मर्यादित संसाधने,अमर्यादित वापर!

global warming वरुण राजा नाराज, पावसाचे चक्र बदलले

    दिनांक :05-Jun-2022
|
आसमंत  
- गजानन निमदेव
‘ग्लोबल वार्मिंग' global warming हा शब्द ऐकला नाही असा शोधूनही सापडायचा नाही. परंतु, दुर्दैवाने हा शब्द माहिती असूनही त्याचे गांभीर्य आपल्याला कळले नाही. काय फालतू शब्द आहे हा global warming असे म्हणत आपणच या इंग्रजी शब्दाची टिंगलटवाळी केली. आज त्या टिंगल टवाळीचे परिणाम आपण सगळे भोगत आहोत. पर्यावरणाप्रति आपली असलेली उदासीनता आणि अनुशासनहीनता आपल्या लवकरच मरणाच्या दाराकडे घेऊन जाणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतरही आपण सुधरायला तयार नाही, global warming ही सगळ्यात दु:खाची बाब होय. आज आपण उन्हाचे जे चटके सहन करीत आहोत, त्याला जबाबदार आपणच आहोत. global warming नागपूर-विदर्भात मे महिना भयंकर तापला. सूर्य आग ओकत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांनी रकानेच्या रकाने भरून छापल्या. नागपुरात तर यंदा अनेक वर्षांचा विक्रम मोडला गेला एवढी वाढ तापमानात झाली. सुमारे ४६ अंश सेल्सिअस एवढ्या भीषण तापमानाची नोंद यंदा झाली. global warming चंद्रपूरने तर मागचे सगळे विक्रम मोडले. ४७ अंश सेल्सिअस एवढे तापमान चंद्रपुरात नोंदले गेले. global warming उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील लोक हैराण झाले. कूलर्स लावूनही उन्हाच्या चटक्यांपासून लोकांची सुटका झाली नाही.
 

enviro 
 
मराठवाड्यात तर भीषण असा दुष्काळ global warming पडला. औरंगाबादचा पाणीप्रश्न तर प्रचंड पेटल्याचे आपण पाहिले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तिथे पाण्यासाठी आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. असे मोर्चे सगळीकडे निघावेत याची वाट आपण पाहतो आहोत काय? global warming विदर्भातीलही सगळ्या भागात पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. त्यातच उष्णतामान अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने संकटात भर पडली. संकटाची ही मालिका भविष्यात आणखी तीव्र आणि गंभीर होत जाईल आणि माणसाचे या धरतीवरील जगणे कठीण होईल, याची जराही चिंता आपल्याला वाटू नये, एवढा करंटेपणा आपल्यात आला आहे. global warming  या धरतीवर प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करता येतील एवढी संसाधने उपलब्ध आहेत, परंतु एका व्यक्तीची लालसा पूर्ण करण्याची क्षमता या संसाधनांमध्ये नाही, असे महात्मा गांधी यांनी म्हटले आहे. global warming जी संसाधने आहेत, त्यांचा गरजेनुसार मर्यादित वापर केला तर शोषण होणार नाही आणि वातावरणाचे नुकसान होणार नाही, असेच महात्मा गांधींना म्हणायचे असेल. global warming पण, महात्मा गांधींचे विचार समजण्याएवढी प्रगल्भता आपल्यात आलीच कुठे?
 
 
 
आपल्याकडच्या रस्त्यांचे उदाहरण घेता येईल. global warming असंख्य महामार्ग चौपदरी करण्यात आले. त्यासाठी असंख्य झाडे तोडण्यात आली. महामार्ग चौपदरीकरणाच्या आड आलेल्या हजारो मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली. झाडांच्या या कत्तलीने महामार्गही बकाल झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari महामार्गांच्या बाजूला झाडे लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत, ही दिलासा देणारी बाब असली तरी एकटे गडकरी काय काय करणार, हा प्रश्नच आहे. आपणही या देशाचा जागरूक नागरिक या नात्याने गडकरी यांना त्यांच्या कामात सहकार्य करायला नको? जगातल्या अनेक प्रगत देशांनीही जंगलं नष्ट global warming केली आहेत. वातावरणातील बदलास ही स्थिती कारणीभूत ठरली आहे. वाटसरूंना सावली देणारी आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारी लाखो झाडे तोडली गेल्याने त्याचे परिणामही आता दिसू लागले आहेत. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात चारपट नवी झाडे लावण्याचे बंधन कायद्याने घातले आहे. global warming पण, अशी झाडे लावली जातात का आणि लावलेल्या झाडांपैकी किती जिवंत राहतात, हे प्रामाणिकपणे तपासणारी आणि ठोस कारवाई करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे काय? मी स्वत: जे दृश्य पाहिले ते निराशाजनक आहे. global warming लावलेल्या झाडांपैकी असंख्य झाडे सुकली आहेत. याकडे आताच लक्ष दिले नाही तर येणारा काळ माफ करणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.
 
