आज डॉ. पं. दे. कृ.वि.चा दीक्षांत समारंभ

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची प्रमुख उपस्थिती

    दिनांक :06-Jul-2022
|
अकोला, 
Convocation Ceremony येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 36 वा दीक्षांत समारंभ गुरुवार, 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कृषी महाविद्यालयाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख अतिथी, विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी समारंभाचे अध्यक्ष तर पद्मश्री डॉ. मोतीलाल मदान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दिली.
 
Convocation Ceremony
 
Convocation Ceremony यावेळी पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी डॉ. ययाती तायडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, प्रभारी संचालक संशोधन डॉ. शामसुंदर माने उपस्थित होते. 
 
 
Convocation Ceremony डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीसह एकूण 3,646 पदवी प्रदान करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभ प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने संपन्न होणार असून समारंभात केवळ आचार्य आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त करणारे एकूण 412 विद्यार्थ्यांची दीक्षांत समारंभात प्रत्यक्ष उपस्थिती राहणार असून उर्वरित 3,234 पदवीधारकांची आभासी उपस्थिती राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. भाले यांनी यावेळी दिली. पदवीदान समारंभात उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक, उत्कृष्ट कर्मचारी आणि उत्कृष्ट संशोधन यासह पुरस्कार प्राप्त करणारे विद्यार्थ्यांची एकूण संख्या 45 असून त्यात 31 सुवर्ण, 16 रौप्य, 32 रोख पारितोषिक तर पुस्तक स्वरुपात 3 पारितोषीकांचा समावेश असून एकूण 82 पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
 
 
एम.एसस्सी. कृषीची विद्यार्थिनी पूनम हनुमंतराव देशमुख हिने 5 सुवर्ण आणि 1 रौप्य असे एकूण 6 पारितोषिके मिळवून ती सर्वाधिक पारितोषिके मिळवणारी विद्यार्थिनी ठरली आहे. तर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार कीटकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. यू. एस. कुळकर्णी यांना मिळाला असून उत्कृष्ट संशोधन पारितोषिक डॉ. एस. एस. निचळ, जी.टी. चंदनकार, डॉ. पी.व्ही. पाटील, एम. एस. धांडगे, डॉ. एस. एस. मंजू यांना आणि डॉ. व्ही. एस. काळे, डॉ. पी.के. नागरे, डॉ. ए. पी. वाघ, डॉ. ए. एम.सोनकांबळे, डॉ.ए. के. सदावर्ते यांना संयुक्तरीत्या प्राप्त झाला आहे.
 
 
स्वाती विनोद जाधव आणि दिलीप शेषराव अहीर या दोघांना उत्कृष्ट कर्मचारी पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे. तर राष्ट्रीयस्तरावरील संशोधनात अतिउत्कृष्ट सहयोगाबाबत अपारंपारिक ऊर्जास्त्रोत आणि विद्युत अभियांत्रिकी अकोलाचे प्रा. डॉ. एस. आर. काळबांडे यांना डॉ. पी. के. खानखोजे पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. भाले यांनी दिली. दीक्षांत समारंभाला मधुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा डॉ. पं.दे.कृ.वि., अकोलाचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. मोतीलाल मदान यांचीही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.