‘मनभावन हा श्रावण...'

Sawan पुरणाच्या पोळीपासून लाह्या-फुटाण्यांपर्यंत

    दिनांक :31-Jul-2022
|
आसमंत 
- स्वाती पेशवे
 
Sawan दूर कुठेतरी गाण्याचे हे नितांतसुंदर सूर कानी पडले आणि या खरोखरच एका मनभावन मासाची मंगलमय सुरुवात झाल्यामुळे दाटलेली प्रसन्नता द्विगुणीत झाली. घरात अनेक घट असतात पण मंगल कलशामध्ये वेगळं पावित्र्य दिसतं. देवपूजा रोज होते, पण सणावारी केलेली पूजा अधिक सुशोभित दिसते. Sawan आपण दररोज कोणतं ना कोणतं स्तोत्र म्हणत असलो, तरी आवर्तनं केल्याने येणारं मांगल्य अधिक असतं. त्याचप्रमाणे एरवी यशाशक्ती आणि यथावकाश नित्यपूजा होत असली, तरी श्रावणात साज-या होणा-या विविध देवदेवतांच्या पूजा आणि त्यांच्या नामस्मरणाने मिळणारी प्रसन्नता काही वेगळीच असते. Sawan प्रत्येक पहाट मंगलमय असली, तरी सृष्टीचा मनोहारी दरबार सजलेला असताना उजाडणारी श्रावणातली पहाट मांगल्याचे काही आगळे कुंभ घेऊन येते, याबाबत दुमत असणार नाही.
 

asmt 
 
अगदी पट्टीचे मांसाहारीही जिभेवर ताबा ठेवतात, मनात आल्यास कधीमधी देवाची पूजा करणारं एखादं व्रत अंगीकारतात. Sawan एरवी फारसे एकत्र न येणारे एखाद्या पोथीचं पठण करण्यासाठी ठरावीक वेळ मोकळा ठेवतात आणि घराघरांतून नैवेद्याचे सुवास येऊ लागतात... असं सगळं घडतं अथवा दिसतं ते श्रावण महिन्यात... केळीचे खुंट, अंगणात रेखाटलेली रांगोळी, नानाविध फुलांचे सुवास, कानी पडणा-या कहाण्या, सणांच्या निमित्तानं नातलग आणि स्नेह्यांची लगबग अनुभवायला मिळते ती या महिन्यात... मेंदीचा तो वेडावून टाकणारा गंध आणि मोहक नक्षी अनुभवायला मिळते ती या महिन्यात... Sawan जिवतीच्या कागदासाठी हार करावे लागतात आणि भर पावसात पत्री-आघाडा-दुर्वा शोधाव्या लागतात ते या महिन्यात... सणावाराच्या निमित्तानं सासुरवाशिणी माहेरी येतात ते या महिन्यात आणि या सगळ्या वातावरणामुळे मन आनंदित व उल्हसित होतं, तेही याच महिन्यात...!
 
 
 
  
Sawan म्हणजेच आध्यात्मिक आनंदापासून आत्मिक आनंदाकडे नेणारा, पुरणाच्या पोळीपासून लाह्या-फुटाण्यांसारखा आरोग्यदायी खुराकाची मेजवानी देणारा हा महिना एक वेगळीच अनुभूती देतो. Sawan गेली दोन वर्षं कोरोनाच्या धाकात घालवल्यानंतर यंदा मोकळेपणाने आणि निर्बंधमुक्त वातावरणात सगळे सण साजरे करण्याची मुभा मिळत असल्यामुळे श्रावण अधिक देखणा भासत आहे, यात शंका नाही. Sawan गेली दोन वर्षं अगदी राखी पौर्णिमेसारख्या सणावेळीही मोबाईलवरून शुभेच्छांची आणि आभासी राख्यांची देवाणघेवाण केली गेली. Sawan बाहेर पाऊस कोसळत असताना खिडकीतून हात भिजवतील तेवढेच थेंब आपल्या वाट्याला येत होते. द-या-खो-यांमध्ये बेधुंद कोसळणारे तोय पाहण्याचा विचारही आपण करू शकत नव्हतो. तो हवाहवासा गारवा दूर कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता. यंदा मात्र सगळे निर्बंध, सगळं संकट दूर झाल्यामुळे आपण मोकळ्या मनाने श्रावणाचा आणि त्यानंतरच्या उत्सवपर्वाचा आनंद लुटणार आहोत. Sawan म्हणूनच यंदाचा श्रावण अधिक हर्षदायी आहे.
 