global warming झाडं तोडल्याचे अन् जंगलांचा सत्यानाश केल्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतानाही आम्ही सुधरायला तयार नाही. मी एकट्याने एखादे झाड तोडले तर काय मोठा फरक पडणार आहे, असा विचार करून चालणार नाही. कारण, आपल्यापैकी प्रत्येकाने जर असा विचार केला तर पृथ्वीचा विनाश जवळ आलाच म्हणून समजा. global warming जंगलांचा सफाया झाल्याने उन्हाची तीव्रता आणि दाहकता आपण अनुभवत आहोत. अंतरिक्षातून येणारी प्रत्येक गोष्ट आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. रस्ते मोठे करण्यासाठी आपण फक्त झाडेच तोडली नाहीत, डोंगरच्या डोंगरही उद्ध्वस्त केले आहेत. त्याच्या परिणामी वरुण राजा नाराज झाला आहे. global warming पावसाचे चक्र बदलले आहे. पावसाचे दिवस कमी होऊन उन्हाचे दिवस वाढले आहेत. global warming मराठवाड्यातील दुष्काळ याचा पुरावा आहे.
 
ईश्वराने आम्हाला जी पृथ्वी दिली होती ती संपन्न आणि समृद्ध होती. global warming आम्ही आमच्या लालसेपोटी तिचे प्रमाणापेक्षा जास्त दोहन केले, करीत आहोत आणि तिचा सर्वनाश होईपर्यंत करणार आहोत. कारण, तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे आम्ही मानतो. आपल्याकडे अधिकार प्रत्येकाला माहिती आहे. global warming दुर्दैवाने कर्तव्याचा विसर पडत चालला आहे. संपन्न आणि समृद्ध धरतीची वाट लावण्याचा विडा उचलल्यासारखे आम्ही वागत आहोत. आज वाढलेल्या महागाईसाठी आपण सरकारला जबाबदार ठरवितो आहोत. वाढलेल्या महागाईचे एक कारण सरकार असू शकेल. पण, वाढत्या महागाईचे मुख्य कारण आहे संसाधनांचा अभाव. जी वस्तू मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे आणि जिची मागणी जास्त आहे, ती महाग होणारच. global warming मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीला जबाबदार आपणच आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. पृथ्वीचे अनावश्यक दोहन झाल्याने आज जगातील अनेक देशांवर अन्न संकट निर्माण झाले आहे.
 
global warming अनेक देशांमध्ये अन्न, पाणी आणि ऊर्जेचे संकट आजच निर्माण झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जी अन्नटंचाई निर्माण झाली आहे, ती आपण पाहतोच आहोत. भारताकडे संपूर्ण जग आशेने पाहात आहे. गांभीर्य लक्षात घेत भारत सरकारने गव्हाची निर्यात थांबवलीच आहे, साखरेचीही निर्यात थांबविली जाईल, अशी शक्यता आहे. जगभरात निर्माण झालेल्या अन्नटंचाईच्या परिस्थितीत qहसाचाराला चालना मिळणार आहे. जी गोष्ट कमी प्रमाणात उपलब्ध आहे, ती प्राप्त करण्यासाठी ‘बळी तो कान पिळीङ्क हा नियम काम करणार आहे. एका विचारवंताने म्हटलेच आहे- जर आम्ही विनाश घडवून आणणारी कामे केली तर त्या बदल्यात आमच्या नशिबीही विनाशच येणार आहे. अनेक भागांत जंगल, जमीन, पाणी यावर ताबा मिळवण्यासाठी लोकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
 
पाण्यासाठी संघर्ष होणार म्हणणा-यांना वेड्यात काढणारे आपण आता पाण्यासाठी प्रत्यक्ष संघर्षाकडे वाटचाल करतो आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. global warming जंगलांच्या कत्तलीमुळे आदिवासी लोकांमध्ये असंतोष आहे. याचाच फायदा कट्टरवादी आणि नक्षलवादी घेत आहेत. वनांवर खरे तर आदिवासींचा हक्क आहे. परंतु, तो हक्क स्वार्थी लोकांनी, राजकारण्यांनी हिरावून घेतला. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. ऊर्जा मिळविण्यासाठी, फर्निचर तयार करण्यासाठी, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यासाठी जंगलांची अनियंत्रित कत्तल केली जात आहे. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी ३३ टक्के भाग हा जंगलांनी व्याप्त असला पाहिजे, तरच पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. global warming परंतु, दुर्दैवाने ही टक्केवारी निराशाजनक आहे. महाराष्ट्रात जंगलांचे प्रमाण २३ टक्के आहे. पण, ही टक्केवारी विदर्भातील जंगलांच्या भरोशावर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अन्य भागांत तर जंगलेच नाहीत. global warming कोकणाचा काही भाग, मराठवाड्याचा काही भाग सोडला तर जंगलं आहेतच कुठे? असा असमतोल राहिला तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे वेगळे सांगायला नको.
 
