प्रसूती वेदनेतील महिलेसाठी आरपीएफची काँस्टेबल ठरली देवदूत

    दिनांक :06-Jul-2022
|
मुंबई,
रेल्वे प्रवासात RPF constable असतानाच प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या, त्याच वेळी आरपीएफची महिला काँस्टेबल देवदूतासारखी धावून आली आणि तिने या महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या महिलेची प्रसूती झाली असून, ती आणि तिचे बाळ सुरक्षित आहे. या महिलेच्या मदतीला धावून आलेल्या महिला काँस्टेबलचे नाव ममता डांगी असे असून, तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
 
RPF constable
 
सकाळी 8.20 मिनिटांनी दिवा स्टेशन मास्तरकडून एक मेसेज आला आणि त्या ठिकाणी RPF constable ड्युटीवर असलेल्या ममता डांगी या महिला काँस्टेबलने जीआरपी स्टाफच्या मदतीने प्रसूतीच्या वेदना सुरू झालेल्या महिला प्रवाशाची मदत केली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याबाबत माहिती दिली असून, त्यांनी ममता डांगी, आरपीएफ आणि जीआरएफ स्टाफच्या कामाचे कौतुक केले आहे.