अजयच्या व्यस्ततेमुळे रखडणार ‘चाणक्य’

    दिनांक :06-Jul-2022
|
मुंबई, 
अजय देवगण Ajay Devgan सध्या प्रचंड व्यस्त असल्याने त्याच्या ‘चाणक्य’ चित्रपटावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचे ‘रनवे 34’, ‘थँक गॉड’ आणि ‘दृश्यम् 2’ हे चित्रपट रांगेत आहेत. याशिवाय ‘भोला’ चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: करणार असल्याचे त्याने जाहीर केले. या सर्व गोंधळात त्याच्या ‘चाणक्य’ चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलावे लागणार असल्याची शक्यता आहे.
 
Ajay Devgan
 
हा चित्रपट मागील वर्षी Ajay Devgan ऑक्टोबरमध्येच प्रदर्शित करण्याचे नियोजन होते. मात्र, टाळेबंदी आणि अजयचे आधीपासूनचे चित्रपट तसेच वेबसीरिजच्या कामांमुळे तो सातत्याने लांबणीवर पडत आहे. चित्रपटचे दिग्दर्शक नीरज पांडे यांनीही याला दुजोरा दिला आहे. चाणक्यावर लिहिल्या गेलेल्या डझनभर पुस्तकांचा टीमने गेल्या सहा वर्षांत अभ्यास केला आहे. त्यानंतर दोन वर्षे देशातील विविध ठिकाणी जाऊन संशोधन केले आहे. आधी या चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेंद्र शर्मा करणार होते.