रविवार, 24 जुलै ते शनिवार, 30 जुलै 2022

    दिनांक :24-Jul-2022
|
साप्ताहिक राशिभविष्य 
रविवार, 24 जुलै ते शनिवार, 30 जुलै 2022

saptahik  
 
मेष : तरुणांसाठी उत्तम काळ
weekely-horoscope : या आठवड्यासह सध्याचा काळ या राशीच्या तरुणांना विवाहयोग जुळून येण्यासाठी उपयोगी ठरावा. नवविवाहितांना संततीचे योग यावेत. युवांना नोकरी-व्यवसायासंदर्भात भाग्योदयकारक ठरावा. आपल्या कार्यक्षेत्रात मोठे नाव व्हावे, असे योग संभवतात. कुटुंबात आनंद, उत्साह व समाधानाचे वातावरण राहील. काहींना मात्र आरोग्यविषयक आकस्मिक चिंता उद्भवू शकते. त्यांनी आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यायला पाहिजे. नेहमीचा औषधोपचार, पथ्ये यात खंड पडू नये.
शुभ दिनांक - 24, 26, 28, 30.
 
 
वृषभ : आर्थिक उलाढाली वाढतील
या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेल्या ग्रहयोगामुळे आपला अर्थत्रिकोण बळकट होत आहे. त्यामुळे व्यवसायातील आर्थिक उलाढाली वाढतील. नव्या योजना राबविता येतील. सामाजिक कार्यातूनदेखील लाभ मिळू शकणार असल्याने समाजकार्य, राजकारण या क्षेत्रात कार्यरत लोकांनी लाभ पदरी पाडून घेतला पाहिजे. दुसरीकडे व्हिसाची कामे, विदेशात जाण्याच्या योजना, कोर्टातील प्रलंबित प्रकरणे मात्र काहीशी रेंगाळतील. प्रवास, तीर्थाटन यासाठी सुखावह काळ आहे.
शुभ दिनांक - 24, 25, 26, 29.
 
 
मिथुन : कौटुंबिक आनंदाचे पर्व
weekely-horoscope :  या आठवड्यात या राशीच्या मंडळींसाठी कौटुंबिक सुख-स्वास्थ्याचे एक नवे पर्व सुरू होणार आहे. कुटुंबात आपल्या नेतृत्वाखाली काही आनंदी व उत्साहवर्धक कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकते. धार्मिक कार्यक्रमात सहभाग वाढेल तसेच युवा वर्गास नोकरी-व्यवसायासाठी तसेच प्रेमसंबंध, विवाह याबाबत उत्तम योग लाभण्याची शक्यता आहे. मनासारखा जोडीदार लाभू शकेल. जवळच्या व्यक्तीच्या भाग्योदयाने मन आनंदित होईल. काही लाभकारी आर्थिक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक - 26, 27, 28, 30.
 
कर्क : कार्य-समाधानाचे वातावरण
या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्याला लाभलेले ग्रहमान शुभसूचक आहे. युवांच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या संबंधातील प्रयत्नांना यश मिळेल. नवा व्यवसाय सुरू करता येईल किंवा व्यवसायाची व्याप्ती वाढवता येईल. नोकरीतही समाधानकारक वातावरण निर्माण होऊ शकते. नोकरीत बदल करता येऊ शकेल. व्यवसाय वाढल्यानंतर आर्थिक आवक वाढेलच. काहींना नवीन खरेदी, प्रवास योग, आप्तेष्टांच्या गाठीभेटी यामुळे मोठ्या आनंदात आठवडा व्यतीत करता येईल.
शुभ दिनांक - 24, 28, 29, 30.
 
 
सिंह : वाहने सांभाळून चालवा
weekely-horoscope :  या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहांचे भ्रमण पाहता आपल्या मुलांचे शिक्षण, नोकरी- व्यवसाय, विवाहासंबंधी कार्ये यासंबंधाने महत्त्वाच्या हालचाली घडू शकतात. आठवड्याचा उत्तरार्ध मात्र काहींना काहीसा कटकटीचा जाण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबतीत अडकला असाल तर काळजी घ्या. वाहने सांभाळून चालवा. पडझड, किरकोळ अपघात यांची शक्यता आहे. काहींना जुन्या व्याधींचा त्रास बळावण्याची शक्यता आहे. त्याची काळजी घ्या. कुटुंब व मित्रवर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - 24, 25, 26, 30.
 
 
कन्या : संयमाचा गुण बाणावा
या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती सुदृढ करणारे ग्रहयोग आपणास लाभले आहे. मात्र असे असले, तरी आपल्याला संयमाचा गुण बाणावा लागणार आहे. कारण काहीशा संथ गतीने हे योग फलद्रूप होऊ शकतील. अशातच आपल्या स्वभावात काहीसा चिडखोरपणा, संतापीवृत्ती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वभावातील या बदलांचा परिणाम आपल्या निर्णय क्षमतेवर होऊ शकतो. काहींना किरकोळ दुखापत, आजारपण उद्भवण्याची शक्यता उत्तरार्धात येऊ शकते. जुने त्रास बळावतील.
शुभ दिनांक - 25, 27, 29, 30.
 
