ती ‘निवृत्ती' झाली नसेल आणि ‘आसक्ती' कायमच असेल तर प्रतिक्रियास्वरूप अनेक ‘मेंटल प्रॉब्लेम्स् कॉम्प्लेक्स' निर्माण होतात. नकारात्मक भावाचे (निगेटिव्ह थॉट्स) भक्ष्य होण्याची भीती निर्माण होते. त्याचे स्वरूप वर्णन करताना तो मानसशास्त्रज्ञ म्हणतो- ‘वस्तुस्थिती अशी असते की, कोणीतरी ‘मोठे' असलेले आपण कुणीतरी नसल्यात जमा होतो. ‘समबडी रेड्युसड् इमिजिएटली टु अ‍े नो बडी'  हा बदल आपले मन एकदम स्वीकारायला तयार होत नाही. आयुष्याची सुमारे ३० वर्षे ‘कुटुंब प्रमुख' म्हणून आणि कोणत्याही कंपनीत, बँकेत ‘बॉस' म्हणून वावरत असणा-याच्या मनाला केवळ ‘हुकूम' (ऑर्डर) देण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीशी त्यांना एकदम जुळवून घेणे कठीण जाते. या मानसिकतेचे वर्णन त्याने ‘आकाशातील वा समुद्रावरील अंधारलेले धुके' असे केले आहे.
 
ही वस्तुस्थिती, सत्य परिस्थिती लक्षात घेऊन, मान्य करून त्याप्रमाणे वागण्यात, स्वभावात, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा विवेक जर राहिला नाही, तर मानसिक स्तरावर नकारात्मक भाव निर्माण होतो. (निगेटिव्ह आस्पेक्ट) त्यातून आत्मवंचना, आत्मपीडनाची भावना निर्माण होते. ‘आपण उपेक्षित आहोत, ‘कुणाला आपली आता गरज नाही', ‘कुणी आता पहिल्यासारखी किंमत देत नाही' असा प्रतिक्रियात्मक (रिअ‍ॅक्शनरी) भाव निर्माण होऊन त्यातून वादविवाद, संताप, उद्वेग, चिडचिड, क्षोभ निर्माण होऊन कुटुंबातील वातावरण बिघडते. घरातील वातावरण कलुषित होते. या संबंधात मार्गदर्शन करताना हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो- ‘चुकूनही नकारात्मक भावाच, आत्मपीडनाचे, गैरसमजुतीचे ‘भक्ष्य' बनू नका. त्यातून तुम्हाला काय बरे मिळणार आहे?' ...एकसेप्ट स्प्रेडिंग मायझरी ऑल अराऊंड, अ‍ॅफेक्टिंग द नीअर अँड डियरवन्स... धिस इज द विसडम ऑफ ओल्ड एज.'
 
भारतीय जीवन पद्धतीत, तत्त्वज्ञानात त्याचसाठी ‘विवेकाची' महती गायिली आहे. श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे ‘विवेकामध्ये सापडेना। ऐसे तो काहीच असेना।।' वानप्रस्थाश्रमात तर त्याची विशेष जोपासना, उपासना करणे जरूर आहे. कारण जीवनातील ‘प्रवृत्ती'कडून ‘निवृत्ती'कडे आणि त्यातून पुढे ‘मोक्षाकडे जाण्याच्या मार्गावरील वानप्रस्थाश्रम हे महाद्वार आहे. गृहस्थाश्रमातील आवश्यक ते सर्व कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी जर मी प्रामाणिकपणे ‘मुले लेकुरे सर्व मेळा सुखाचाङ्क असलेला हा बगिचा लावून विकसित केला आहे, तर मला आत्मपीडन करण्याचा, खंतावण्याचे काही कारणच (गिल्टी काँशन्स) नाही. उलट त्यांचे जीवनात आनंद, सुख समाधान निर्माण करण्यात मी माझी भूमिका वठवीन, हा विधायक दृष्टिकोन ठेवणे जरूर आहे. पण त्यासाठी आपल्यातला ‘मी' ‘मी हे सर्व केले.' ‘माझ्यामुळे हे सर्व झाले.' ‘मी शून्यातून हे सर्व विश्व निर्माण केले.' ‘माझ्यामुळे तुम्हाला हे दिवस दिसताहेत' या वाक्यातून प्रकट होणा-या ‘अहं'चा, ‘मी'चा म्हणजे आसक्तीचा विलय करीत जाणे हेच ‘वानप्रस्थाश्रमाचे' अनुशासन आहे. कारण कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगीच होय, हे भगवद्गीतेने म्हटले आहे. त्या दृष्टीनेही वानप्रस्थाचे अनुशासन पुढील संन्यासाश्रमाची पूर्व तयारीच म्हणता येईल.