महाराष्ट्रात १३ हजार ४५० स्टार्टअप्स

    दिनांक :06-Jul-2022
|
मुंबई,
Startups in Maharashtra केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार मंत्रालयामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. देशातील एकूण ७२ हजार ७०२ मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी १३ हजार ४५० स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. याबरोबरच देशभरात २०२१-२२ आर्थिक वर्षात सुरु झालेल्या ४४ स्टार्टअप्स यूनिकॉर्नपैकी ११ यूनिकॉर्नस महाराष्ट्रातील आहेत. यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन ७ हजार ५०० कोटी ते 75 हजार कोटी रुपये आहे.
 
Startups in Maharashtra 
 
राज्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत स्टार्टअप्स Startups in Maharashtra आहेत. यामध्ये मुंबई महानगर प्रदेशात १४ हजार ७१०, पुण्यामध्ये ८ हजार ६०३, नागपूर मध्ये २ हजार ०५२, तर सिंधुदुर्गमध्ये ३६ स्टार्टअप्स आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये ३२ तर नंदुरबारमध्ये ३७ स्टार्टअप्स आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ ते ३० स्टार्टअप्स आहेत. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांची स्टार्टअप रँकिंग जाहीर करण्यात येते. रँकिंग जाहीर करण्याची यंदाची ही तिसरी आवृत्ती होती. या रँकिंगमध्ये २०१८ च्या आवृत्तीत महाराष्ट्र हे उदयोन्मुख राज्य श्रेणीमध्ये होते तर २०१९ च्या आवृत्तीत नेतृत्व श्रेणीमध्ये होते. आता २०२१ च्या आवृत्तीमध्ये Startups in Maharashtra महाराष्ट्राने ‘टॉप परफॉर्मर’च्या श्रेणीमध्ये स्थान मिळविले आहे.
 
 
यंदा ही रँकींग जाहीर करताना 7 व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला. यामध्ये स्टार्टअप्स आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन देण्यासाठी आवश्यक असे 26 कृती मुद्दे होते. या सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक समर्थन, नाविन्यता आणि उद्योजकतेला चालना देणे, बाजारपेठेत प्रवेश, इनक्युबेशन समर्थन, निधी समर्थन, मार्गदर्शन आणि क्षमता निर्मिती यांचा समावेश होता. महाराष्ट्र स्टार्टअप Startups in Maharashtra वीक, स्टार्टअप पोर्टल आणि महिला इनक्युबेशन सेंटर या प्रमुख उपक्रमांमुळे तसेच स्टार्टअप्सना बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राबविलेल्या समर्पित कार्यक्रमामुळे या क्रमवारीत महाराष्ट्राने ‘टॉप परफॉर्मर’ क्रमांक पटकवला.