महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य : देवेंद्र फडणवीस

    दिनांक :05-Jul-2022
|
- चारुदत्त कहू
 
राज्याचे Devendra Fadnavis माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, राज्य विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते, फर्डे वक्ते, कुशल संघटक आणि सर्वात कमी वयात महापौरपद भूषविलेले लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आपल्या रणनीतिक कौशल्याने महाविकास आघाडी सरकार उलथवून लावत, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अर्थात पुन्हा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आणण्यात जी मोलाची भूमिका Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी बजावली तिची आज राज्यातच नव्हे तर देशात सर्वत्र चर्चा होत आहे. आजवर देशाच्या राजकारणात अनेकदा बंडाचे झेंडे फडकले. त्यात विरोधी पक्षाचे आमदार अथवा खासदार बहुमत मिळवण्यासाठी फोडले गेले अथवा काही वेळा बंडाळी मूळ पक्षातील आमदार फुटून निघत दुसर्‍या पक्षात सामील झाल्याने झाली. शिवसेनेतही बंडाळी नवी नाही. यापूर्वी नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे यांनी सेनेत बंड करून, या पक्षाला भगदाडे पाडली. पण यंदाचे शिवसेनेतील बंड आगळे आहे.
 
Devendra Fadnavis
 
शिवसेना सत्तेत असताना आणि दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान असताना त्यांच्याच पक्षातील 39 आमदारांनी उठाव करून, भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. सत्ताधारी पक्षातील आमदार फुटतात काय आणि विरोधी पक्षासोबत जातात काय? हा सारा प्रकार अनाकलनीय वाटणारा असल्याने अनेकांना हा उठाव पचनीच पडत नव्हता. खुद्द महाविकास आघाडीतील नेत्यांना शेवटपर्यंत आपल्या घटक पक्षाचे आमदार परततील, त्यांना धमकावल्याने उठाव मागे घेतला जाईल, अशी आशा होती. पण Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस आणि या उठावाचे शिल्पकार एकनाथ शिंदे यांनी खेळलेल्या बुद्धिबळाच्या डावात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा केव्हा ‘चेक मेट’ झाला हे त्यांनाही कळले नाही. हातातील सर्व सैनिक सोडून गेल्याने त्यांच्या पराभवाची इतिश्री झाली. उठावाची योजना ज्यांच्यामुळे यशस्वी झाली ते देवेंद्र फडणवीस राजकारणातील चाणक्य ठरले. त्यांनी योग्यवेळी, भरभक्कम पावले टाकली नसती, तर अडीच वर्षांपूर्वी जसा भाजपाच्या तोंडातून सत्तेचा घास शिवसेनेने हिरावला किंवा सकाळच्या प्रहरी झालेला शपथविधीचा प्रयोग फसला, तशीच परिस्थिती यावेळीही उद्भवली असती. पण यावेळी Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विश्वासात घेऊन जी चाणक्यनीती आखली, तिला सत्तारूपी फळ येऊ शकले.
 
Devendra Fadnavis
 
सुरुवातीला उठाव झाला त्यावेळी केवळ 15 ते 20 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात होते. त्यानंतर हा आकडा दिवसेंदिवस वाढत गेला आणि तो 39 वर स्थिरावला. यामध्ये राज्यातील 8 मंत्र्यांचाही समावेश होता आणि शिवाय 11 अपक्षही साथीला होते. आमदारांना आधी सूरतला, तेथून गुवाहाटीला नेणे, त्यानंतर उठावाची योजना यशस्वी झाल्यानंतर कामाख्या देवीचे दर्शन, तेथून गोव्यात वास्तव्य आणि सरतेशेवटी दोन दिवसांपूर्वी सर्व 50 आमदारांनी मुंबईत सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी परतणे, हे सर्व स्वप्नवतच होते. पण ही बंडाळी यशस्वी करण्यात देवेंद्र फडणवीस, राज्य भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, इतर प्रमुख सहकारी आणि केंद्रीय नेतृत्वाने जी रणनीती आखली तिला खरोखरीच तोड नाही. कुठल्याही पक्षातील फूट, उठाव अथवा बंड हे नेहमी हिंसाचाराला जन्म देते. पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील या उठावाने अक्षरशः रक्तहीन क्रांती करून राज्यातील सरकार उलथवून लावले आणि सरकारचे बहुमतही सिद्ध केले.
Devendra Fadnavis
 