श्रावणातला Sawan प्रत्येक दिवस एखाद्या सणासारखा असतो. ती आठवणींची उजळणी असते. श्रावणी सोमवार, मंगळवारी मंगळागौर, बुधवारी बृहस्पतीपूजन, शुक्रवारी जिवतीची पूजा, शनिवारी मुंज्याचे जेवण आणि रविवारी आदित्यपूजन... अजूनही आठवतंय, श्रावण आला की आजी पसाभर कापूस निवडायला बसायची. Sawan मग त्या निवडलेल्या कापसाची माळावस्त्रं, फुलवाती, पिळाच्या वाती करायची. ती हळदी-कुंकवाने रंगवायची. अक्षता रंगवल्या जायच्या. कहाणीच्या पुस्तकाची शोधाशोध व्हायची. आरत्यांचं पुस्तक वरच्या खणात येऊन बसायचं. Sawan जिवतीच्या कागदाची फ्रेम साफसूफ व्हायची. आजूबाजूला आघाडा उगवला असल्याची खात्री व्हायची. कारण आता महिनाभर ही शिदोरी लागणार. आजही घराघरांत हे मंगलमय सोहळे साजरे होतात.
 
सोमवारी शिवमंदिराचं प्रांगण गर्दीने फुलून येतं. लहान असताना प्रत्येक श्रावणी सोमवारी मधल्या सुट्टीनंतरच शाळा सुटायची. Sawan मग महादेवाचं दर्शन घ्यायची गडबड. त्यावेळी दर्शनापेक्षा बाहेरच्या छोटेखानी जत्रेचंच अप्रुप जास्त असायचं. पिंडीवर बेल वाहिला की ७ वाजता उपास सोडायला मोकळं! त्यात आजीच्या तोंडून वाटीभर दुधाची कथा ऐकायला मिळायची. भारी मजा वाटायची तेव्हा! श्रावणाच्या अशा अनेक आठवणी अनेकांच्या अंत:करणात कायमच्या कोरल्या गेल्या असतील. किती नाचरा आहे हा श्रावण. तिकडे मोर नाचतो आणि इकडे मनमोराचा पिसारा फुलतो. Sawan मंगळागौरीची सजवलेली पूजा म्हणजे या पिसा-याचंच फुललेलं रूप. नाना प्रकारची पत्री आणायची. भांड्यावर काजळी धरून पिंड सजवायची, नवविवाहित मुलीने सवाष्णीसमवेत मंगळागौर पुजायची, मुक्याने जेवायचं, संध्याकाळी मंगळगौर जागवताना सगळ्यांनी खेळ खेळायचे... किती छान आहे हा उत्सव!
 
अशा खेळात बायकांच्या शरीरावर अकाली पडलेलं प्रौढत्वाचं जाळं क्षणात गळून पडतं आणि त्यांच्यात लपलेली अल्लड, अवखळ मुलगी जागी होते. Sawan अगदी मनसोक्त हुंदडत, हास्यविनोदात रमत त्या फुगड्या घालतात, गोफ विणतात, ‘खुर्ची का मिर्ची' म्हणत एकमेकींना छेडतात. पिंगा घालतात, घागरी फुंकतात आणि सूपही नाचवतात. Sawan इथे वयाची वस्त्रं गळून पडली नाहीत तरच नवल! आता नव्या जमान्यातल्या उच्चशिक्षित तरुणीही आवर्जून मंगळागौरीचे खेळ खेळत असल्याचं पाहून कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. Sawan या खेळातून आपसूक घडणारे व्यायाम प्रकार सुदृढ आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात, असं दिसून आलं आहे. अर्थात, पूर्वीच्या पिढीने हाच विचार करून मंगळागौरीच्या खेळांची योजना केली असावी.
 
