रविवार, 3 जुलै ते शनिवार, 9 जुलै 2022

    दिनांक :03-Jul-2022
|
साप्ताहिक राशिभविष्य 
 

sapta  
 
 
मेष : प्रश्न सामंजस्याने सोडवा
weekely-horoscope : हा आठवडा आपणास साधारण स्वरूपाचा राहील असे दिसते. मनात योजलेली कामे काहीशा विलंबानेच पूर्णत्वाकडे जाऊ शकतील. त्यातही आपणास बरेच प्रयत्न करावे लागू शकतात. त्यामुळे महत्त्वाच्या कामांची सुरुवात तूर्त लांबणीवर टाकण्यास हरकत नाही. आर्थिक स्थिती सामान्य राहील. कुटुंबातील भांडणे विकोपाला जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. वडिलोपार्जित मालमत्तेवरून काही मतभेद राहू शकतात. सामंजस्यानेच प्रश्न सुटतात, हे लक्षात घ्या. आरोग्य जपा.
शुभ दिनांक - 4, 5, 8, 9.
 
 
वृषभ : व्यावसायिक हालचालींना वेग
या राशीचे जे लोक सरकारी नोकरीत असतील त्यांना या आठवड्याचा पूर्वार्ध निश्चितच सुखावह व नवीन संधी देणारा राहील. उत्तरार्धात मात्र सावध राहावे लागेल. जमीनजुमल्याची कामे, स्थावर मिळकतीची प्रकरणे जी दीर्घकाळापासून प्रलंबित होती, त्यांना आता गती मिळू शकेल. आपसातील वादविवाद संपुष्टात येऊ शकतील. व्यावसायिक हालचाली, करार-मदार प्रगतिपथावर राहतील. आर्थिक उलाढाली वाढतील. व्यवसाय विस्ताराच्या योजना राबविता येतील.
शुभ दिनांक - 3, 4, 5, 8.
 
 
मिथुन : मन प्रफुल्लित राहील
weekely-horoscope : आर्थिकदृष्ट्या पाहता हा आठवडा आपणास लाभकारक जावा असे योग दिसत आहेत. निसर्ग नटलेला असतानाच आपले मनदेखील प्रफुल्लित झालेले असणार. कुटुंबात काही मंगलकार्ये, घर-वास्तू निर्माणाच्या योजना, खरेदीसंबंधीचे आडाखे बांधायला सुरुवात झालेली असेल. आपल्या योजनांना फळ मिळाल्यावाचून राहणार नाही. कुटुंबातून मार्गदर्शन व आर्थिक, मानसिक सहाय्यदेखील मिळेल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात प्रयत्नांची कमी पडू नये. प्रवासाचे योग यावेत.
शुभ दिनांक - 3, 5, 7, 9.
 
 
कर्क : परिश्रमाचे चीज होईल
हा आठवडा आपल्याला आर्थिकदृष्ट्या लाभकारक ठरावा, असेच ग्रहयोग वाट्याला आले आहेत. आपण आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल. कामाचे कौतुक, नवीन जवाबदारी, पदोन्नती, पगारवाढ, इन्सेंटिव्ह अशा स्वरूपात लाभ पदरी पडण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांची मर्जी आणि सहकार्‍यांची साथ लाभणार आहे. घरात काही शुभकार्ये ठरण्याची शक्यता असल्यामुळे आनंदात भरच पडेल. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. प्रलंबित प्रकरणे मार्गी लागू शकतात.
शुभ दिनांक - 3, 4, 7, 8.
 
 
सिंह : कामांची गती मंदावेल
weekely-horoscope : हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा ठरावा, असे दिसते. या आठवड्यात आपला खर्च काहीसा वाढलेला राहू शकतो; त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करावा. आजूबाजूच्या घटना वेगात घडत असतानाच आपल्या कामांना मात्र विलंब लागतोय, ती अतिशय सावकाशपणे होत आहेत असा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे योग्य नियोजन करून कामांच्या पूर्णत्वासाठी जोरकसपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रसंगी ओळख काढून, वशिला लावून कामे करावी लागू शकतात.
शुभ दिनांक - 4, 5, 6, 7.
 
 
कन्या : खंबीरपणे प्रयत्न करावेत
या आठवड्यात आपली महत्त्वाची कामे पूर्णत्वास न्यायची असतील तर खंबीरपणे प्रयत्न करावयास पाहिजेत. अवसान गाळून बसल्याने कामे व्हायची नाहीत. आपल्या वागण्यातील बेपर्वाई, बेफिकिरी बरोबर नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या बोलण्याने कोणीही दुखावणर नाही, याची काळजी मात्र अवश्य घ्या. नातेवाईकांच्या सहवासात, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये काही नाट्यमय प्रसंग घडू शकतात. त्यामुळे या संबंधातील कामे, व्यवहार करताना सावध असावयास हवे.
शुभ दिनांक - 3, 6, 8, 9.
 