विशेष म्हणजे या सर्व नाट्यामागे समन्वयाची भूमिका वठवणारे Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे खरे दावेदार होते. अगदी सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेपर्यंत त्यांचेच नाव या पदासाठी घेतले जात होते. पण ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा आणि एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करण्याचे आदेश दिले. हा प्रसंग तसा बाका होता. देवेंद्र फडणवीसांनी हट्ट धरला असता तर पक्षश्रेष्ठींना झुकावे लागले असते आणि त्यांच्याच गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ टाकावी लागली असती. पण त्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानून, पक्षशिस्तीला प्राधान्य देत नव्या सरकारची कमान शिंदेंकडे सोपविली आणि स्वत: उपमुख्यमंत्रिपदाचे दुय्यम पद स्वीकारण्याचा मोठेपणा दाखवला. भारतीय जनता पक्ष ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे, हे सांगण्यासाठी यापेक्षा मोठे उदाहरण ते कोणते म्हणावे? देवेंद्र फडणवीस यांना दुय्यम पद मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते हिसमुसले असले, त्यांनी पक्षश्रेष्ठींविरुद्ध नाराजी व्यक्त केली असली तरी, येत्या काळात यापेक्षा मोठी भूमिका वठविण्यासाठी मागे घेतलेले हे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह शिवसेनेच्याही नेत्यांनी स्वागत केले. ‘पक्ष आणि व्यक्ती’ असा संघर्ष उभा राहिल्यास पक्ष मोठा असल्याचे Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना उदाहरणाने दाखवून दिल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी तर स्वतंत्र पत्र पाठवून या भूमिकेसाठी देवेंद्र यांचे अभिनंदन केले.
 
 
 
सरकारवरील बहुमताची अग्निपरीक्षा आता शिंदे आणि फडणवीस सरकारने पूर्ण केली आहे. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील कसाची पुन्हा एकदा जनतेला प्रचीती आली. गोव्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. देशात विविध ठिकाणी झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी त्यांच्यातील संभाषणशैलीचा प्रभाव टाकला आहे. त्यामुळे देवेंद्र हे निव्वळ राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आहेत हे सिद्ध झालेले आहे. गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना आपण उद्धव ठाकरे यांची अकर्मण्यता आणि Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांची तत्परता यांचा ठायीठायी अनुभव घेतला आहे. या काळात त्यांनी राज्य सरकारला अक्षरशः कोंडीत पकडले होते. विभिन्न प्रश्न उपस्थित करून सरकारला नामोहरम करून टाकले होते.
 
 
कोविड काळात Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी ज्या गतीने, आत्मीयतेने कामे केली, त्यावरून राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न जनतेला पडला होता. पायाला भिंगरी लावल्यासारखा हा माणूस राज्यात ठिकठिकाणी फिरतहोता, लोकांना मदत करीत होता, त्यांचे अश्रू पुसत होता. कुठे कोरोना इस्पितळाचे उद्घाटन कर तर कुठे अन्नछत्राचा प्रारंभ कर आणि कुठे ऑक्सिजनच्या कमतरतेविरुद्ध आवाज उठव तर कुठे सरकारी इस्पितळांमधील दुरवस्थेविरुद्ध जनजागरण करण्याचे काम स्वतः कोरोनाग्रस्त होण्याची शक्यता दूर सारून हा लोकनेता करीत राहिला. एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोनाविरुद्ध लढा देत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून देवेंद्र फडणवीस या राज्यातील लोकांप्रतिचे कर्तव्य बजावत होते. शेतकर्‍यांसाठीही वेळोवेळी त्यांनी धाव घेतली. गतकाळात देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासाठी दिलेला लढा सर्वांना ज्ञात आहे. त्यासाठी ओबीसींनी त्यांचा मोठा सत्कारही केला होता. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीयच म्हणावे लागतील. हे आरक्षण टिकावे यासाठी त्यांनी त्यांच्यातील वकिली डावपेचांची आयुधं वापरली, पण करंट्या महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाचा पाया मजबूत व्हावा म्हणून साधे वकिलांचे पॅनेलसुद्धा नियुक्त केले नाही. आता त्यांनी नव्या सरकारची सूत्रे हाती घेताच पहिला मुद्दा मराठा आरक्षणाचा घेतला आहे. या सार्‍या पृष्ठभूमीवर मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न या समाजाला दुर्बलतेतून बाहेर काढण्यासाठीचे आहे हे सिद्ध होते.
 