Sawan श्रावणातल्या शुक्रवारी लेकुरवाळ्या स्त्रीला सन्मानाने जेवायला घालायची प्रथा आहे. या दिवशी संध्याकाळी पंचक्रोशीतल्या सवाष्णींना हळदी-कुंकवाला बोलावून दूध, फुटाण्याचा प्रसाद द्यायचा. रविवारी मुक्यानं उठायचं. आंघोळ होईपर्यंत शब्दही बोलायचा नाही. उगवत्या सूर्याला अघ्र्य देत आदित्य राणूबाईची पूजा करायची आणि नंतर कथा वाचायची. असाच आनंद नारळी पौर्णिमा, नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला यासारख्या सणांमधूनही मिळवायचा. म्हणूनच श्रावण कधी सुरू होतो आणि मुठीतल्या रेतीसारखा कधी सरतो हे समजतही नाही. Sawan संपूर्ण भारतभर श्रावणमासाचं भारी कौतुक. श्रावण हा श्रवणाचा महिना ! या दिवसात मंदिरातून भजन-कीर्तनाचे कार्यक्रम रंगतात. पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ भक्तिसार, काशीखंड आदी ग्रंथांचं पठण होतं. Sawan श्रावणात उत्तर भारतात झुले पडतात. तीजेला तीजमातेची पूजा करून मुली झोपाळ्यावर झुलतात.
 
मध्य प्रदेशमध्ये हरियाली तीज साजरी होते. Sawan या प्रसंगी वेगवेगळे मेवे घालून बर्फी बनवली जाते. स्त्रिया हातावर मेंदी रेखून सोळा शृंगार करून तीजमाता पूजतात. Sawan in Rajsthan राजस्थानमध्ये छोटी तीज साजरी होते. या दिवशी मंदिरात लक्ष्मीनारायण चांदीच्या झुल्यात बसतात. तिथे राखी पौर्णिमेनंतरच्या तीजेला बडी तीज, कजरा तीज किंवा सातुडी तीज म्हणतात. या तीजेला बायका गुंजा खेळतात. झोके झुलतात. त्याला सिंजारा म्हणतात. Sawan in Bihar बिहारमध्ये श्रावणाचं नाव मोठं मोहक आहे. तिथे या मासाला मधुश्रावणी म्हणतात. या निमित्ताने घर सजवतात. दारात तांदळाच्या पिठाची रांगोळी रेखतात. श्रावणात बंगालमध्ये शिवाभिषेकाचं मोठं महत्त्व आहे. लोक पिंडीवर कावडींनी अभिषेक करतात. या कावडी आणणा-यांची मोठी व्यवस्था पाहायला मिळते. Sawan आपल्याकडच्या वारक-यांसारखं त्यांचं रस्तोरस्ती स्वागत होतं आणि त्यांना उपवासाचे पदार्थ दिले जातात.
 
Sawan in Andhra Pradesh आंध्रात श्रावणातला दुसरा शुक्रवार अतिशय महत्त्वाचा. तिकडे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. घरात वरदलक्ष्मीचं व्रत घेतलं जातं. Sawan in Tamilnadu तामिळनाडूमध्ये या दिवसात कामाक्षीदेवी माहेरवाशीण म्हणून घरी येते अशी भावना आहे. तिचं जोरदार स्वागत होतं. श्रावणात इथे एका शुक्रवारी हळदीने, दुस-या शुक्रवारी कुंकवाने, तिसèया शुक्रवारी फुलांनी आणि चौथ्या शुक्रवारी फळांनी पूजा सजवतात. ही सारी महती लक्षात घेतली तर श्रावणाचं अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट होतं. Sawan श्रावण हा मुख्यत्वे माहेरवाशिणींचा सखा असतो. या काळातलं धुंद वातावरण आणि निसर्गाच्या रूपाने अनेक लेखक, कवींना मोहिनी घातली आहे. Sawan अनेक लेखक, कवींच्या लेखणीतून श्रावणातलं सौंदर्य उलगडत गेलं. ते वाचताना, ऐकताना श्रोत्यांनाही या मनमोहक जगताची सैर घडते. ही सैर आनंददायी ठरते.