तू कमी तिथे मी!

gender equalityएकमेकांसाठी सतत करणे यामुळे संसार उत्तम

    दिनांक :08-Jun-2022
|
संवाद 
- रविबला काकतकर 
 
स्पर्धा परीक्षेतील एका उमेदवाराला प्रश्न विचारला गेला...‘‘गेली तीन वर्षे तू युपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत आहेस. तुझी पत्नी तहसीलदार आहे आणि घर चालवते. gender equalityतर, तू तिच्या पैशांवर जगतो आहेस, असे तुला वाटत नाही का?'' मुलाखतीत असे प्रश्न अपेक्षित असतात; ज्यावरून उमेदवाराचे मानसिक संतुलन, निर्णय क्षमता, स्त्री-पुरुष समानतेबाबत gender equalityविचार इत्यादी अनेक बाबींचे मूल्यमापन केले जाते. प्रशासकीय अधिकारी म्हणून पदावर रुजू झाल्यावर त्याची मानसिकता कशी असेल, याची चुणूक त्यावरून येते. या प्रश्नावर या तरुण मुलाने दिलेले उत्तर खूप कौतुकास्पद होते. तो म्हणाला, ‘‘नाही सर, आम्हा दोघांनाही तसे वाटत नाही. gender equality कारण आमच्यामध्ये ते सामंजस्य आहे की, मी परीक्षा पास होईपर्यंत ती घर सांभाळणार आहे.''
 

equality  
 
स्त्री-पुरुष समानता gender equality आणि त्याही पुढे जाऊन स्त्री-पुरुष पूरकता याचे हे उत्तम उदाहरण होते. स्त्रियांचे उच्चशिक्षित होणे, घराबाहेर पडून नोकरी करणे, पतीपेक्षाही नोकरीत वा व्यवसायात अधिक अर्थार्जन करणे या बाबी गेल्या ३०-४० वर्षांत आता समाज स्वीकारत आहे. gender equality हे सर्व सामंजस्याने घेतले तर उत्तम आणि आदर्शच आहे. फक्त त्यात सध्या पाश्चात्त्य देशांमध्ये प्रकर्षाने दिसणारी अतिवैयक्तिकता म्हणजे Individualistic Approach ज्यात प्रत्येकाच्या ‘वैयक्तिक स्पेस'चा अतिरेक होत असेल तर तो मात्र टाळायला हवा. घर चालविण्यासाठी पै आणि पैची विभागणी करून वादविवाद वाढत आहेत. घटस्फोटांची संख्या वाढत आहे. त्याकडे काही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येईल का?
 
 
 
gender equality साने गुरुजींच्या ‘श्यामची आई' Shyamchi Aai पुस्तकात एक अतिशय उत्तम संस्कार करणारा आणि मन हेलावणारा संवाद आढळतो. १०-१२ वर्षांचा श्याम दापोलीला घरापासून दूर वसतिगृहात राहून शिक्षण घेत असतो. तो एका सुट्टीला घरी येतो. कोकणात अतिशय खडतर आयुष्य जगणा-या श्यामच्या घरी त्याची आई घरातील सर्व कष्टाची कामे करताना दमून जायची. श्याम आला की तो आईला मदत करी. एका संध्याकाळी श्यामला आई विचारते, ‘‘श्याम, दिवसभर काम करून दमला नसलास तर मला जात्यावर दळायला मदत करतोस का?'' श्याम लगेच आईला म्हणतो, ‘‘आई, तुला मदत करताना मी कधीच दमत नाही.'' ते धान्य दळत असताना आई ओव्या म्हणायची; त्यात श्यामचे नाव गुंफायची. ते ऐकून श्याम अगदी भरून पावायचा. एवढ्यात शेजारच्या जानकीकाकू येतात. त्यांना श्याम जात्यावर दळत असलेला, आईबरोबर ओव्या म्हणत असलेला दिसतो. त्या म्हणतात, ‘‘श्यामची आई, तुम्ही श्यामला अगदी बायको करून टाकले आहेत हो.'' श्याम आईला म्हणतो, ‘‘आई, तुला घरकामाला मदत करणे म्हणजे बायको होणे आहे का गं?'' आई म्हणते, ‘‘अजिबातच नाही. तुला अर्धनारीनटेश्वराची गोष्ट माहीत आहे ना? gender equality देवानेच सांगून ठेवले आहे की, पुरुषात जेव्हा मार्दव, कोमलता, क्षमाशील वृत्ती येईल तेव्हा आणि स्त्रीमध्ये जेव्हा प्रसंगी कठोर होण्याची क्षमता, धीटपणा येईल तेव्हाच दोघेही पूर्ण होतील. न पेक्षा दोघेही अपूर्णच होत.'' gender equality
 
