अफगाणिस्तानने उझबेकिस्तानवर डागले रॉकेट

    दिनांक :06-Jul-2022
|
dfdgr 
 
ताश्कंद,
Afghanistan अफगाणिस्तानातून डागण्यात आलेली पाच रॉकेट शेजारच्या उझबेकिस्तानच्या दक्षिणेकडील तेरमेज शहरावर पडली. स्थानिक वेळेनुसार, रॉकेट सुमारे 4:20 हि घटना घडली. चार रॉकेट मजनटोल आणि फुटबॉल स्टेडियमच्या आसपासच्या परिसरात आले, असे येथील स्थानिक वृत्तसंस्थेने मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही रॉकेटचा स्फोट झाला नाही. चार घरांचे किरकोळ नुकसान झाले, मात्र लोक सुरक्षित आहेत. यावेळी, उझबेकिस्तानचे सक्षम अधिकारी या घटनेच्या कारणाबद्दल अफगाणिस्तानच्या Afghanistan बाजूने चर्चा करत आहेत," असे निवेदनात म्हटले आहे.