200 कोटी लसीकरणाचा अन्वयार्थ

    दिनांक :24-Jul-2022
|
- उमेश उपाध्याय
2019 साली कोरोनाची चाहूल लागली तेव्हा अजिबात वाटले नव्हते की, ही महामारी आपल्या देशात येऊन गोंधळ घालेल. सुरुवातीला या रोगाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे काहीच तयारी नव्हती. परंतु, जसजसे या रोगाने थैमान घालणे सुरू केले, तसतसे आपल्या देशात vaccination आत्मनिर्भर भारताची वेगाने वाटचाल सुरू झालेली दिसून आली. सुरुवातीला रुग्णांसाठी रुग्णसेवा नव्हत्या, पीपीई कीट नव्हती, इतरही साधनसामग्री नव्हती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने न डगमगता आत्मनिर्भर भारताचा निर्धार करून झटपट या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे, तर विदेशातील मित्र देशांनाही त्या सोयीसुविधा पुरविल्या. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे लसीकरण. या vaccination लसीकरणात नुकताच भारताने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. तो ऐतिहासिक, लक्षणीय आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळेच इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्युसंख्येवर आळा बसविता आला.
 
 
Effects of vaccination
 
लहानपणी वडील म्हणायचे ती गोष्ट आता लक्षात येते. त्यांनी म्हटले होते की, आवश्यक गोष्टींचा आपण विचार करीत असताना हमखास महत्त्वपूर्ण गोष्टी विसरून जातो. त्यामुळे आम्ही वारंवार हाच विचार केला पाहिजे की, आपल्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या आहेत. या बाबीच्या पृष्ठभूमीवर आपण पाहिजे तर अलीकडच्या काळात अशा अनेक विषयांना उगाच महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येते. आपण त्याच्यातच गुरफटलो जातो आणि इतर अति महत्त्वाच्या विषयांकडे मग आपले दुर्लक्ष होते. विद्यमान परिस्थितीत राष्ट्रपती-उपराष्ट्रपतिपदांची निवडणूक, महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रम, मान्सून-पाऊस, देशातील अनेक राज्यांमधील पूरस्थिती, संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध याच बातम्यांचा सर्वत्र जोर दिसत आहे आणि सर्वसामान्य जनताही त्यातच गुरफटलेली दिसून येत आहे. या सर्व बातम्यांच्या पृष्ठभूमीवर आपल्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बातमी पार दबून गेली आहे. ती म्हणजे 17 जुलै 2022 साली आपल्या देशाने कोरोना vaccination लसीकरणाचा 200 कोटींचा आकडा पार केला आहे. ‘हे तर काय होणारच होते...’ असे म्हणून सार्‍यांनी या घटनेकडे अक्षरश: सामान्य घटना म्हणून लक्ष दिले आणि दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. मात्र, ही घटना देशाच्या दृष्टीने विचार करता अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यावर चर्चा होणे अपेक्षितच नव्हे, तर आवश्यकही होते.
 
 
तुम्हाला स्मरण असेल तर आठवा, कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट! जेव्हा लाखो लोक भीतीपोटी अनवाणी पायी चालत आपल्या गावांकडे निघाले होते. vaccination जेव्हा इस्पितळात खाटांची कमतरता जाणवत होती. खाट मिळाली तर ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत होती. देशातील कदाचित असा एकही परिवार नसेल की ज्याला कोरोना महामारीची झळ बसलेली नाही. त्यावेळी फोनची घंटी वाजली रे वाजली की, मनात शंकेची पाल चुकचुकत होती. नको नको ते विचार मनात येत होते. ही काही फार जुनी घटना नाही तर अलीकडच्या काळात अवघ्या 18 ते 20 महिन्यांमधली आहे.
 
 
सध्या सर्वत्र गाजत असलेल्या विद्यमान बातम्यांच्या हंगामात आपण हे विसरूनच गेलो की, याही बातमीतील काही तथ्यांकडे लक्ष देण्याची आज गरज आहे. कोरोना महामारी अजून पूर्णपणे गेलेली नाही. गेल्या एक आठवड्यात जगभरात कोरोनाचे 64 लाखांपेक्षा जास्त बाधित आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये 9 लाख 14 हजार, अमेरिकेत 8 लाख 17 हजार, जर्मनी 6 लाख 30 हजार, इटली 6 लाख 71 हजार, जपान 2 लाख 69 हजार आणि ऑस्ट्रेलियात 2 लाख 63 हजारांपेक्षा जास्त बाधित अवघ्या एका आठवड्यात आढळून आले. त्या तुलनेत भारताचा विचार केला तर आपल्या देशात याच काळात म्हणजे एका आठवड्यात 1 लाख 20 कोरोना बाधित आढळले. भारताच्या तुलनेत वरील सर्वच देश अधिक विकसित म्हणून ओळखले जातात. एवढेच नव्हे, तर त्यांची लोकसंख्याही आपल्या देशाच्या तुलनेत फारच कमी आहे.
 