 
तुला : वरिष्ठांच्या सहवासातून लाभ
weekely-horoscope :  या आठवड्यातील ग्रहमान आपणास अपेक्षित ऊर्जा देणार असून त्याचा लाभ विशेषतः आठवड्याच्या उत्तरार्धात होताना पाहायला मिळू शकेल. त्यामुळे महत्त्वाच्या कामांना गती द्यायला हवी. ओळखीतून तसेच वरिष्ठांच्या सहवासातून लाभ होण्याची जास्त शक्यता आहे. अनुभवी तसेच वडीलधार्‍या मंडळीचा सल्ला योजना कार्यान्वित करताना अवश्य घ्या. काही आर्थिक लाभ संभवतात. विवाहेच्छू युवावर्गाला चांगले योग यावेत. नवविवाहितांकडून संततीबाबत शुभ वार्ता मिळू शकतात.
शुभ दिनांक - 26, 27, 29, 30.
 
 
वृश्चिक : आरोग्याकडे दुर्लक्ष नको
या आठवड्याची सुरुवातच मुळी आपणास जरा अधिक खर्च करावयास लावणारी आहे. प्राप्त ग्रहयोग पाहता खानपानात अनियमितता व पैशाची जरा उधळपट्टीदेखील करावयास लावू शकतो. अशात आरोग्याकडे मात्र मुळीही दुर्लक्ष करू नये. कामे व आरोग्याची काळजी यासंबंधात वेळापत्रक सांभाळून दिनक्रम ठरवणे फायद्याचे राहील. खाण्यापिण्याच्या वेळा, औषधे-पथ्ये सांभाळली पाहिजेत. वाहने सांभाळून चालवावीत. वेगावर नियंत्रण हवे. आगीची उपकरणे काळजीपूर्वक हाताळावीत.
शुभ दिनांक - 24, 25, 29, 30.
 
धनु : सन्माननीय व्यक्तींचा सहवास
weekely-horoscope :  या आठवड्यात लाभलेले ग्रहमान आपणास शुभ फले देणारे आहे. मात्र, आपण अनुभवीत असलेला दगदगीचा काळ संपलेला नाही. कामांना वेळीच न मिळणार्‍या वेगामुळे ही दगदग करावी लागत आहे. यातून लवकरच मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. सन्माननीय व्यक्तींचा सहवास घडेल. वयस्क मंडळींना प्रकृतीची काळजी घ्यावी लागू शकते. खानपानाचे पथ्य, औषधोपचाराचे वेळापत्रक सांभाळा. परिवारात धार्मिक कार्ये होऊ शकतात. त्यातील सक्रिय सहभागाद्वारे मानसिक शांती मिळवता येईल.
शुभ दिनांक - 25, 26, 27, 30.
 
  
मकर : आर्थिक आघाडीवर समाधान
या आठवड्यात आपणास गोचर ग्रहांचे अतिशय शुभ प्रभाव पाहावयास मिळणार आहेत. आर्थिक आघाडीवर समाधानाचे वातावरण राहू शकेल. तरुण वर्गाला नोकरी-व्यवसायात उत्तम संधी, पगारवाढ, पदोन्नतीचे- थोडक्यात भाग्योदयाचे योग आहेत. नवीन गुंतवणूक करता येईल. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना चांगली संधी लाभू शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र अचानक काही मोठ्या खर्चाचे संकेतदेखील मिळत आहेत. आर्थिक व्यवहार करताना पुरेशी सावधगिरी बाळगली पाहिजे.
शुभ दिनांक - 25, 26, 27, 28.
 
 
कुंभ : खरेदीच्या योजनांना गती
weekely-horoscope :  या आठवड्याच्या प्रारंभीचे ग्रहमान पाहता दीर्घकाळापासून लांबणीवर असलेले स्थावर मालमत्तेसंबंधीचे व्यवहार आता पूर्णत्वास जाऊ शकतील. भूमी, घर, मोठे वाहन यांच्या खरेदीच्या योजनांना गती मिळू शकेल. नवे वाहन, नव्या जागी बदली, स्थानांतरण असेही योग लाभू शकतात. काहींना व्यावसायिक कारणासाठी जागेची खरेदी करता येऊ शकेल. कर्जाच्या मागणीला पूर्तता लाभेल. आर्थिक आघाडीवर लमाधान राहील. कुटुंबात युवांच्या विवाहासह काही महत्त्वाच्या घटनांना वेग लाभू शकेल.
शुभ दिनांक - 26, 27, 28, 30.
 
 
मीन : आर्थिक संरक्षण लाभेल
weekely-horoscope :  या आठवड्यात आपल्या वाट्याला आलेले ग्रहमान आपणास उत्तम आर्थिक संरक्षण देऊ शकेल. आपल्या महत्त्वाच्या योजनांना वेग देता येऊ शकेल. मात्र, दुसरीकडे काहींच्या मनाचा त्रागा वाढेल. अकारण भांडणे, वाद, आर्थिक देवाण-घेवाणीत फसगत, नोकरी-व्यवसायात स्पर्धा, वरिष्ठांची अवकृपा असल्या घटना अनुभवास येण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात मात्र दिलासा मिळेल. त्यामुळे आत्मविश्वासाने कार्यास सुरुवात करावी. प्रगतिपथावर वाटचाल सुरू होईल. थोरा-मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल.
शुभ दिनांक - 24, 26, 28, 30.
 
मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746