विवाहानंतर हेच अपेक्षित आहे. gender equality दोघांनीही एकमेकांना मदत करूनच संसार चालवायचा असतो. ‘श्यामची आई' हे पुस्तक सर्व धर्म-पंथ आणि समाजासाठी, परिपूर्ण माणूस म्हणून कसे जगावे याचा आदर्श परिपाठ मानला जातो. स्त्री-पुरुष पूरकतेची, साने गुरुजींनी ८० वर्षांपूर्वी सांगितलेली ही उत्तम व्याख्या होय. gender equality केवळ पती-पत्नी यांच्यापुरताच हा विचार मर्यादित नसावा. घरच्या इतर नातेसंबंधांसाठीही पूरकता हा अतिशय उपयुक्त मंत्र होय. जागतिकीकरणाच्या अतिरेकामुळे पैशाला आलेले महत्त्व, मूल्यांची घसरण हे परिणाम दिसतात. परंतु त्यावरही मात करून, लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीचा आदर, सर्वांगीण विकसनासाठी सहयोग आणि नि:स्वार्थ मनाने केलेले प्रेम याचमुळे प्रत्येक जण आनंदाने जगू शकेल हे नक्की. मानवी जीवनाला शाश्वत रीत्या सुंदर बनविणारी मूल्येच आपणास आंतरिक समाधान आणि अधिष्ठान देतील. पैशाअभावी मुलीचे शिक्षण बंद करणे, परंतु मुलाचे चालू ठेवणे, स्वयंपाक-घरकाम फक्त मुलीलाच सांगणे, मुलगा काम करू लागला तर त्याला, ‘तू काय मुलगी आहेस का?' gender equality असे म्हणून कामाला बंदी करणे, लहानपणापासून खेळांमध्ये भेदभाव करणे (बाहुली मुलीला देणे अन् बॅट-बॉल मुलाला देणे, रात्री उशिरा येण्यासाठी मुलाला परवानगी, परंतु मुलीला मात्र नियम!) इत्यादींमुळे कळत-नकळत मुलींना कमी लेखले जात आहे.
 
भेदभाव लहानपणापासूनच होत आहे, याचे भान पालकांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. gender equality याचेच पडसाद मग पुढे जाऊन प्रमोशनच्या वेळी उत्तम काम करूनही आपल्या डोक्यावर स्त्री बॉस नको म्हणून कार्यक्षम स्त्रियांना पुढे येण्याची संधी नाकारणे, समान काम करूनही, वेतनात फरक यामुळे स्त्रियांची घुसमट न झाली तर नवल! स्त्री-पुरुष असमानतेमुळे जेव्हा जेव्हा ज्या व्यक्तीला पुढे येण्यास नाकारले जाते, जाणूनबुजून दुय्यम स्थान दिले जाते, त्या प्रत्येक वेळी अशा व्यक्तीचा gender equality आत्मसन्मान खालावतो. अशी स्त्री अथवा पुरुष पुढच्या पिढीला सक्षम, धीट आणि समर्थ कशी बनविणार? संपूर्ण समाजानेच स्त्री-पुरुष केवळ समानताच नव्हे, तर पूरकता खुल्या दिलाने मान्य करून प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला केवळ एक व्यक्ती म्हणून आदराने वागविणे अत्यंत गरजेचे आहे. प्रमोशनच्या वेळी, लिंगभेदापलीकडे जाऊन कामाचा दर्जा हा एकमेव मापदंड ठेवणे कोणत्याही कंपनीच्या वा व्यवसायाच्या वृद्धीसाठी उपयुक्त ठरेल. gender equality
 
एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत होते, हे प्रसिद्ध विचारवंत आगरकर यांचे विचार आजही उपयुक्त आहेत. gender equality स्त्रियांच्या उपजत गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांचा उपयोग संपूर्ण कुटुंबासाठी व्हावा यासाठी घरकाम ही केवळ घराच्या गृहिणीचीच जबाबदारी नाही तर सर्वच कामे वाटून घेतली गेली तर स्त्रीची कार्यक्षमता तिला पुरेपूर वापरता येईल. नोकरी करणाèया स्त्रीला घरी आल्यावर नव-याने छान चहा करून दिला, घरच्या वयस्करांनी, मुलांनी हातभार लावला तर तिचा शीण कुठल्या कुठे पळून जाईल. gender equality तिच्या बुद्धिमत्तेचा आणि कष्टांचा तो आदर आणि घेतलेली उत्तम दखल ठरेल. घरच्या निर्णयात तिचेही मत विचारात घेणे उचित आहे, हे जसे खरे तितकेच उच्चशिक्षित मुलींनी वा स्त्रियांनीही घरच्या पुरुषांना मान द्यायला हवा. आज उच्चविद्याविभूषित मुलींचे विवाह होण्यात अडचणी येत आहेत. gender equality नव्याने सासरी आलेल्या मुलीला सामंजस्याने सामावून घेणे ही जशी सर्व कुटुंबाची जबाबदारी होय, त्याचप्रमाणे मुलीनेही सासरी गेल्यावर सर्वांची मने जिंकणे हे कौशल्य आवश्यक मानायला हवे. ऐहिक गोष्टींचा हव्यास संसारसुखात बाधा आणणारी बाब आहे.
 
gender equality आज बहुतांश कायदे स्त्रीच्या बाजूने आहेत. त्याचमुळे कायद्याचा गैरवापर न करणे प्रत्येक स्त्रीने आपले कर्तव्य मानायला हवे. घरी आल्यावर कोणीतरी काळजी घेणारा वा काळजी करणारा आधार असा नवरा आहे. मग भले तो कमी gender equality शिकलेला किंवा कमी अर्थार्जन करणारा असला तरी! एकूणातच पती आणि पत्नी दोघांनीही दातृत्व भावनेने एकमेकांसाठी सतत करीत राहणे याचमुळे संसार उत्तम चालेल. आज संगणक ऑफिसेस, विविध बँक्स, परराष्ट्र कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, कॉल सेंटर्समधून रात्री-अपरात्री वा १२ ते १४ तास काम करावे लागणे, ही बाब प्रमाण झाली आहे. gender equality त्याचमुळे घरी आपल्या सहचराबरोबर घालविल्या जाणा-या वेळापेक्षाही अधिक वेळ बाहेर घालवावा लागतो हे सत्य आहे. त्याचमुळे भिन्नलिंगी कर्मचा-यांची एकमेकांशी असलेली मैत्री, व्यवहार हे पती अथवा पत्नी दोघांनीही कधी नव्हे ते अधिक परिपक्वतेने हाताळणे आवश्यक ठरत आहे. संशयास जागा राहील अशा प्रकारे फोन करणे, मेसेजेसची देवाणघेवाण, घरी न सांगता हॉटेलिंग करणे, हे टाळणे आणि पारदर्शीपणे केल्यास संसार टिकवून ठेवणे सोपे जाईल.
 
मानसशास्त्रज्ञांनी एक बाब आवर्जून नोंदविली आहे. gender equality पती-पत्नी संबंधांमध्ये आदर, प्रेम, आत्मीयता या भावना घरातच जेव्हा सच्चेपणाने व्यक्त केल्या जातात, तेव्हाच हे नाते अधिक दृढ होत जाते आणि त्यामुळे बाह्य जगाकडून वाहवा मिळविण्याची हाव राहत नाही. दोन भिन्न व्यक्तींची मते प्रत्येक बाबतीत पूर्णत: जुळणे हे फार क्वचित घडू शकते. gender equality घरातील नातेसंबंधात एकमेकांचे दोष, त्रुटी काढण्यापेक्षा पूरकता कशी येईल, हा दृष्टिकोन प्रत्येकाने जबाबदारीचा मानायला हवा. gender equality एकमेकांचे संदेश त्यांच्या अनुपस्थितीत घेणे, एकावेळी केवळ स्वत:साठीच कामे न करता घरातील इतरांसाठीदेखील करणे, बाहेरच जात असलो, तर मदतीचा हात पुढे करणे, हे घरातील इतर नात्यांसाठीचे अलिखित शिष्टाचार आणि कर्तव्ये होत. gender equality ज्या समाजात राहतो तिथे एकमेकांचे व्यवहार आणि सहवास सुखाचा व्हावा यासाठी ‘तू कमी तिथे मी' हा मंत्र सातत्याने आचरणात आणावा.
९८८१७४३०६१