जी जंगलं आहेत त्यात आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत, global warming वन्यपशूंच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, जंगलांची उत्पादकता घटत चालली आहे. कार्बनडाय ऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढत चालल्याने प्रदूषण भयानक वाढत आहे. global warming जगातील प्रत्येक गोष्ट एकमेकांस पूरक अशी आहे. जल, वायू, अग्नि, पृथ्वी, आकाश आणि मनुष्य यांचा घनिष्ठ संबंध आहे. यापैकी एकाचेही संतुलन बिघडले की परिस्थिती गंभीर होते, हे लक्षात घेऊन आपली वर्तणूक असली पाहिजे. global warming परंतु, आम्ही दिवसेंदिवस अधिकाधिक भौतिकवादी बनत चाललो आहोत आणि त्याचेच परिणाम आज असह्य अशा उन्हाच्या चटक्यांच्या रूपात आम्ही भोगत आहोत. वने उजाड करून आम्ही जमिनीच्या पोटातून गॅस काढत आहोत, कोळसा काढत आहोत, तेल काढत आहोत. किती दिवस चालणार हे सगळे? कधी ना कधी तर साठे संपणारच. मग, विचारपूर्वक जेवढे पाहिजे तेवढेच का नाही काढले जात? global warming आज अनेक जण असा विचार करतात की तापमान वाढले तर कूलरमध्ये राहू, एसीमध्ये राहू.
 
अहो, झाडे नसतील तर पाऊस पडणार नाही, पाऊस नसेल तर पाण्याअभावी वीज तयार होणार नाही आणि वीज नसेल तर कूलर आणि एसी चालविणार कशावर? global warming डोकं ठिकाणावर ठेवून आम्ही विचार कधी करणार? पर्यावरण संरक्षणाच्या अभावी आज वादळांचे, पुरांचे प्रमाण वाढले आहे. आसाममध्ये मे महिन्यातच काय परिस्थिती निर्माण झाली, लाखो लोक कसे विस्थापित झालेत, आपण पाहिलेच आहे. मोठ्या प्रमाणावर वित्त आणि काही प्रमाणात प्राणहानी झाली आहे. global warming त्सुनामीचा धोका वारंवार उत्पन्न होतो आहे, भूकंपाचे धक्केही सतत बसू लागले आहेत. हे सगळे कशामुळे होत आहे? जंगलांची कटाई, धरतीचे अनावश्यक दोहन याला कारणीभूत आहे. प्राकृतिक संकटांची मालिका अखंड सुरू आहे. रोगराई वाढली आहे. कधी न ऐकलेले आजार लोकांना होत आहेत. प्रदूषित पाणीही त्याला कारणीभूत आहे. शुद्ध हवेच्या अभावीही अनेक रोग तुम्हाआम्हाला होत आहेत. श्वसनाचे रोग वाढले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे अन्नधान्य उत्पादनावरही परिणाम झाला आहे.
 
परिस्थिती बदलली नाही तर लवकरच जगातील अर्धी लोकसंख्या अन्नधान्यासाठी संघर्ष करेल. global warming एकेका दाण्यासाठी लोक दुसèयाचा जीव घ्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. अन्नधान्याचे रेकॉर्ड उत्पादन व्हावे म्हणून आम्ही रासायनिक खतांचा वापर वाढविला आणि जमीन नापीक करण्यासोबतच अनेक रोगांनाही आमंत्रण दिले आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारालाही आम्हीच जवळ केले आहे. जैविक शेती केली आणि कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी केला तर संकटांचा सामना करण्याचे बळ आपल्याला प्राप्त होऊ शकते. अजूनही वेळ गेलेली नाही. global warming पर्यावरण प्रदूषण होणार नाही यादृष्टीने सर्वप्रथम प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावावे, ते जगवावे. हिमालयातील ग्लेशियर्स वितळून निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी हे साहाय्यभूत ठरू शकते. आज आपल्या देशातील पवित्र अशा गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांची झालेली स्थिती आपण पाहतोच आहोत. याला कारणीभूतही आम्हीच आहोत. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी आपण सुधारलो तर ठीक. अन्यथा, निसर्ग आपले रूप दाखवेलच. global warming