 
तिकडे चीनमध्येही गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून कोरोनाने हाहाकार माजविला आहे. शांघाय आणि बीजिंगसारख्या शहरांमध्ये वारंवार टाळेबंदी लावावी लागत आहे. या सार्‍या प्रकाराने दु:खी, निराश झालेले लोक रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. चीनमधून कोरोनाच्या बाबतीत अचूक आकडे आणि बातम्या येणे शक्यच नाही. मात्र, ज्या काही बातम्या येत आहेत, जी काही आकडेवारी प्राप्त होत आहे त्यानुसार ‘झीरो कोविड’ धोरणावर चालणार्‍या चीनला या रोगावर नियंत्रण मिळणे अजून शक्य झालेले नाही. या पातळीवर हा देश सपशेल अयशस्वी ठरला आहे. तेथील नागरिकांची परिस्थिती ठीक नाहीये.
 
 
एकूणच विविध देशांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला तर आणखी एक आकडा आपल्या देशातील कोरोनाविरुद्धच्या अभूतपूर्व लढाईला रेखांकित करतो. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण जगातील एकूण सरासरीच्या एकतृतीयांशच्या जवळपास आहे. जगाचा विचार केला तर 10 लाख लोकांपैकी 819 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. भारताच्या दृष्टीने याच आकडेवारीचा विचार केला तर 10 लाखांमध्ये आपल्या येथे मृत्यूचा आकडा 373 आहे. ही आकडेवारी इतर देशांची बघितली असता फ्रान्समध्ये 10 लाख लोकांमध्ये 2296, जर्मनी 1690, ब्रिटन 2646, रशिया 2615, इटली 2819 आणि स्पेनमध्ये 2373 मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. हे सर्व श्रीमंत आणि अतिप्रगत देश म्हणून ओळखले जातात; एवढेच नव्हे तर त्यांची आरोग्य व्यवस्था नेहमीच चांगली असल्याचे सांगण्यात येत असते. भरीस भर म्हणून की काय, अमेरिकेसारख्या देशातही कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 10 लाख 48 हजारांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेची एकूण लोकसंख्या 33 कोटींच्या जवळपास आहे. या तुलनेत भारताचा विचार केला तर आपल्या देशाची एकूण लोकसंख्या 140 कोटींपेक्षा जास्त आहे आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 5 लाख 25 हजार नोंदली गेली आहे. तसे पाहता प्रत्येक मृत्यू हा दु:खद आणि वेदनादायी असतो. मात्र, आपण इतर देशांची आपल्या देशाशी तुलना केली तर कोरोनाच्या संघर्ष काळात vaccination आपण उत्कृष्ट काम केलेले आहे.
 
 
या परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर 200 कोटी vaccination लसीकरणाचा आकडा पार करणे म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक मैलाचा दगड गाठणे आहे. त्यामुळेच देशातील या संदर्भात असलेल्या संबंधितांचे कौतुक करणे, त्यांची पाठ थोपटणे गरजेचे आहे. देशातील वैज्ञानिक, लस विकसित करणारे, लस तयार करणार्‍या खाजगी कंपन्या, डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य सेतू व इतर अ‍ॅप तयार करणारे आणि त्याचे संचालन करणारे आयटी कर्मचारी तसेच विविध राज्यांमधील सरकारे आणि केंद्र सरकार अभिनंदनास पात्र आहेत. याशिवाय, अनेक वाद आणि टीकाटिप्पणी, शंकेच्या पृष्ठभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जो कणखरपणा दाखविला, आपण दृढनिश्चय पूर्णत्वास नेला ते सरकारही निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. एकूणच काय की, हे यश मिळाले आहे भारताच्या जागरूक समाजामुळे! या समाजाने कोणत्याही बाबीचा विचार न करता 18 महिन्यांच्या काळात तत्परता दाखवून आपल्या देशात निर्मित झालेल्या लसींद्वारे vaccination लसीकरण करून घेतले. आपण ज्या प्रगत, श्रीमंत आणि अतिउच्चशिक्षित देशांचा वर उल्लेख केला आहे ते अजूनही ‘व्हॅक्सिनच जिटेन्सी’ म्हणजेच लसीकरण करायचे की नाही, या शंकेतच अडकल्यामुळे आज त्यांच्यासमोर गंभीर समस्या आ वासून उभी आहे. त्याचा त्यांना फटकाही सहन करावा लागत आहे.
ही एकूणच परिस्थिती पाहता आणि लसीकरणाचा अन्वयार्थ शोधताना निश्चितच असे म्हणावे लागेल... शाब्बास भारत...!