 
तूळ :  उमेद टिकून राहणार
weekely-horoscope : या आठवड्यात आपल्या खर्च जरा वाढण्याची शक्यता आहे. कोणावरही विश्वास टाकताना पुरेपूर खातरजमा करून घेणे फायद्याचे ठरेल. तथापि, असे असले तरी आपणास कोणतेही मोठे नुकसान होण्याची भीती राहणार नाही. त्यामुळे आपली उमेद टिकून राहणार. काही विशेष घडविण्यासाठी आपणास नजीकचे लोक प्रेरित करतील व त्यातून यश, कौतुक, प्रसिद्धीदेखील मिळेल. सोबतच कामांची गर्दी, व्यग्रता यात बर्‍यापैकी दमछाक होण्याची शक्यता राहील.
शुभ दिनांक - 4, 5, 8, 9.
 
 
वृश्चिक : तोंडावर लगाम घाला
या आठवड्यात काही चांगले घडावे, मोठे यश पदरी पडावे असे वाटत असेल तर तोंडावर लगाम घालायला विसरू नये. काही नावीन्यपूर्ण घडामोडी अचंबित करतील. आपल्या निर्णयामुळे कुटुंबात संमिश्र प्रतिक्रिया उमटू शकतील. एखादी मोठी खरेदी, अचानक लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी लाभू शकतात. काहींना नोकरीच्या निमित्ताने परदेश गमनाची संधीदेखील यावी. किमान त्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना वेग मिळेल.
शुभ दिनांक - 2, 5, 6, 7.
 
 
धनु : योजना साकार होतील
weekely-horoscope : या आठवड्यात कार्यालयात, कार्यक्षेत्रात आपली बाजू वरचढ राहील. तथापि, आपल्या कामाची दिशा, झपाटा बदलू न देता आगेकूच करण्यातच आपले हित आहे, हे लक्षात ठेवा. अशी वाटचाल असली तर त्याचे दूरगामी लाभ मिळतील, हे निश्चित. जमीन, वाहन, घर अशा मोठ्या खरेदीच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहू शकाल. विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम जावा. योजनांना मूर्त रूप लाभू शकेल. कुटुंबात आनंदाचे व समाधानाचे वातावरण राहील. प्रवासाचे योग यावेत.
शुभ दिनांक - 3, 5, 7, 9.
 
 
मकर : जबाबदारीचा ताण वाढेल
या आठवड्यात आपल्या आळस व मवाळ धोरणामुळे एखादी महत्त्वाची संधी हातातून जाण्याची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे घरातील तसेच व्यवसायातील जबाबदारीचा ताण काही प्रमाणात वाढू शकतो. सहकार्‍यांची मने राखावी लागतील. घरातील सुखसोई वाढविण्यासाठी तसेच एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो. मात्र, आपण हे सारे आनंदाने पार पाडू शकाल. आपल्या कर्तव्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात समाधान राहावे.
शुभ दिनांक - 4, 6, 7, 9.
 
 
कुंभ : समाधानकारक घडामोडी
weekely-horoscope : या आठवड्यात या राशीच्या युवा वर्गाला नोकरी-व्यवसायात समाधानकारक संधी मिळू शकतील. काही अपेक्षित घटनाक्रम घडतील. नोकरीत असणार्‍यांना चांगल्या संधी लाभतील. काहींना नोकरीत बदल, स्थलांतरदेखील करता येऊ शकेल. मात्र, हे बदल करताना व्यवस्थित माहिती, सार्‍या व्यवहारांची खातरजमा करावयास हवी. वारशाची प्रकरणे किंवा कौटुंबिक स्वरूपाचे प्रश्न सुटू शकतील. विवाहेच्छू युवांना अनुरूप स्थळे लाभावीत. स्नेहबंधाची वीण अधिक घट्ट होऊ शकेल.
शुभ दिनांक - 3, 5, 7, 9.
 
 
मीन : तरुणांना उत्तम संधी
weekely-horoscope : या आठवड्यात अचानक निर्माण होणार्‍या काही मोठ्या खर्चाचे संकेत मिळत आहेत. तरुण वर्गाला मात्र नोकरी-व्यवसायात उत्तम संधी, पगारवाढ, पदोन्नतीचे- थोडक्यात भाग्योदयाचे योग लाभण्याची शक्यता या सप्ताहातील ग्रहयोग दर्शवीत आहेत. नवीन गुंतवणूक करता येईल. मात्र, अशी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला, मार्गदर्शन अवश्य विचारात घ्या. आर्थिक व्यवहार करताना पुरेशी सावधगिरी बाळगा. कोणावरही एकाएकी विश्वास टाकू नये.
शुभ दिनांक - 4, 6, 8, 9.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री
8600105746