 
राज्याचे मुख्यमंत्री असताना Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामाची अमिट छाप जनतेवर सोडली. केव्हाही आणि कधीही अप्रोचेबल असणारा नेता आणि जनतेच्या समस्या सोडविण्यास अग्रक्रम देणारा म्हणून त्यांची ख्याती राहिली. राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी व्हावे, म्हणून त्यांनी आखलेल्या योजना कौतुकाच्या ठरल्या. जलयुक्त शिवारमुळे तर राज्यातील अनेक गावांत पाण्याची गंगा वाहू लागली. त्यांनी आखलेल्या गाळमुक्त तलाव योजनेमुळे तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. राज्यातील सिंचन प्रकल्प नितीन गडकरींच्या मदतीने मार्गी लावण्यातही त्यांनी मोठी भूमिका निभावली. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ही तर त्यांच्याच सुपीक डोक्यातील कल्पना. याच मार्गामुळे नागपूर-मुंबई अंतर आठ तासांत कापले जाईल.
 
 
गेल्या अडीच वर्षात ‘मी पुन्हा येईल’ या वक्तव्यावरून त्यांच्यावर बरीच टीका टिप्पणी झाली. कोणी त्यांच्या शरीरावरूनही टीका केली आणि काहींनी त्यांच्या धर्मपत्नीलाही त्यात ओढून त्यांचा अपमान करण्याचा विडा उचलला. पण देवेंद्र डगमगले नाही. त्यांनी भगवान शंकराप्रमाणे हे हलाहल पचवले आणि मनात कुढत न बसला, निराश न होता सत्ताधार्‍यांविरुद्ध एकहाती लढा दिला. लोकांबद्दलची जबाबदारी पार पाडत या सरकारचे वाभाडे काढले. त्याचीच परिणती म्हणजे आज देवेंद्र यांच्या हाती राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली आहे. पूर्वीप्रमाणेच ते जनतेला न्याय मिळवून लोकनेता म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील अशी अपेक्षा आहे.
 
 
रामनगर वॉर्डातून Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगर पालिकेची प्रथम निवडणूक जिंकली आणि नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. पाच वर्षानंतर ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर म्हणून निर्वाचित झाले. 1997 ते 2001 या काळात ते नागपूरचे महापौर होते आणि देशातील सर्व महापौरांच्या तुलनेत अधिक तरुण होते, पण त्यांची विकासाची दृष्टी आणि राजकारणाची जाण विलक्षण होती.
 
 
1999 साली महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून ते प्रथम पश्चिम नागपूरमधून निवडून आले आणि नंतर दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील बारीक सारीक समस्या त्यांनी मार्गी लावल्या. विधानसभेच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी क्रिमीलेअरची वाढलेली मर्यादा हे त्यांच्याच प्रयत्नांचे फलित आहे. झोपडपट्टीत राहणार्‍या गरीब जनतेला स्वतःच्या मालकीचे पट्टे हे त्यांच्याच प्रयत्नांमुळे मिळाले. महाराष्ट्रात पूर्ण टर्म राज्य करणारा काँग्रेसेतर पक्षाचा पहिला मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्या नावाची नोंद आहे. वयानुरूप शरद पवारांच्या नंतरचा सर्वात तरुण मुख्यमंत्री, अशीही त्यांची ओळख आहे. शरद पवार वयाच्या 38 व्या वर्षी तर फडणवीस वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. ‘मेअर इन कौन्सिल’मध्ये महापौर झालेले Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस हे सर्वात तरुण महापौर. या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला व ‘मिस्टर क्लीन’ची प्रतिमा अबाधित राखली. देवेंद्र फडणवीस वयाची पन्नाशी गाठण्याच्या आत राजकीय रोल मॉडेल बनून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या विश्वासातले नेते म्हणून त्यांची गणना होते. राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे प्रथमच नागपूर नगरीत आगमन होत आहे. त्यांचे स्वागत करतानाच त्यांच्या मनातील सर्व स्वप्ने पूर्ण होण्याच्या या चाणक्याला शुभेच्छा देऊयात!
- 9922945774