बंधारा फुटल्याने शेतकर्‍यांचे नुकसान

- भिवकुंडी येथील घटना

    दिनांक :06-Jul-2022
|
तभा वृत्तसेवा 
मोर्शी, 
dam burst भिवकुंडी येथे पाटनाका नाल्यावर टाकलेला सिमेंट व माती बंधारा फुटल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग अमरावतीच्या वतीने मौजे भिवकुंडी येथे पाटनाका नाल्यावर सिमेंट नाला बांध व विमोचकाचे बांधकाम सन 2022 मे महिन्यात 40 लाख रुपये खर्च करून करण्यात आले.
 
dam burst
 
dam burst सदर बंधार्‍यातील अतिरिक्त पाणी वाहून नेण्यासाठी बाजूला नाल्याच्या पत्रात सांडवा निर्माण करण्यात आला आहे. या सांडव्याच्या बाजूला भिवकुंडी येथील अशोक उईके यांचा संत्रा बगिचा असून मंगळवारी सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे सदर बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. उईके यांच्या शेतीला लागून जलसंपदा विभागाच्या वतीने माती बांध न टाकल्यामुळे मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बंधार्‍यातील पाणी अशोक उईके यांच्या संत्राच्या बगिच्यात शिरले. सदर शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी याबाबतची तक्रार मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी नितींनकुमार हिंगोले यांच्याकडे केली असून जलसंपदा विभागाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सुद्धा केली आहे.
 
 
तक्रारीकडे केले दुर्लक्ष
भिवकुंडी येथील बंधार्‍याचे काम सुरू असताना सदर शेतकर्‍याने याबाबतची माहिती वरुड येथील लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता व मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूरचे कार्यकारी अभियंता यांना नाल्याच्या पात्रातील टाकलेला मलमा उचलून शेताच्या धुर्‍यावर टाकण्याची विनंती केली होती. पण सदर अधिकार्‍यांनी त्यांच्या या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.